स्वादआस्वाद komal's kitchen's

Action

4.0  

स्वादआस्वाद komal's kitchen's

Action

#सहनशक्तीचा अंत...

#सहनशक्तीचा अंत...

3 mins
384


संजना आणि निखिल च लग्न अरेंज मॅरेज होतं. दोघे एकमेकांना इतकेसे जाणत नव्हते. लग्नानंतर निखिल आणि संजना महिनाभर आईवडीलांबरोबर गावीच राहत होतें, संजनाचे दिवस सासुसासरे आणि नवऱ्याबरोबर मजेत जात होतें. तिचे सासुसासरे देवमाणूसच होतें. अगदी मुलीसारखं जीव दोघेही संजनाला लावत होतें. तिला मनातही येई नक्कीच गेल्या जन्मी खूप पुण्य केलं असेल त्यामुळे एवढं प्रेम करणारे सासुसासरे मिळाले. तीही कामात चोख होती. त्यामुळे सासूबाईंना तिचं कौतुकच वाटे. निखिलची सुट्टी लग्नानंतरची आता संपत आली. शहराकडे जाण्याचा त्याने निर्णय घेतला. तसं आईवडिलांनाही सुचवलं . निखिलने दोन दिवस आधी जाऊन त्याच्या प्लॅटची स्वच्छता केली. नंतर संजनाला घेऊन शहराकडे रवानगी केली.


निखिल संजना दोघेच शहराकडे राहायला आले. कामाच्या ठिकाणी जवळच त्यांनी प्लॅट घेतला होता. प्लॅटमध्ये राहायला यायच्या आधी निखिल ने स्वतः प्लॅट स्वच्छ केला. घरातील केर, फरशी पासून कलरिंग केलेले घर स्वतः धुवून पुसून काढलं.


निखिल स्वच्छतेच्या बाबतीत खूपच जागरूक होता. त्याला लहानपणापासूनची सवय होती, " स्वच्छतेची. त्यामुळे त्याला गलिच्छपणा, घाणेरडापणा अजिबात सहन होतं नसे.


लग्नानंतरचे दिवस आनंदाने गेले. निखिल तसा संजनाला मदत करी. आता मात्र त्याच कामाचं वर्कलोड वाढलं होतं. तरीही संजना सर्व घरातील जबाबदारी हसतमुखाणे करत होती. तीही घरातील स्वच्छता राखत होती . दिवसेंदिवस निखिलचा स्वभाव वर्कलोड मुळे बदलत चालला होता. तो जरा चिडचिडा बनला होता. हे संजनाच्या लक्षात आले होतें. त्याची जास्त प्रमाणात चिडचिड वाढली होती.


संध्याकाळी निखिल घरी आला. संजनाने भेंडी, चपाती , डाळ भात असं त्याच्या आवडीचे जेवण केलं होतं. आज त्याने चपाती मऊ नाहीत म्हणून खाल्लीच नाही. संजनाला खूप वाईट वाटले निखिल डाळ भात खाऊन झोपायला निघून गेला.


दुसऱ्यादिवशी सकाळी पावसामुळे कपडे वाळलीच नसल्याने त्याची सकाळीच चिडचिड सुरु झाली. रागातच टिफिन घेऊन ऑफिसला निघून गेला. संजनाला त्याच्या स्वभावाची भीतीच वाटू लागली होती.


संध्याकाळी सहाच्या आधी संजनाने सगळं व्यवस्थित असं काम आणि स्वच्छता करुन ठेवली, पण येतानाच तो रागातच घरी आला होता, आला की समोरच्या पंख्यावर त्याला कोळ्याने केलेली जाळी दिसली. ती जाळी पाहताच संजनावर खेकसलाच....! "संजना घरात लक्ष कुठे असतं....?' हे बघ घरात किती जाळ्या झाल्या आहेत .....घरात असतेस," लक्ष कुठे असतं तुझं....?


संजनाला आता खूप रडू येत होतं, ती पाणी आणण्यासाठी आतमध्ये निघून गेली .

दिवसेंदिवस संजनाला आता नवऱ्याची भीती वाटू लागली होती. तीला तो सासुसारखाच भासू लागला होता.

तिने कितीही चांगलं करण्याचा प्रयत्न केला तरी तो काहीतरी खोट निखिल काढतच होता.


आज सकाळी सकाळीच निखिलचा मोठा आवाज ऐकून संजनाच्या हातून कप बशी खाली पडून फुटली.


निखिल, "माझ्या कपड्यांना इस्त्री पण केली नाहीस....??मी आज काय घालु....!


संजनाने आज रुद्र रूप धारण केलं होतं त्याच बोलणं तिला सहन होतं नव्हतं ," बास झालं निखिल....!!


मी पण माणूस आहे. दोन शब्द प्रेमाचे तर सोड....तू तर फक्त सासूबाईंसारखं हुकूम सोडत असतोस.


मला कर्तव्य कळतात...., पण मी ही माणूसच आहे. रोज हे केलं नाहीस.... ते केलं नाहीस... "कंटाळा आलय तुझ्या अश्या वागण्याचा....! सगळी जबाबदारी घरातील मी पेलते. तरीही त्यातून तू काहीतरी चूक दाखवतच असतोस. मला नाही होणार आता....! तुला जर वाटत असेल तर घरातील कामासाठी कामवाली ठेव....!


तुला तरी आठवत का.... तू माझ्याशी प्रेमाने कधी बोलास ते . घरात कामवाली आणल्यासारखं मला वागणूक दिलीस. गावाला ही मला सासूबाईंनी अशी वागणूक दिली नव्हती.


मला आता काही माहित नाही. मी जॉब करायला सुरुवात करणार आहे. कारण घरात मी कितीही केले तरी तू समाधानी राहणार नाहीस. माझा विचार ठरलाय....!


निखिल तिच्याकडे आवाक होऊनच पाहत होता. "किती तिच्या मनात साठलं होतं. आज ते बाहेर पडलेच. निखिलला आज त्याच्या वागणुकीचा खूप पच्छाताप झाला होता. " खरंच ती निशब्द राहत होती, म्हणून त्याचा पारा जास्तच चढत गेला.


आज त्याने तिला सॉरी बोललेच. सॉरी संजना ऑफिसच्या कामामुळे तुझ्यावर राग निघाला. त्यात सहकारी ही खूप त्रास देतात कामामध्ये....! त्यात बॉसचा त्रास वेगळाच....! संजना तू बोलीस ते बरं झालं....नाहीतर माझ्या लक्षातच आलं नसतं तुझ्या मनावर आघात होत आहेत म्हणून....!


निखिल.......,"संजना बरं झालं ते सोडून दे सगळं .. मोठया मनाने माफ कर.....!तुला काय आवडतं ते सांग मी लगेच घेऊन येतो.


संजना.......,"मला काही नको निखिल.

तू प्रेमाने बोललास, आणि सांगितले तरी मला खूप बरं वाटल. यापुढे चीड चीड करू नकोस. कारण एका गृहिणीला ते खूप अपमानस्पद वाटतं. त्यामुळे चुकलं तरी शांततेने सांगितलं तरी बरं होईल...!


निखिल तिच्याकडे पाहतच हसत बाहेर गेला. येताना तिच्यासाठी चॉकलेट आईसक्रीम् घेऊन आला. त्या आईस्क्रिम प्रमाणे संजनाचा राग आता विरघळून गेला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Action