तुझा बहर...
तुझा बहर...
मनाची भावना
नाजूक ती किती ,
फुलपाखरांचे उधळलेले
रंग हि पडते फिकी ,
फुलाचं उमलन जितकं कोमल ,
त्याहूनही सुंदर
नात्यांचं आपलेपण ,
पानांचा रंग
तो हिरवा गर्द ,
विश्वासाचा अतूट गोडवा
हि इतका गडद ,
आठवणींची आशा ,
जशा धुंद त्या दिशा ,
पानापानावरती साजे
हृदयीच्या गोड आकांक्षा ,
सुंदर आठवणींचे गहिरे पिसारे ,
सुखद क्षणांचे गोड शहारे ,
आनंदाची ती लहर
जणू श्रावणातील
रम्य तो बहर