Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sagar Jitendra Bangar

Inspirational Others

3  

Sagar Jitendra Bangar

Inspirational Others

आयुष्य म्हणजे

आयुष्य म्हणजे

1 min
1.1K


आयुष्य म्हणजे आणखी

वेगळं असं काय असतं,

समोर येणा-या संकटांचा

निर्भिड सामना करायचं असतं


दु:खानंतर आनंद मिळतो

याच आशेवर जगायचं असतं,

प्रेमळ नाती माणुसकीने जपत

आपलं जीवन गुजरायचं असतं


मनाच्या होणा-या फरफटीवर

संयमाचं पांघरुन घालायचं असतं,

दुस-याच्या सुखात आनंद मानून

दु:खातही सुखाला शोधायचं असतं


सर्वच मनासारखं नसतं होत, हे

जाणून पुढं चालायचं असतं,

हाव करत कशाच्याहीमागे

वा-यासारखं धावायचं नसतं


आपल्या अनावर भावनांना

बंधनाचं लगाम घालायचं असतं,

मनास असह्य वेदना देणा-या 

जखमांना विसरायचं असतं


दु:खाशिवाय जीवन म्हणजे

केवळ एक शुन्यच राहतं,

म्हणूनच दु:खांनाच आपण

आपलसं करायचं असतं


आठवणींच्या साठवणीत

सुख दु:खांना स्मरायचं असतं,

आयुष्य म्हणजे सांगा! आणखी 

वेगळ असं काय असतं?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational