Neelima Deshpande

Inspirational

2  

Neelima Deshpande

Inspirational

रात्रीच्या गर्भात असे...

रात्रीच्या गर्भात असे...

1 min
95


"सोनम अग इतक्या रात्रीपर्यंत जागून कशाला डोळेफोड करतेस? त्या झिरो बल्बच्या उजेडात कशी वाचतेस तू? काय मिळणार आहे तुला इतका त्रास करुन घेऊन?" रुपाने असे काळजीने मैत्रिणीला विचारताच सोनमने तिला एक म्हण ऐकवली,


"रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल! रुपा फार काळजी करु नकोस. मी अभ्यास करण्यासाठी हे दोन तीन वर्षे जागरण करत आहे. माझे लग्न स्वत:च्या कमावलेल्या पैशांनी करावे अशी माझी इच्छा आहे. मी हुंडा घेणाऱ्या मुलाशी लग्न करणार नाही त्यामुळे साधेपणाने लग्न करायला जो खर्च येईल तोही मी करावा असे मला वाटते! त्यासाठीच मी एक व्यवसायिक कोर्स करताना डिस्टन्स लर्निंगमधे माझे ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यासाठी दिवसा कोर्सला जाते व रात्री ग्रॅज्युएशनचा अभ्यास करते. यामुळे एकाच वेळी दोन पदव्या हातात मिळतील मला. माझा शिकण्याचा वेळ वाचेल. मी लवकर नोकरी करू शकेल. माझ्या स्वत:च्या पायावर उभी असेल. ज्यामुळे मला घरात आर्थिक मदत करता येईल.


सोनमचे विचार-प्लॅनिंग ऐकून रुपा थक्कच झाली. आपणही असे काही ध्येय बाळगून आयुष्यात पुढे जावे ही शिकवण तिला नकळत मिळाली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational