तो का ती ?
तो का ती ?
काय म्हणू तुजला
तो का ती अबला,
जागोजागी उभ्या दिसती
अशा या बाला.
जशी ही अर्ध नर
अन अर्ध नारी,
ही तर त्या विधात्याची
किमयाच न्यारी.
कोण असे त्यातला तो
तर कोण ती असे,
सारेच हे शंभू पार्वतीचे
अवतार जसे.
कोणास ठाऊक
कहाणी त्यांच्या जन्माची,
नका रे देवू उपमा
यांना हिजड्याची.
भोग असले का
त्यांच्या नशिबी यावे,
माणूस म्हणूनी यांना
समजूनी घ्यावे.
प्रज्वलित करूनी
किरणे ही आशेची,
वागणूक देवू त्यांना
आपणच सन्मानाची