छोटी परी
छोटी परी
1 min
8
छोटी नन्ही परी माझी
नभांगण पाहता हरवली
आकाशात चांदण्यांची
रास पाहता गुंग झाली. १
ईश्वराचे कौतुक न्यारे
छकुली विभोर जाहली
पाहूनी लिला नियंत्याची
भान आपुले हरपली. २
डोळे मिटून परी माझी
स्वप्न पाहते ती अंतरी
तिच्या स्वप्नात येतसे
स्वर्गातली गुलाबी परी. ३
परीला म्हणते सानुली
मजवर प्रसन्न हो सत्वरी
देई सुख समाधान मम
माता पितरांना झडकरी. ४