manisha deshmukh

Drama Crime Inspirational

4.3  

manisha deshmukh

Drama Crime Inspirational

वाचा आणि थोडा विचार करा

वाचा आणि थोडा विचार करा

3 mins
241


सर्वीकडे थंडगार वातावरण होते, पावसाच्या धारा अंगाला स्पर्श करत होत्या

ओठांवर ओघळून मनात साठत होत्या... अशातच तो माझ्यासमोर आला , माझ्याकडे टक लावून बघत होता मी निस्तब्ध एका ठिकाणी उभे होते, तो अजूनच माझ्या जवळ आला अन माझा हात हातात घेत मला म्हणाला,....

" तू मला आवडतेस " 

अन माझे उत्तर न ऐकता तो तिथून निघून गेला....

मी पण माझ्या कामाला लागले, तो दिवस मी विसरूनही गेले पण तो परत माझ्यासमोर आला अन तेच वाक्य बोलून गेला....

यावेळेस मी सांगून टाकले की तू मला आवडत नाहीस त्यामुळे माझा नाद सोड...

पुन्हा मी माझ्या कामात व्यस्त झाले, दिवसामागून दिवस गेले पण त्याचा त्रास मला होऊ लागला.... आता मी खडसावून सांगितले, पण तो जिद्दीला पेटला. मला सारख छळू लागला अन एक दिवस मलाच जाळू लागला.......

अस किती मुलीच्या वाट्याला आलंय. ज्यांचं आयुष्य असेच बरबाद झालं, ऐकताना थोडं विचित्र वाटल पण मित्रांनो माझ्या बहिणीसोबत असच काहीस घडत....

        अरे म्हणतात की तुझ्यावर खूप प्रेम करतो मग प्रेम करणारा माणूस कसा काय मारू शकतो?? अशा घटना रोज पेपर ला वाचत आहे. थोडावेळ हळहळ व्यक्त केली की नंतर सगळेच आपापल्या कामात व्यस्त होतात मग candel march चालतो. गरज आहे का त्याची??

आता वाटत की शिवशाही बरी होती, तिथे किमान स्त्रियांचा तर आदर होता. आता तर उदरात पण ती सुरक्षित नाही. आता आमच्या मातांना प्रशिक्षण द्यायला हवं की मुलींना घरकामाचे धडे न शिकवता स्वरक्षनाचे धडे शिकवा, मुलींना घरात न कोंबता प्रतिकार करायला शिकवा.... किती दिवस दुसरे मदतीला धावणार... शासनाने विविध प्रकारच्या सोई उपलब्ध करून दिल्या पण कधी कधी त्या हतबल होतात मग अशावेळी ती मुलगी कुठवर टिकेल म्हणून स्वसंरक्षण करता यायला हवे..... आज लिहताना माझा हात कापतो आहे ,हृदय गहिवरून येत आहे , डोळ्यात आसवे साचली आहे पण जाळताना त्याला विचार सुद्धा येऊ नये????? कित्येक मुली जळल्या, ऍसिड मुळे विद्रुप झाल्या त्यांची व्यथा मी शब्दात वर्णन करूच शकत नाही. पण त्याचं दुःख मी समजू शकते. कारण मी पण एक मुलगी आहे.... 

जर तुमच्या प्रेमाने कोणाचा जीव जात असेल तर तुम्ही प्रियकर म्हणून घेण्याच्या लायकीचे नाही... मला शाहजहान च्या प्रेमाची पण तेवढी किंमत वाटत नाही कारण त्याने सुदधा ताजमहाल बांधणाऱ्या लोकांचे हाथ कापले होते..... खरं प्रेम तर त्या सीता माईने केलं जिथे वनवास रामाला पण अग्निपरीक्षा माईने दिली. मला सांगा प्रेम हे सोबत असेल तर टिकते का??? तर नाही, मिराला शाम भेटला नाही म्हणून तीच प्रेम कमी झालं नाही, कृष्णाचा विवाह राधे सोबत झाला नाही पण आजही नाव कृष्णा आदी राधेच जोडलं जात.... प्रेम करायचं असेल तर तुमच्या पुस्तकावर करा, प्रेम करायचं असेल तर तूमच्या स्वप्नांवर करा, प्रेम करायचं असेल तर ध्येयावर करा, अन प्रेम करायचंच असेल तर आईवडीलावर करा कारण तिथून कधीच धोका भेटणार नाही... दुसऱ्यावर वेड्यासारखं प्रेम करण्यात जेवढा वेळ घालता ना तेवढंच वेड्यासारखं स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी धावा...

जिद की थि उसको पाने की

तो जिद लगाकर पढ लिया

उसने भी उतनी मोहब्बत की यारो

की अफसर बनकर ही दम लिया....

याला म्हणतात प्रेम, 

याला म्हणतात वेडेपणा

अन याला म्हणतात ध्येयवेडे....

कोणाला जाळू नका

अन कोणासाठी मळू नका

फक्त एवढ काम करा की,

आई बापाला कधी धोका देऊ नका...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama