बरसणाऱ्या सरी...
बरसणाऱ्या सरी...
बरसणाऱ्या सरींचा
गुज ऐकू आलं,
थांब जरा
जपून टाक पाऊल,
काळंबेरं सैरभैर
मनात धावू लागलं,
चमकावी वीज जसं
आक्रोश मेघांचा,
कोसळावा पाऊस
दाट दुःखाच्या अश्रूंचा,
घोंगावणारा वारा
साद घालू लागला,
माझ्याशी वेग धरू नकोस
हेच सांगू लागला,
काळ्या अंधारात चंद्र ही
अंधुक झाला
एक जाणीव पण मनात ठसली
आपुलकीचा हात हातात असताना
काळजी का तुला भासली.