Sagar Gadhave

Inspirational

3  

Sagar Gadhave

Inspirational

संवाद

संवाद

2 mins
296


जीवनाच्या वाटेवर खुप घडामोडी चालु असतात ,खाच खळगे ,चढउतार, कमी जास्त,चिंता वेैगरे वेैगरे.पण यामध्ये घडणावळ घडत असते हे कुठ माहीत असते?माणसाच चालण बोलण बदलल की समजुन जायच कुठ तरी चुकतय.


घडणं आणी घडवण भरपुर फरक यामध्ये ज्याला समजला तो खरा ज्ञानी,सध्याची परिस्थतीमुळे लहान मुलावर होणारे परीणाम भावी काळत भीषण रुप धारण करणार आहे.लाड खुप झाले पण धाक नाही राहीला .माझी एकच मुलगी आहे तीला कधीच परिस्थतीची जाणिव करुण नाही दिली.सगळ तिच्या मनासारख जे म्हणल ती तीच्या हातात.कधी नाही हा शब्द ऐकुन घेत नाही .हट्टी आहे थोड्या गोष्टीचा राग येतो.समजुन घेता घेता ती कधी मोठी होते समजलच नाही.मुलगी म्हणजे परक्याच धन अस माणल जात का?म्हणजे लग्न झाल म्हणजे तुमची कोणी लागत नाही तुमची जबाबदारी संपली.जोपर्यंत असे विचारसरणी जात नाही तोपर्यंत सुखीसंसार होत नाही!


कोणत्याही गोष्टीचे नव्याचे नऊ दिवस संपले का मग सुरु होतो पाठशिवणीचा खेळ.काळाच्या पुढ जाण्याच प्रयत्न करु नका . वेळ जरी तुमची असली तरी काळ तुमचा नसतो.वेळ बदलास वेळ लागत नाही तस मन बदलायला पण वेळ लागत नाही.


आताची लहान मुल होणारी नविन पिढी किती बदल होणार याची कल्पना करू शकता."हम दो हमारा एक".त्याचे होतात मग "पापा की परी नाही तर मम्मी के हेलिकॉप्टर ".घडणं कस होत जे आपण वागतो बोलतो ,मोबाइल पोगो TV यांच लहान मुलांना व्यसन लागलय.काहीतर जेवन सुध्दा करत नाही मोबाइल दिल्याशिवाय.


कुठतरी आपण चुकतोय जडण घडण जर चुकल तर सगळच विस्कटुन जात. जस वाट चालतना रस्ता चुकला ना पुन्हा मुळ वाटेवर येण्यासाठी कितीवेळ गेलेली असते माहीत नसते. कधी नाही म्हणायला शिका, समाजात कस वावराव लागत हे शिकवा,जो पर्यंत तुम्ही शहर बदलत नाही तोपर्यंत तुम्ही बाहेरच्या जगाशी संवाद साधत नाही तोपर्यंत जग समजणं अवघड आहे.


म्हणतात जग हाकेच्या अंतरावर आलय हे खर आहे पण हाकेच्या अंतरावर असलेल्या शेजारच्या घरामध्ये कोण मरुन पडलय हे माहीत होत नाही.माणुस फक्त जोडला गेलाय दुरवर पण जवळ बघायचाच विसरलाय.


लोकांचा विचार करण सोडुन द्या लोक जगुन पण देणार नाही आणि मरुन पण देणार नाही.जीवनात पुढ चालायच असेल तर भुतकाळ विसरा भविष्याची चिंता सोडा आणि फक्त वर्तमान काळात जगायला शिका.



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational