Rajesh Varhade

Others

2  

Rajesh Varhade

Others

पर्यावरण

पर्यावरण

2 mins
89


    पर्यावरण ,पर्यावरण म्हणजे काय तर जीवसृष्टी निर्मिती सोबत निर्माण झालेली. झाडे वेली, फळ, फुले देणारी अन्नधान्य पिकवून मानवाच्या उदरनिर्वाहासाठी माध्यम. कारण मानवा लागणारी हवा बाष्पीभवन होऊन येणारे पाणी जगण्यासाठी आवश्यक आहे. पशु पक्षीही आहार-विहार त्यावरच अवलंबून आहेत. सर्वात आधी येणारे फळ पक्व झाले का नाही. ते त्यांनाच विचारा म्हणजे ते खातात त्यावरून आपल्याला कळते. ही सृष्टी खूप मोठी आहे मानवाच्या उपयोगाचे वापरायची जरूर अधिकार परंतु स्व स्वार्थासाठी मानव आणि तिचा घात करायला सुरुवात केली. झाडे तोड होऊ लागली. पडीक वनक्षेत्र शेती पेरणी करता तयार करू लागला .तसेच राहण्यासाठी उंच उंच इमारती बनवू लागला .दळणवळणाच्या साधनासाठी रस्ते बांधकामात आलेली झाडे तोड करू लागला. काँक्रीट ,डांबरीकरण रस्ते निर्मिती झाली व शेतीसाठी सरकारी नियमानुसार वाहिन त्याची शेती. पडीक जमिनीवर पैसे देऊन मालकी हक्क तयार झाले. वन्यप्राणी झाडावर चढून त्रास देतात. म्हणून झाडे कत्तल झाली. कालांतराने कमीत कमी प्रमाणात पाऊस होऊ लागला उत्पादनही कमी व्हायला लागले. परिणामी काही सेवाभावी संस्था ,सरकारी यंत्रणा दुष्काळामुळे खडबडून जागे झाले. व वृक्ष लागवड मोहीम जोपासना करणे हाती घेऊ लागले. कुठे काही जयंती, उद्घाटन किंवा नंतर नंतर वाढदिवस ही वृक्षारोपण करून साजरी करू लागले. म्हणजेच मानवाला त्याची महती कळली.  गेल्या दोन वर्षापासून लोडवणारा कोरोना प्राणवायू संपला. जागोजागी ऑक्सीजन प्लांट उभारावी लागले .प्राणवायूची महती कळली रस्त्याच्या कडेला जागोजागी॑ झाडे लावा झाडे जगवाॱ घोषवाक्य घुमू लागले .पाणी आडवा पाणी जिरवा ,कारण पाऊस हा बाष्पीभवन वाऱ्यावर अवलंबून आहे.  चला तर मग प्रतिज्ञा करू एक झाड काही कारणास्तव तोडायचे असेल. तर दहा झाडे जगवू वाढवून दाखवू हेच आपल्या सर्वांच्या हिताचे आहे.

 संघटित व्हा करा नवनवीन विचार पर्यावरण संवर्धन काळाची गरज आधार.


Rate this content
Log in