शब्द फुले
शब्द फुले
भावनांची फुले
गंध पसरला
भावनांचा मज
अर्थही कळाला १
मनाची आर्तता
शब्द रूप ल्याली
आणिक माझिया
मनाला भावली २
शब्द आम्हां धन
शब्द आम्हां शस्त्र
शब्दावीण नाही
नाही दुजे अस्त्र ३
शब्द काव्यमय
असावे सुंदर
एकच सांगतो
जपावे अंतर ४
काव्य मधुरतम
गोडवा नूतन
करूया ते नित्य
अंतरी जतन ५
नसता कविता
जीवनात काही
दास म्हणतसे
अर्थ काही नाही! ६