गुरू
गुरू
गुरूची महती | काय मी वर्णावी
कशी ती सांगावी |किर्ती त्यांची १
गुरू परब्रह्म | भुलोकी साक्षात
ज्ञान दान व्रत |आचरिती २
होता गुरू कृपा |स्वर्ग येई हाता
मिटे सर्व चिंता |आता काही ३
स्वतः आचरिती |मग शिकविती
आदर्श सांगती |सर्व जनां ४
गुरुच उद्धारी |नेई पैलतीरी
आहे एक भारी |गुरू माझा ५
तोच सांभाळितो |रक्षण करतो
पार करवितो |भवसागर ६
माझा सर्व भार | वाहती समर्थ
अन्य नसे अर्थ |दास म्हणे ७