नवरात्री चे नऊ रंग (रंग निळा
नवरात्री चे नऊ रंग (रंग निळा
1 min
223
पांघरूण आज ती निळेशार आकाश आली
शांत शीतल चेहऱ्यामागे असंख्य वादळे लपवून आली ।।
कोऱ्या कागदावर सांगे भावनेची खोलाई
निळ्या प्रतिबिंबितुन ही दिसे सागराची गहराई ।।
मोरपिसाच्या डोळ्याचा एक मखमली निळा
फुलतास दिसे तिथे लावण्य सोहळा ।।
निळा शाम . निळा राम निळा शिवही
सांगे भक्तीतून विषाचा घोट किती प्रवाही ।।