Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ashok Veer

Others

4.0  

Ashok Veer

Others

आली आली झुळूक

आली आली झुळूक

1 min
7


आली आली झुळूक वाऱ्याची,

घेऊनी धार ही पावसाची.

सोबतीला आणीला मातीचा गंध,

कसा करी बघा हा मनाला बेधुंद.

आली आली झुळूक वाऱ्याची...

आली आली झुळूक वाऱ्याची,

घेऊनी धार ही पावसाची.


हे थेंब टपोरे झेलू लागली,

सारीच चिमुकली हर्षूनी अशी गेली. 

आनंदले पशू पक्षीही सारे,

पिऊनी गार गार हे वारे.

आली आली झुळूक ही वाऱ्याची...

आली आली झुळूक वाऱ्याची,

घेऊनी धार ही पावसाची.


टवकारले कसे कान या पाडसाने,

फोडिला हंबरडाही त्या वासराने.

ऐकूनी हाक त्या वासराची,

धरीती वाट ती गोठ्याची.

आली आली झुळूक वाऱ्याची...

आली आली झुळूक वाऱ्याची,

घेऊनी धार ही पावसाची.


Rate this content
Log in