Rajesh Varhade

Romance

2.6  

Rajesh Varhade

Romance

प्रेम कहानी

प्रेम कहानी

3 mins
79


 मी पारस ऑफिस केंद्र येथे कामाला असताना. एक मुलगी आयुष्यात आली. ती खूप अल्लड, मनमौजी ,वैचारिक आणि सुरेख जणू मला हवी तशी. पण कसं आणि काय म्हणावे तिला शब्द नव्हते सापडत. मनी चित्ती ले ते होईजे मग एटीएम मध्ये भेट झाली. थोडे बोलणं झालं मग तिथे पासबुक एन्ट्री मारायची मशीन होती. ती म्हणाली कशासाठी एन्ट्री मारता म्हटलं जमाखर्च माहित पडायला, नाहीतर काढत राहतो पैसे आणि परत काढायला गेले की खाता रिकाम नको व्हायला. पण माझा मोठेपणा मला भोवला ते पुस्तक त्या मशीन मध्ये अडकले. पाच दहा मिनिटे झाली काही आले नाही. मग मी बँकेत सांगण्याकरता गेलो ती मुलगी लगेच माझ्या माघारी आली. म्हणाली दादा तुमचा पुस्तक आणि एक गोष्ट त्या दिवशी विम्याचे पैसे जमा होणार होते. असा मेसेज आला परंतु एन्ट्री मारल्यानंतर चक्क पाहिले तर काय मोबाईल मेसेज पेक्षा थोडे शिल्लक पैसे जमा झाले. मग तुम्ही काय म्हणणार त्या मुलीचा हातगुणच ना मग मनात ठरलं तिच्या आभार मानायचे. काहीतरी तिच्या कामा पडायचं पण काय करणार......

   ती आमच्या बाजूच्या विभागात होती कामाला. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझा वाढदिवस होता. मग तो केक कापून साजरा केला .आमच्या विभागात जिव्हाळ्याचे माणस आहेत. म्हणून मी कामावर आहे टाळ्यांचा आवाज आणि हॅपी बर्थडे टू यू चा आवाज तिने ऐकला.

 अजून दोन दिवस गेले मग तिला सांगायचे होते .तुझ्या हात गुणांनी मला शिल्लक पैसे मिळाले. पासबुक सोबत होते पण विभागात कसं सांगणार मग संधी शोधू लागलो. सर्व जेवायच्या सुट्टीत घरी गेले. मग मी योगायोगाने खाली उतरलो तो पार्किंग पर्यंत चालत होती. मला पाहून ती थांबली आणि सरळ ऺजोर का झटका धीरे से लगा ंचक्क तिने माझा हात हातात पकडून हस्तांदोलन केलं. ओ माय गॉड माझ्या पायाखालची जमीन सरकली .ती म्हणाली बि लेटेड हॅपी बर्थडे क्षणभर वाटलं .मी स्वप्न तर नाही ना पाहत आजवर कोणी एवढं जिव्हाळ्याचं जवळच नाही आलं. काय चमत्कार देवा आणि माझं अंग शहारल तिच्यासोबत तिची मैत्रीण होती. तिने पण हस्तांदोलन केलं मग मी पासबुक दाखवलं तर ती म्हणाली पार्टी तर लागणार. आम्हाला पार्टी पाहिजे मी म्हटलं पार्टीत दारू विरू असते पार्टीपेक्षा काही वेगळे करू.

  नंतर मी तिच्यावर कविता अन जीवनावर कविता करू लागलो. जीवन खूप सुंदर आहे त्या ओळी व्यवस्थित बसल्या. ह्या तिला दाखवायची संधी शोधू लागलो. कसे दाखवावे जागा ठरलेली कोणी पाहिला तर नाही म्हणून पार्किंग मध्ये तिला त्या कविता दाखवली .फार आवडली आता ती आणि मी बोलायची संधी पाहू लागलो. असेच मग ठरवलं त्यांना नाश्ता खाऊ घालायचं म्हणून तसे दिले तर येणार नाही. एवढं माहीत होतं मग नाश्ता करू दिला आणि हॉटेलमध्ये जाऊन पैसे मी दिले. परत ती थँक्यू म्हणाली म्हटलं थँक्यू कशासाठी ही पार्टी.

   आमचं संधी शोधून वरवर बोलणं चालू मग फार घरच्यासारखं वाटायला लागलं. अजून आपल्यात कला आहे. वाटू लागले मग तिच्या विभागात तिच्या साहेबांचा वाढदिवस झाला. साहेब हँडसम होता दिसायला पण तीन हस्तांदोलन नाही केलं. फक्त हॅपी बर्थडे म्हणाली आणि एक चॉकलेट गिफ्ट दिलं .आम्ही असंच भेटायचं पण कधी तिने मोबाईल नंबर मागितला नाही. मी पण नाही दिला एकमेकांबद्दल जवळीक वाढू लागली. कसं करावं काय करावे काही सुचेना.

   मदत मी काही कामानिमित्त सुट्टीवर गेलो आणि तिचे एक वर्ष ट्रेनिंग पूर्ण झालं की जाणार अशी पहिल्या दिवशी भेटली. आणि माझ्या आयुष्यातून न काही बोलता निघून गेली. कुठे आहे कशी आहे काय पत्ता नाही .अजून बावळट मन येईल मग प्रेमाचे दोन शब्द बोलू वाट पहावी लागणार की काय...


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance