Vrushali Thakur

Action Thriller

4.0  

Vrushali Thakur

Action Thriller

तृष्णा-अजूनही अतृप्त - भाग १२

तृष्णा-अजूनही अतृप्त - भाग १२

18 mins
728


गडगडाटी हसत त्याने आपले दात विचकले. त्यातून हिरवे पिवळे दिसणारे त्याचे दात लखकन चमकले. त्या चमकण्यातही एखाद्या बिजलीच्या लखाखण्याचा भास होता. ओमला विचारही करायला वेळ न देता त्याने एकाच उडीत ओमवर झेप घेतली. काहीतरी होतय हे समजेपर्यंत करालची लाथ ओमच्या मानेवर पडली होती. लाथेच्या धक्क्याने तो उडून दोन फूट अंतरावर जाऊन धाडकन आपटला. लाथेच्या प्रहाराने व आपटल्याने त्याच सर्वांग चांगलच मोडून निघालं होत. सर्वांगातून वेदनेच्या कळा लहरत होत्या. आपले मिटणारे डोळे अर्धवट उघडत भानावर येण्याचा प्रयत्न करत असतानाच अजुन एक घाव त्याच्या डोक्यात पडला. त्या घावाने त्याच मस्तक भनाणून उठल. पुढील दणका सहन करण्यासाठी त्याच्या शरीरात नावालाही जीव उरला नव्हता. करालच्या पुढच्या प्रहारात त्याची हार होती... फक्त हार... सुडाच्या भावनेने पेटलेल्या करालला ओमच्या मृत्यूशिवाय दुसरे काहीच सुचत नव्हते. आपल्या हिरव्यागार हाताच्या मुठी घट्ट आवळून त्याने ओमच्या दिशेने धाव घेतली. ओमच्या समोर तर साक्षात मृत्यू त्याच्या दिशेने धावत येत होता. त्याच्या अर्धवट मिटल्या पापण्यांना करालच अवाढव्य धुड धावत येताना दिसत होत. जमिनीवर आपटल्याने कपाळावर पडलेल्या जखमांमधून रक्त पाझरत त्याच्या पूर्ण चेहऱ्यावर पसरलं होत. सर्वांग बेजार झालेलं, ओल्या जखमा व मुकामाराने बेजार होऊन त्याला बचावासाठी बाजूला होण्याची ताकद नव्हती. रक्ताळलेल्या डोळ्याच्या कोपऱ्यातून त्याने हळूच अवकाशात पाहिलं... अगदी काही सेकंद बाकी होते....मग सर्वच संपणार होत... हे जगणं... हा जीव... ही लढाई... आणि कदाचित ही पृथ्वीसुद्धा आपल्या दुखऱ्या हाताच्या मुठी कशाबशा आवळत व आपली अर्धवट तुटकी मान सावरत तो तयार होता.... बलिदानासाठी...

कराल काय करणार ते जाणवून ही सृष्टीसुद्धा गर्भगळीत झाली. झाडे फांद्या घासत तडफडू लागली. पक्षांनी व प्राण्यांनी घाबरून कर्कश्य ओरडायला सुरुवात केली. शांत झालेला वारा भीतीने सैरावैरा पळू लागला. आभाळातून हे युद्ध पाहायला गर्दी केलेल्या ढगांनी घाबरून आपले डोळे मिटून घेतले. एक वीज लखकन कडकडून खाली कोसळली.... आणि... करालने सर्व शक्तिनिशी ओमच्या अंगावर झेप घेतली. काही कळायच्या आतच एक मोठा काळीज फाडून टाकणारा स्फोटासारखा आवाज आला. सर्व काही संपलं ह्या जाणिवेने अख्खी सृष्टी स्तब्ध झाली.... आणि... करालच्या शरीराने पेट घेतला. तेवढ्याशा क्षणात काहीतरी घडल होत. त्या पेटलेल्या शरीराआडून स्फटीकाचा खडा अजुन तेजाने तळपत होता. त्या तेजाची तीव्रता वाढत जाऊन त्याने पूर्ण आसमंत व्यापून टाकला. ओमचा रक्ताने भिजलेला चेहरा त्या खड्याच्या तेजाने उजळून निघाला होता...त्याच्या चेहऱ्यावर एका विलक्षण समाधान पसरलं होत.... सुजलेल्या डोळ्यांतून नकळत एक आसू लवंडला... ओमची नजर पुन्हा आभाळात वळली. चंद्रग्रहण नुकतंच संपत होत....

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


आयसीयू वॉर्डमध्ये ती निपचित पडून होती. तीच्या निस्तेज पांढऱ्या पडलेल्या चेहऱ्यावर तिने काय काय भोगलं असेल हे समजून येत होत. बाजूलाच लटकवलेली वेगवेगळ्या प्रकारची बरीच सलाईन तिला जागवण्यासाठी निमुटपणे तिच्या शिरांतून वाहत होती. बाजूच्या मशीनवर वरखाली होत जाणारी रेषा तिच्या जिवंत असण्याचा दिलासा देत होती. कित्येक तासांपासून अजुनही तिला शुद्ध आली नव्हती. बाहेर गुरुजी, बाबा आणि ओम मलमपट्टी केलेल्या अवस्थेत तिच्या रूमच्या दिशेने पाहत होते. 

"अनयचे नातेवाईक...?" ऑपरेशन वॉर्डमधून बाहेर येत डॉक्टरांनी विचारणा केली. 

"आम्ही..." गुरुजी, बाबा व ओम एकसाथ ओरडले. 

"घाबरु नका.... छोटंसं ऑपरेशन होत... तासाभरात शुद्धीवर येईल पेशंट...आणि दोन दिवसांत बरा पण होईल... " बाकीची प्राथमिक चर्चा करून डॉक्टर आपल्या केबिनच्या दिशेने निघून गेले.

बंगल्याच्या मागच्या बाजूला त्यांना अनय जखमी अवस्थेत आढळून आला होता. अंगभर बर्फाचा थर जमा होऊन तो जवळपास त्यात गोठून गेला होता. आणि छातीपासून पोटावर रक्ताचे ओघळ पसरले होते. तातडीने त्याला व तिला गाडीत टाकून ते हॉस्पिटलला घेऊन आले होते. आल्यापासून सर्वांचाच अगणित प्रश्नांचा भडीमार त्या तिघांवरही होत होता मात्र इतक्या लढ्यानंतर तिघेही शारीरिक व मानसिकदृष्ट्या अत्यंत थकून गेले होते. शेवटी ताण सहन न होऊन तिघेही जाग्यावरच कोसळले. इथे दोघेही हे नवरा व बायको दोन वेगवेगळ्या वॉर्डमध्ये मृत्यूच्या छायेत जीवनाची झुंज देत होते. 

-----------------------------------------------------------------------

पहाटेचे साधारण तीन वाजले असावे. हॉस्पिटलच्या आत बाहेर एकदम शांतता पसरली होती. रुग्णांच्या नातेवाइकांना रात्री आत प्रवेश नसल्याने सगळ्याच वॉर्डचा मुख्य दरवाजा बंद होता. दिवसभर माणसांनी गजबजून गेलेले वॉर्डस चिडीचूप पडले होते. वॉर्डबॉईजही सगळ टेंशन झटकून कधीचेचं झोपी गेले होते. पॅसेजमध्ये अगदी नावाला मंद दिवे जळत होते. अंधुकश्या प्रकाशापेक्षा काळोखच जास्त भरून राहिलेला. त्या काळोखात एक सावली हळूच भिंतीच्या आधाराने खुरडत सरकत होती. पावलांचा आवाजही न करता ती सावली तिच्या रुमच्या दिशेने वळली. रात्रीच्या अंधारात दरवाजा जरा कुरकुरलाच. त्या आकृतीने वळून इथला तिथला कानोसा घेतला. दरवाज्याच्या आवाजाने कोणाचीच झोप तुटली नव्हती. त्या आकृतीने हलकेच सुटकेचा निःश्वास सोडला. उघड्या दारातून ती आकृती आत डोकावली. भिंतीवरच कॅलेंडर उगाचच थोड फडफडल. ती आकृती हलकेच आत शिरली. हॉस्पिटलमधल्या त्या सफेद बेडवर तिला अस पडलेलं पाहून त्याचा उर भरून आला. त्या रूमच्या खिडकीच्या फटांतून आत शिरणारे लाईटचे कवडसे तिची राखण करत होते. त्या अंधुक प्रकाशात एक कवडसा हळूच त्याच्या गळ्यातील ओमच्या लॉकेटवर पडला. त्यातील ओमचा खडा चमकू लागला. खड्याची चमक नकळत तिच्या चेहऱ्यावर पसरली. तिचा चेहरा आजही तितकाच निरागस होता. त्याने आपले डोळे मिटून घेतले. काही आठवायच नव्हतं त्याला... परंतु तरीही त्याने भूतकाळातील जपून ठेवलेली ती त्याच्या नजरेसमोर तशीच हसत उभी राहिली... तिची ते गोड हसण नेहमीच त्याच्या काळजाचा ठाव घ्यायचं... डोळ्यासमोरील हसणारी अल्लड ती... फक्त त्याचीच होती.... त्याच्या हृदयाची स्पंदन वाढली. न राहवून त्याने आपला थरथरता हात थोडा बिचकतच तिच्या डोक्यावर ठेवला. काहीतरी झालं त्या स्पर्शाने.... त्याच काळीज हेलावल... डोळे भरून आले... परंतु ही समोर बेडवर अशी पडलेली ती आता दुसऱ्या कोणाचीतरी होती... इतकी वर्ष तिच्या आठवणीत घालवल्यावर एका वळणावर अचानक भेट व्हावी ती ही ती दुसऱ्याची असताना... तिला पाहताच तो आतून हलला होता. पत्त्याच्या बंगल्यासारख त्याच मन क्षणात कोसळून गेलं होत. तिच्या सुखासाठी तो सर्व सोडून गेला होता. आणि ती मात्र.... त्याला आपले हुंदके आवरेनासे झाले. दिवसरात्र जिच्या सुखाची कामना केली होती ती मात्र बेशुद्धावस्थेत आपले शेवटचे श्वास घेत पडली होती... नियतीचा खेळ खेळून झाला होता.. आयुष्य फरफटवून पुन्हा अश्या वळणावर आणून ठेवलं होत की जिथे मागे फिरणं शक्य नाही आणि पुढचा प्रवासही जमणार नाही...पण पुढचा प्रवास गरजेचा होता.. नियतीपुढे त्याचं प्रेम हरणार नव्हतं... नजरेनेच तिचा निरोप घेत त्याने तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले.... शेवटचे... मागे अंधारात मात्र काहीतरी लुकलुकल. कोणीतरी होत त्यांच्यावर नजर ठेवून...

"ओम..." अंधारात एक आवाज घुमला.

"क... कोण..." ओम चपापला. ह्यावेळी इथे कोण असेल आणि....

"मी... अनय..." इतका वेळ मागच्या अंधारात लपलेला अनय त्याच्यासमोर आला.

"तू... इथे.." ओमच्या पोटात गोळा आला. भीतीने त्याचा चेहरा आक्रसला. त्याच्या कपाळावरच्या नसा तरारून फुगल्या. जे सत्य त्याने लपवून ठेवलं होत ते त्याने न सांगताही कोणालातरी समजलं होत. 

"तिची काळजी वाटत होती म्हणून आलो इथे... पण तू इथे कसा काय... तू ओळखतोस तिला आधीपासून... कसं...?" अनयच्या मनात खूप प्रश्न होते. ओमला मात्र काय बोलावे ते सुचेना. सत्य सांगावं आणि तिचा संसार तुटला तर.. आणि न सांगावं तर गैरसमज झाले तर..

"ओम प्लीज सांग ना...तू तिला आधीपासून कसा ओळखतोस..." अनय कळवळून ओमला विचारात होता. त्याच्या चेहऱ्यावर उभ राहिलेलं प्रश्नचिन्ह ओमला स्पष्टपणे दिसत होत. 

"आपण इथून बाहेर जाऊ या का..." ओमला तिथे काही बोलायची इच्छा नव्हती. उगाच अनय चिडला आणि तिला त्रास झाला तर... 

"चालेल..." अनयने पुढे होत तिच्या अंगावरची चुरगळलेली चादर नीट केली. ओमला नजरेनेच इशारा करत तो बाहेर निघाला. ओमने एकवार तिच्याकडे वळून डोळेभरून पाहिलं. तिला शेवटचं पाहताना त्याला आसू आवरले नाहीत. डोळ्यांतील भरलेल्या पाण्यात ती धूसर होत गेली.

-----------------------------------------------------------------------

सगळीकडेच पहाटेचा हलकासा काळोख पसरला होता. थोडीशी गुलाबी थंडी अंगावर शहारे आणत होती. घरट्यातून पक्षी उठायला कुरकुर करत होते. झाडेही अजुन झोपेतच होती. त्या रात्रीनंतर बऱ्याच दिवसांनी ते दोघेही हॉस्पिटलच्या औषधी वातावरणातून बाहेर निघाले होते. इतकी प्रसन्न पहाट हे आज पहिल्यांदाच अनुभवत होते. हॉस्पिटलपासून जरा दूर एका मोठ्या ब्रीजवर ते दोघेच उभे होते. ब्रीजच्या दोन्ही बाजूने विजेचे खांब दिमाखात उभे होते. मात्र दोघेही आपल्याच विचारात गुंग होऊन दूरवरच्या अंधारात हरवून गेले होते. ब्रीजखालून खडखड करत गेलेल्या मालगाडीच्या आवाजाने दोघेही भानावर आले. 

"अनय..." ओमच मन अजूनही चलबिचल करत होत. त्याला अनयच्या स्वभावाचा अजुनही अंदाज नव्हता.

"ओम... बोल.. मला जाणून घ्यायचंय..." अनयने हाताची घडी घालत ब्रीजच्या कठड्याला टेकत शांतपणे विचारलं. 

"अनय.. मी जे सांगतोय तो भूतकाळ आहे.. प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस..." ओमच्या नजरेत अजजी होती. तिच्याबद्दलच प्रेम व्याकुळ होऊन अनयला विनवणी करत होत. 

"लहानपणापासून आम्ही एकत्रच वाढलो... एकत्रच खेळलो... तेव्हापासून आमच्यात घट्ट मैत्री होती. एकमेकांशिवाय आमचं पानच हलायच नाही. दिवसभर कितीही भांडलो तरी रात्री नीट बोलल्याशिवाय आम्हाला झोपच यायची नाही. एकदा तर अस झालं की आमचं खूप मोठं भांडण झाल होत. इतकं मोठं की अगदी आमच्या आयानाही त्या भांडणात पडावं लागलं होत..." बोलता बोलता आठवणीत ओम स्वतःशीच खुदकन हसला. त्याच्या डोळ्यांसमोर छोटीशी फ्रॉक घातलेली ती कमरेवर हात ठेवून तावातावाने भांडत होती. " दिवस तर गेला नीट... पण रात्री एकट पडल्यावर तिची आठवण येऊ लागली... साधारण दहा वर्षाचा असेन मी... उगाच तिला बोललो अस होत होत. माझ्याच मनाशी पश्चात्ताप होऊ लागला. जाऊन तिची माफी मागायची होती परंतु इगो... तोच मध्ये येत होता. तिची आठवण तर येत होती मात्र तिच्याजवळ जायचं नव्हतं. रडायला तर येत होत पण रडू शकत नव्हतो. शेवटी रागातच न जेवता रूममध्ये येऊन झोपलो... ती पण जेवली नसावी कदाचित म्हणून मलाही जेवायचं नव्हतं. पोटात भुकेने कावळे तर ओरडत होते व रडून रडून डोकं दुखत होत. पण इगो मात्र मला कमीपणा घ्यायला देत नव्हता. मी तसाच डोकं व पोट दाबून झोपी गेलो. रात्री मात्र अचानक कोणाच्यातरी चाहुलीने झोप उघडली. ती बाजूला जेवणाच ताट घेऊन माझ्याकडे गाल फुगवून रागाने पाहत उभी होती. तशीही खूप गोड दिसत होती. " चल आता जेव.. उपाशी नको झोपू..." मला काही बोलायची उसंत न देता तिने भरवायला सुरुवात केली. मी मात्र तसाच ठोंब्यासारखा तिच्याकडे बघत फक्त तोंड उघडत होत. काय खाल्ल.. किती खाल्ल.. काही आठवत नाही. फक्त मला रागात भरवणारी ती आठवतेय.. तिचा तो निरागस रागावलेला चेहरा.. फुग्यासारखे फुगलेले तिचे गोबरे गाल.. रागाने व पाण्याने भरलेले तिचे डोळे... त्यानंतर नेहमीच ती बोलत गेली आणि मी ऐकत राहिलो. न बोलताच आमच्यात प्रेमाचा अंकुर फुलत गेला. कबुली कोणीच दिली नव्हती परंतु आमच्या डोळ्यातील होकार दोघांनाही समजला होता. मोठे होत गेलो तस प्रेमही बहरत गेलं आणि त्याची खबर तिच्या वडिलांपर्यंत पोचली. आमची जात, आमची गरिबी सगळच आमच्या प्रेमाच्या आड आल. तिच्या वडिलांच्या सामाजिक प्रस्थापुढे आणि तिच्या सुखाच्या काळजीपोटी माझं प्रेम झुकलं. मला काही झाल तरी चाललं असतं परंतु तिला झालेला त्रास मी सहन करू शकलो नसतो. तिच्या वडिलांना आमची मैत्री पसंत नसल्याने नेहमीच त्यांचे वाद व्हायचे. मला भीती होती की सामाजिक पत सांभाळण्याच्या नादात ती तर बळी नाही ना पडणार.. त्यापेक्षा मीच दूर निघून जाणं योग्य ठरणार होत... बरेच दिवस ती आजारी होती... मी तिला पाहिलंदेखील नव्हतं.. तिच्या वडिलांनी तिच्याशी संपर्क होऊ दिला नव्हता... माझा जीव कासावीस होत होता... त्या रात्री मी एकटाच होतो घरी. आईबाबा बाहेरगावी नातेवाईकांजवळ गेले होते.  तिचे वडील माझ्या घरी आले. मी तिच्या काळजीत विचार करत पडलेलो. तिच्या वडिलाना अचानक माझ्या घरी पाहून मी दचकलोच. नक्कीच काहीतरी वाईट घडणार असा विचार मनाशी चाटून गेला. कसातरी धडपडत मी उभा राहिलो. त्यांच्या नजरेत थोडे खुनशी भाव चमकत होते. मला काहीच बोलायला न देता त्यांनी बोलायला सुरुवात केली. " तू आणि तिच्यामध्ये काय चाललंय हे माहितेय मला... तुम्हाला वाटत असेल की कोणी पाहत नाही परंतु प्रेमात असलेले आंधळे असतात इतर लोक नाही. तुमच्या आमच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे जो कधीही सांधला जाणार नाही. त्यामुळे तू तिच्या आयुष्यातून दूर निघून जा.. " मला त्याच्याशी बोलायचं होत. कळकळून आमच्या प्रेमाची भिक मागायची होती. त्यांच्या शब्दातील धारेने कधीच माझ्या काळजावर वार केले होते. माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटलेला. कानाशिल तापून गेलेली. भीतीने एकेक शीर फुगलेली. मानेवरून घामाचे ओघळ वाहत होते. माझे कापणारे हात जुळवायचा प्रयत्न करत असतानाच त्यांनी अजुन एक घाव घातला. ' अन्यथा... तुमच्या ह्या दळभद्री प्रेमाचा डाग माझ्या इभ्रतीला लागण्याआधी तिला ह्या आजारातच संपवलं जाईल. व ह्या सगळ्याला तू जबाबदार असशील...' आपल वाक्य पूर्ण करून ते आल्यापावली निघून गेले. मी मात्र तसाच आपलं सर्वस्व गमावून स्थितप्रज्ञ बनून उभा होतो. माझा तर श्वासच हिरावून घेतला गेला. तिच्यासाठी मी आम्हा दोघांचं हृदय पायदळी तुडवून निघून गेलो... कायमचा... तिच्या आठवणींना कवटाळून... तिच्या वडिलांचा तेव्हाचा रुबाब, मानमरातब काहीच नाही राहील आता. त्या दिवशी गुरुजींसोबत त्यांना पाहून दचकलोच. त्यांना इतक्या करुण अवस्थेत पहायची इच्छा नव्हती. परिस्थितीने त्यांची गुर्मी तर उतरवून ठेवली पण नकळत शिक्षा मात्र तिला मिळाली.... झाल गेलं विसरून जा...पुन्हा नव्याने तिच्यासोबत संसाराला लाग... तूच तीच भविष्य आहेस. आणि ती फक्त तुझी जबाबदारी आहे." ओम पोटतिडकीने बोलत होता. अनय मात्र त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचत होता. 

  "पण तिला कळलं पाहिजे की तिला वाचवणारा तू आहेस. कदाचित तुझ्याबद्दल तिच्या मनात काही गैरसमज असतील तर... " फिरून फिरून पुन्हा ओमवरच अन्याय झाला होता. परंतु तरीही तिला सत्य समजणं गरजेचं होत.  

"नाही... अजिबात नाही. माझ्याबद्दल तिच्या वडिलांनी तिला काय सांगितलं ते नाही माहित पण आता तिच्यावर भूतकाळाची काजळी नको. तुमच्या संसाराला कोणाचं गालबोट न लागो... आणि तिच्या मनात तिच्या वडिलांची प्रतिमा नको डागाळायला... " ओम ओरडलाच. त्याच्या चेहऱ्यावर तिच्याबद्दलची काळजी स्पष्टपणे दिसून येत होती.

 

"पण…..ती माझ्यासोबत कधीच खूष नव्हती... ना लग्न ठरलं तेव्हा.. ना नंतर... मग कधीतरी हे प्रकरण चालू झाल... आणि आमच्यातील नात जवळजवळ संपलच.... तूच तिच्यासाठी योग्य आहेस…." अनय भावूक झाला. इतक्या दिवसांतील तिच्या वागण्याचं कोड त्याला आज जावून उलगडल होत. क्षणभरासाठी त्याला स्वतःचीच कीव वाटली आणि आपल्या फुटक्या नशिबाचा रागपण आला. कुठल्या जन्मातील पापाची शिक्षा मिळत होती देव जाणे. एव्हाना चांगलच उजाडलं होत. रस्त्यावर तुरळक वर्दळ चालू झाली होती. ओमची नजर अजुनही कुठेतरी शून्यात होती. त्याच्या डोक्यात काहीतरी चाललं होत. त्याच मन मानत नव्हतं पण बुद्धी कुठल्यातरी निर्णयाप्रत पोचत होती. आपल्या डोळ्यातील पाणी पुसत त्याने मनाशी काहीतरी ठरवल आणि ओमकडे पाहिलं. परंतु ओम तिथे नव्हताच... हा अचानक कुठे गेला आणि कधी.... त्याला काहीच समजत नव्हतं. त्याने कॉल करायला फोन हातात घेतला तर स्क्रीनवर अनेक मिसकॉल झळकत होते.. नक्कीच हॉस्पिटलमध्ये गडबड उडाली असेल... बापरे.. समोरूनच येणारी रिक्षा पकडुन तो हॉस्पिटलच्या दिशेने निघाला.

----------------------------------------------------------------------- 

तिने थोडीफार फडफड करत डोळे उघडले. डोळे उघडताक्षणी अंधुक नजरेला अनपेक्षितपणे पांढऱ्या भिंती व हिरव्या पडद्याच्या आड बसलेले तिचे बाबा व गुरुजी दिसले. सर्वांगाला ठीकठिकाणी बँडेज गुंडाळल्या अवस्थेत त्यांना पाहून ती खजील झाली. आधीच फिकट पडल्या तिच्या गालांवर अजुन पिवळट छटा पसरली. काही गोष्टी तिला आठवत होत्या.. पण... काहीतरी हरवल्याची जाणिव होती. नक्की काय घडतंय ते समजत नव्हतं पण अचानक भीतीने पोटात गोळा येऊ लागला.

"माफ करा मला.." तिच्या डोळ्यांतून मागच्या काही महिन्यांतील घटना पश्चात्ताप बनून अश्रूंवाटे वाहत होत्या. " मी चुकली.. खूप चुकली.." तिला हात जोडून माफी मागायची होती परंतु सलाईनच्या विळख्यात तिचे हात जखडले होते. तिच्या मलूल झालेल्या हातात माफी मागायचेही त्राण उरले नव्हते.

"झालं बेटा.... संपलं ते..विसरून जा ते.." हळुवार शब्दात बाबा तिला उत्तरले. खरतर त्यांना तिला खूप काही समजावयाच होत परंतु ही वेळ योग्य नव्हती. नियतीने तिच्यासमोर अजुन एक परीक्षा मांडून ठेवली होती. आणि त्याच चिंतेत बाबा व गुरुजी विचार करत होते. त्यांच्या मनातल्या विचारांचं द्वंद्व त्यांच्या आठ्या पसरलेल्या चेहऱ्यावर दिसून येत होत.  

"बाबा... अनय..." मागच्या सगळ्या प्रकारात सर्वात जास्त त्रास अनयलाच झाला होता.... मानसिक... शारीरिक... केवळ माफी मागून त्याचा झालेला त्रास भरून निघाला नसता परंतु.... " बाबा..." भरल्या डोळ्यांनी तिने पुन्हा आपल्या वडिलांना प्रश्न केला.  

बाबांनी प्रश्नार्थक नजरेने गुरुजींना पाहिलं. त्यांच्याही चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होत. नजरेनेच खाणाखुणा करत त्यांनी काहीतरी सुचवलं पण बाबांच्या ओठांतून शब्दच फुटेनात. 

"बाबा.... अनय... कुठे आहे..?" तिच्या विचारण्यात व्याकुळता होती. आपल्या मूर्खपणामुळे आपण त्याला गमावलं तर नाही ना ह्याची भीती होती... 

"अनय... अनय.. अचानक..." त्यांना बोलवत नव्हतं. अनय व ओम दोघेही कुठे गायब झाले होते हे त्यांनाच माहीत नव्हतं तर तिला कसं सांगणार आणि जर तिला ओमबद्दल समजल तर काय होईल ह्या विवंचनेत ते अडकले.  

"बाबा.. अनय काय....?" ती जवळपास किंचाळली. तीच सर्वांग रागाने थरथरू लागला. बाबांच्या तोंडून आता काय निघेल ह्याची जाणीव होऊन ती आतल्या आत कोलमडत होती. तिच्या डोळ्यांसमोर ती रात्र उभी राहिली...


  ती पूर्णपणे त्या शक्तीच्या कह्यात होती. ओमच्या सुचनेप्रमाणे अनय भराभर राखेने रिंगण रेखाटत खिडकीजवळ पोचला होता. आत काय चाललंय ते डोकावून पाहण्यासाठी त्याने सहजच खिडकीची काच ढकलली. आत कसल्याशा हवनाची तयारी मांडलेली होती. एक भलामोठा यज्ञ ढणढणत जळत होता. बाजूलाच एका शैयेवर ती नखशिखांत सजून त्याच्या प्रतीक्षेत उभी होती. त्याच्या प्रेमात चिरविहिरणी होऊन त्याच्या प्रणयात न्हाऊन जाण्यासाठी ती उतावीळ होती. तिचे हे भाव तिच्या नटलेल्या सलज्ज चेहऱ्यावर अनयपासून लपून नाही राहू शकले. एक पती म्हणून त्याच्या आत द्वेषाची आग उफाळून आली मात्र त्याच सोबत मनात तिची काळजीही होती. कदाचित जर त्यांचा प्रणय ही शेवटची पायरी असेल तर तिचा वापर झाल्यावर तिचा अंत निश्चित होता. काळजात भडकलेली आग तिच्या काळजीने तक्षणी विरून गेली. क्षणभर त्याला स्वतःचाच राग आला... ती काय अवस्थेत अडकली आहे आणि मी... शी... खिडक्यांचे गज मोठे असल्याने त्यातून आत घरात सहज जाणे शक्य होते. शर्टच्या बाह्या मागे सारत तिला समजणार नाही अशा बेताने खिडकी ढकलून त्याने आत उडी मारली. कितीही हळुवार आत जायचा प्रयत्न केला तरी त्याच्या बुटांचा आवाज झालाच. त्या आवाजासरशी ती पटकन मागे वळली. तिच्यासाठी तीच एक सावज स्वतःहून चालत मृत्यूच्या दाढेत आल होत. अनय आत आला खरा मात्र स्वतःहून तिच्या तावडीत सापडला. त्याला पाहताच तिने आपलं नाजुकस नाक फेंदारल. अनय काही हालचाल करायच्या आधीच तिने जोराने त्याच्या पोटात गुद्दा मारला. बेसावध असल्याने तो बऱ्याच वेगाने मागे कोलमडून खिडकीला आदळला व त्या धक्क्याने खिडकीच्या काचा फुटून इतस्ततः खाली पडल्या. ती त्वेषाने दात ओठ खात त्याच्या दिशेने रागात चालत येऊ लागली. जास्त पुढे आली तर त्या फुटलेल्या काचा तिच्या पायात घुसतील म्हणून अनय बेचैन झाला. " थांब..." त्याने तिला अडवयाचा प्रयत्न केला. पण तिच्या कानात त्याचे शब्दच शिरत नव्हते. उलट त्याच्या हावभावावरून ती अजुनच चिडली. 

काहीही करून तिला रोखायला हवं. त्याला हातातील मंतरलेल्या राखेची आठवण झाली.क्षणासाठी आपला श्वास रोखून तो सावध होत पवित्रा घेतला. ती जवळ यायच्या आत त्याने पोतडीतील मुठभर राख तिच्या दिशेने उधळली. राखेचा स्पर्श होताच ती जागीच थबकली. तिच्या सर्वांगाला वेदना होऊ लागल्या. असह्य वेदनेने की ओरडू लागली. तिला अनयवर हल्ला करायचा होता मात्र एकच जागी खिळली गेल्यामुळे ती काहीच करू शकत नव्हती. हळू हळू तिच्यावर भारी असलेला करालचा प्रभाव क्षीण होत होता मात्र तिच्या चेहऱ्यावरचे रागीट भाव किंबहुना वेदनेमुळे अजुन तीव्र झाले होते. तिला क्षणाचीही उसंत न देता त्याने लगबगीने तिच्याभोवती राखेच रिंगण रेखाटलं. हवेत राखेची धूळ अजुनही असल्याने ती फक्त गुरागुरण्याशिवाय अजुन काहीच करू शकत नव्हती. राखेच्या रिंगणात तिला एखाद्या बळीच्या बकऱ्यासारखी पडलेली पाहून त्याच्या काळजाला चरे पडत होते. मात्र काही इलाज नव्हता. ही वेळ भावनेच्या भरात वाहून जायची नव्हती. अजुन पूर्ण घराचं रिंगण बाकी होत... बाकी सर्व दैवाच्या हातात टाकून तो पळतच बाहेर निघाला...

अचानक त्याला काहीतरी आठवलं... तो जागीच थबकला... जड मनाने पुन्हा तिच्या दिशेने आला... ती जमिनीवर शरीरातील त्राण संपल्यासारखी निर्जीवपणे पसरली होती. साडीचा पदर घसरून पोटावरून खाली पडला होता. कित्येक वेळ आरशासमोर उभ राहून सुबकपणे बांधलेले केस सैलावून चेहऱ्यावर पसरले होते. हात जोरात आपटल्याने तिच्या आवडत्या गुलाबी सोनेरी बांगड्या फुटून त्यांच्या काचा सर्वत्र विखुरल्या होत्या. तिला अश्या अवस्थेत पाहून पुन्हा त्याच काळीज हेलावल. आपल्या थरथरत्या हाताने त्याने तिच्या गुलाबी गालांना स्पर्श केला. तिला स्पर्श करताच त्याला स्वतःचे अश्रू आवरले नाहीत. एका हाताने उगाचच त्याने आसू पुसायचा प्रयत्न केला. त्याच्या आसव पुसण्याच्या प्रयत्नाला न जुमानता एक आसू नकळत तिच्या कपाळावर विसावला. त्यानेही पुन्हा त्याला पुसायचा प्रयत्न केला नाही. कापऱ्या हातांनी बटव्यातील चिमुटभर राख त्याने तिच्या कपाळाला लावली. विस्कटलेल्या बटांना दोन्ही हातानी सावरत तिच्या चेहऱ्यावरून दूर सारल. घसरून खाली पडलेला पदर पुन्हा उचलून पुन्हा तिच्या अंगावर लपेटला. व एकवार तिच्याकडे पाणीभरल्या डोळ्यांनी पाहत पुन्हा खिडकीच्या दिशेने निघाला. एव्हाना बाहेरच वातावरण बरच बदललं होत. असह्य थंडीची जीवघेणी लाट पसरली होती. अंधारभरल्या परिसरातून थंडगार हवेचे झोत खिडकीवर आदळत होते. स्वतःच्या मनाला समजावत त्याने पुढे पाऊल टाकलं मात्र चुकून मगाशी तुटलेल्या काचांवर त्याचा पाय पडला. अचानक वेदना झाल्याने कळवळत त्याने पाय पकडला. परंतु त्या नादात त्याचा तोल जाऊन तो खिडकीवर आदळला. खिडकीची अर्धवट तुटलेली काच अगदी वाट पाहत असल्यासारखी भसकन त्याच्या पोटात घुसली. बाहेरून जोराची किंचाळी ऐकताच मागचा पुढचा विचार न करताच असह्य वेदना होत असतानाही त्याने स्वतःला खिडकीतून झोकून दिलं. पोटातला काचेसहित साचलेल्या बर्फाच्या कुशीत तो अलगद सामावून गेला.

----------------------------------------------------------------------

"बाबा.." आवाजासरशी सर्वांच्या नजरा दरवाजाच्या दिशेने वळल्या. दचकून ती तंद्रीतून बाहेर आली. एखाद्या चित्रपटासारखं अगदी वेळेत काहीतरी घडल होत. बाबा व गुरुजींचा डोळ्यांवर विश्वास बसेना. दरवाजात अनय त्याची तीच चार्मिंग स्माईल लेवून उभा होता. एक हात पोटावर घेत दुसऱ्या हाताने दरवाजा पकडून तो शांतपणे हसत होता. 

इतका वेळ धडधडत्या काळजाने बाबांचे शब्द ऐकायला कान टवकारलेल्या तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. तो तिच्यासोबत असावा असं वाटणार मन त्याला समोर पाहून अजुनच खजील झाला. अंग अस हॉस्पिटलमधल्या बेडवर जखडलेल नसत तर अत्यंत शरमेने कदाचित ती तिथून पळून गेली असती.  

"कसं वाटतंय..." तिला अस हतबल पडलेलं पाहून काळजीने त्याच्या पापण्यांत पाणी तरळल. त्याच्या पाणीदार डोळ्यात आजही तिच्यासाठी तेवढच प्रेम होत.

तिचेही डोळे भरून आले होते. इतकं काही घडून गेल्यावरही त्याने तितक्याच प्रेमाने तिची काळजी करावी... कसल्या मातीचा बनलाय हा माणूस... काळीज दगडाच असेल त्याच... नाहीतर इतके घाव देवून कधीच तुटून गेलं असतं... तिच्या मनातील विचार हुंदका बनून तिच्या गळ्याशी दाटले होते... तिला मनापासून माफी मागायची होती पण बोलणंच सुचेना. त्याला तिची अवस्था समजली असावी कदाचित.. काहीही न बोलता तो चुपचाप तिच्या उशाशी जाऊन बसला. आपल्या हाताने हळुवार तिचे केस कुरवाळत त्याने आपले मऊ ओठ तिच्या रुक्ष पडलेल्या कपाळावर टेकवले. ती स्तब्ध झाली.... हाच तो स्पर्श होता जो तो सगळीकडे शोधत होती... प्रचंड आपुलकीने ओथंबलेला... सर्व काही तिच्या जवळ होतं...तिच्या मालकीचं... ती हुंदके देऊ लागली.. स्वतःच्या कपाळ करंटेपणाचा तिला मनस्वी राग येत होता. 

"आय एम सॉरी..." स्फुंदत स्फुंदत तिने माफी मागायचा प्रयत्न केला. त्याच्याकडे पाहण्याची तिची हिंमतच होत नव्हती. आपले डोळे तिने घट्ट मिटून घेतले. पापणीच्या रेघांमधून फक्त पाणी ओघळत होते.

"श..... झालं ते झालं... विसरून जा सगळं.." अनय प्रेमभराने तिचा चेहरा न्याहाळत होता. रोज गुलाबासारखा टवटवीत फुललेला तिचा चेहरा आयुष्याच्या वणव्यात पार होरपळून निघाला होता. तिला अस कोमेजलेल पाहून त्याच्या हृदयात कससच होत होत. आणि तिच्या मनात साचलेल सगळ मळभ अश्रुंवाटे वाहून जात होत. 

तिच्या डोळ्यांतून आसू थांबत नव्हते. तिने किलकिल्या डोळ्यांनी अनयला पाहिलं. कपाळापासून हातापायाला सगळीकडे काही ना काही लागलं होत. पायांना मोठाल बँडेज बांधलं होत. पोटालाही जखम झाली असावी कारण आल्यापासून त्याने पोटावरून हात काही बाजूला घेतला नव्हता. एवढं सगळं होऊनही आपल्या हसऱ्या चेहऱ्यामागे त्याच्या जीवाची होत असलेली तगमग लपवण्यात तो बराच यशस्वी झाला होता. मात्र आसवांनी डबडबलेले डोळे त्याला धोका देऊन गेले. त्याच्या मनातील कळकळ त्याच्या डोळ्यांनी व्यक्त केली. आपल्याला वाचवण्यासाठी हे सगळे किती व कसे लढले असतील ह्याची त्यांच्या अवतारावरून तिला कल्पना आलीच होती. मात्र तरीही तिला अजिबात जाणून घ्यायचं नव्हतं न जाणो पुन्हा त्या शक्तीला आवाहन केलं गेलं तर...

"अनय.." तिला पुन्हा हुंदका फुटला. सारे प्रयत्न करूनही तिला स्वतःला आवरण जमेना. थकली होती ती विचार करून.. रडून... ती अलगद त्याच्याजवळ सरकली. 


त्याने आपला एक हात तिच्या हातात गुंफला. आपल्या ओठांनी हळुवार तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारली. प्रेमाच्या गारव्याने ती शहारली. तिने हळूच डोळे उघडून अनयला पाहिलं. तो अजुनही गोड हसत पाणीभरल्या डोळ्यांनी तिला पाहत होता. तिचे टपोरे तांबूस तपकिरी डोळे त्याची माफी मागत होते. " अनय.." तिला काहीतरी बोलायचं होत. 

"हं..." तिच्यावरील नजर जराही न हटवता त्याने हुंकार भरला. 

"माहित नाही ही वेळ आहे की नाही बोलायची पण... मी खरंच तुझ्या प्रेमात पडलीय.." लाजून तिला पुढे बोलणं जमेना. तिच्या पांढऱ्या पडलेल्या गालांवर नकळत गुलाबी चढली. तिचे निस्तेज पडलेले ओठ प्रेमाच्या जाणिवेने थरथरू लागले. नकळत तिने आपल्या बोटांची गुंफण अजुनच घट्ट केली. तिच्या हृदयाची धडधड त्यालाही ऐकु येत होती. तो काय बोलतोय ते ऐकायला तिचे कान अधीर झाले. 


त्याला तर काहीच सुचेना. जे ऐकायला तो इतके दिवस तरसत होता तेच आज अनपेक्षितरित्या ती कबुल करत होती. त्याच्या चेहऱ्यावरच हास्य अजुनच खुलल. तो अविश्र्वासाने तिला पाहतच राहिला. खरंतर त्याला नाचायचं होत पण तो इथे काहीच करू शकत नव्हता. " मी तर कधीचाच प्रेमात आहे... फक्त तुझ्या उत्तराची वाट पाहत होतो.. " 

-----------------------------------------------------------------------

आपल्या सोनेरी केसांना बाजूला करत ती अलगद त्याच्या मिठीत शिरली. अनयने आपल्या दोन्ही बाहूंच्या कवेत तिला घट्ट पकडल. त्याचे हात तिच्या मऊशार पाठीवर रेंगाळत होते. तिच्या सर्वांगावर हलका हलका शहरा फुलत होता. त्याच्या स्पर्शाने ती हळुवार त्याच्या मिठीत विरघळून जात होती. कितीतरी वेळ त्यांची अनावृत्त शरीरे एकमेकांशी संवाद साधत होती. प्रणयाचा भर ओसरल्यावर आपले श्वास आवरत ते पुन्हा पलंगावर विसावले. तिने प्रेमभरल्या नजरेने त्याला पाहिलं. तो ब्लँकेट नीट अंगावर घेण्यात व्यस्त होता. त्याला ब्लँकेटसोबत झटापट करताना पाहून ती खुदकन हसली. झाल्या प्रकारानंतर अनय तिला स्वीकारेल ह्याची बिलकुल खात्री नव्हती. बरच काही घडून गेलं होत आयुष्यात. नियतीने खूप न सुटणारे प्रश्न निर्माण केले होते आणि अनयच्या रुपात त्याची उत्तरही तिला दिली होती. अनयने तिला अलगद आपल्या मिठीत घेतलं. चढत जाणारी रात्र त्यांच्या प्रेमाची साक्ष देत होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Action