मनातलं चांदणं....
मनातलं चांदणं....
मनातलं चांदणं
आशेच्या नभी उतरलं ,
भावनांचा मेघ
उरी दाटून आला ,
सांगू लागला विरणाऱ्या
मेघांचे भास ,
जशी अवतरावी
सप्तरंगी नाती त्या क्षितिजात ,
सुखाचा लेणं घेऊन येइल
ती वाऱ्याची झुळूक ,
परतवून लावेल त्या
बरसणाऱ्या दुःखाच्या सरीला ,
उगवेल तो दिवस
जेंव्हा होईल नवी पहाट ,
चौफेर होईल उधळण
भरलेल्या आसमंतात ,
चंद्राची सावलीही लाजेल
पाहून ती...
कोमल गुलाबी पहाट