Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Anuja Dhariya-Sheth

Others

4.7  

Anuja Dhariya-Sheth

Others

स्त्रीत्वाचा प्रवास...

स्त्रीत्वाचा प्रवास...

3 mins
446


स्त्री म्हणजे परमेश्वराला पडलेले एक अद्भूत स्वप्न आहे... स्त्री मनाचा अर्थ कोणाला उलगडलेला नाही... कधी रेशमासारखी मुलायम होते तर कधी दगडासारख कठोर होते... तिच्या मनाचा थांग शेवट पर्यंत कोणाला लागत नाही... कारण स्त्री जन्माच्या प्रवासात साथ देणारी सखी म्हणजे मासिक पाळी... कारण तिच्या येण्याने आयुष्यच बदलून जाते... हि सखी आपल्याला स्वप्नांच्या झुल्यावर झुलवते.

"फुलले रे क्षण माझे फुलले रे......"


तर कधी असंख्य वेदना देते...वेदना म्हणजे, कशातच मन लागत नाही, विसरायला होतो, हात काम करत नाही.. कधी खूप बोलाव वाटत तर कधी कोणाशी बोलुच नये असे वाट्त... कधी रडाव वाट्त... अशाच एका सखीची कथा आपण बघणार आहोत...


सुमन मेनोपॉज जवळ आल्यामुळे वेंधळ्यासारखी वागायची... घरातच असल्यामुळे सर्वानी तिला गृहीत धरलेली... तिच्या प्रत्येक वागण्याला नाव ठेवणे...एकटीच विचारात हरवून जायची... मला काहीच कळत नाही... येत नाही अशी भावना तिच्या मनात यायची... कधी खूप रडायची... तर कधी घाबरून जायची... काय होतंय तें कळंत नव्हते तिला... पाळी अनियमित झाली होती... येताना खूप त्रास व्हायचा... पण काळजी घेणार कॊणी नाही... म्हणुन हतबल व्हायची....


पाळी आली तेव्हा आईने किती सोहळा केला होता... गोड शिरा... आजीने सोन्याचा दागिना... बाबा किती काळजी घ्यायचे... आता जाताना मात्र मी एकटीच सहन करते... कोणाला सांगूं? तेवढ्यात तिला आठवत काही दिवसात लॉकडाउन होणार आहे असे म्हणतायत... आपल्याला सर्व तयारी करायला हवी म्हणून ती यादी करते आणि बाहेर पडते... तिची मैत्रीण वसुधा तिला भेटते... तिला असे बघून वसुधा तिला समजावून सांगतें... स्वताचा विचार कर आता... योगा कर... सकाळी फिरायला जात जा... स्वतः आधी स्वताची काळजी घ्यायची.... तू आता स्वतः साठी जग... सगळ्यांच्या मागे पुढे करणे बंद कर.... कोणा वाचून कोणाचे काही अडत नाही बघ...


हा काळ खूप नाजूक असतो... एवढे वर्षे आपल्याला दर महिन्याला भेटायला येणारी आपली हि सखी म्हणजे आपली पाळी... आपल्या कुशीत बीज रूजले कि तेवढेच काय तें ९ महिने लांब राहते ग... परत आपल्या भेटीला येते... जाता-येता खूप त्रास देते... चिडचिड होते आपली विनाकारण... पण तिच्या मुळेच आपल्याला स्त्रीत्व आले... आई होण्याचे भाग्य लाभले... आणि आता ती हळू हळू आपली साथ सोडते अशा वेळेस चिडचिड करायची नसते ग... तिला प्रेमाने आणि समजूतीने घ्यायचे... आपले छंद, आवडी-निवडी आपणच जपायच्या... म्हणजे आपली चिडचिड होत नाही... अन कॊणी काही बोलू दे... स्वतः मात्र स्वतःला स्पेशल मानायचे... कि आत्मविश्वास वाढतो.. सर्वांवर प्रेम केलेस... आता स्वतःवर कर आणि मग् मला फरक सांग...


सुमन विचार करत करत घरी येताना तिने बघितलं.. मुलगी मस्त मैत्रीणींसोबत पाणी पुरी खात होती... तिला तिचे जुने दिवस आठवले... पाणी पुरी किती आवडायची तिला... तिथे नाही थांबली...पण घराजवळच अजून एक पाणी पुरी वाला होता... तिने सुद्धा मनसोक्त पाणी पुरी खाल्ली... खुप् छान वाटत होते तिला... बाहेरुन येताना सगळे खावून येतात आपापल्या मित्र-मैत्रिणी यांच्यासोबत काही ना काही, भूक नसली की मी केलेल्या कोणत्याही पदार्थाला नाव ठेवत असतात... त्यामुळे प्रत्येक गोष्टीत मी का त्रास करून घेऊ? आणि माझा आत्मविश्वास गमावू....


आईमध्ये काहीतरी फरक झालाय मुलाना जाणवत होता... पण कोणी काही बोलत नव्हते... लॉक डाउन आले सर्व घरात... आता कोरोनामुळे सर्वांच्या फर्माईश पूर्ण करता-करता तिच्या नाकीं नऊ यायला लागले... शेवटी तिने ठरवले, बस झाले... आता नाही ऐकायच कोणाचे... बाहेर बंद आहे म्हटल्यावर,मी देईन तें खातीलच.. तिने तिचे वागणे बदलले, तिच्यात झालेला हा बदल बघून सगळ्यांना आश्चर्य वाटत होते... ती सुगरण होतीच... फरक होता तो घरच्यांच्या नजरेत... आता तिला स्वतःला वेळ मिळू लागला... योगा करणे, गाणी ऐकणे... चित्र काढण असे तिचे छंद ती जोपासू लागली... त्यामुळे गमावलेला आत्मविश्वास परत मिळाला होता... आता ती खुशीत गुणगुणत होती... मीच माझ्या घरची राणी ग..!


Rate this content
Log in