Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

somadatta kulkarni

Inspirational

3  

somadatta kulkarni

Inspirational

बळीराजा

बळीराजा

1 min
170


प्रतिक्षा पावसाची करितो

बळीराजा आज हताश आहे

बरसेल कधी वरूणराजा

व्याकुळ नजरेने वाट पाहे १


पेरणी मी कशी करू देवा

पाऊस काही पडत नाही

रान सगळे ओसाड झाले

देवराजा आता तुच पाही २


झोपडीत अन्नाचा कण नाही

अस्तुरी माझी आहे उपाशी

सावकार सारे झाले गब्बर

खाती एक एक घास तुपाशी ३


देवा बरसू दे पाऊस धारा

तवा पिकतील शेतातून मोती

घर दार माझं मग सुखी होईल

चमकतील नयनांच्या ज्योती ४


जादा काहीच नको मजला

नको कोपूस वरूण देवा

असावा बळीराजा सुखात

देई त्यास आनंदाचा ठेवा  ५


बघ आयुष्य संपलं माझं राबताना

आता डोळे वर लावून बसलो

आस मजला देवा आहे कृपेची

पडता पाऊस मनात हरखलो ६


जादा काही देवा मागण नाही

मेघराजाची किरपा व्हावी

पिकं डोलावी वावरामंदी

एवढीच दया देवा करावी  ७



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational