खरी मैत्री
खरी मैत्री
सदाबहार मैत्रीत
रंग मैत्रीचे फुलले
दार खुलले
मनाचे ||१||
आपुल्या मैत्रीचे
रंग असे बहरले
क्षणात मोहरले
आयुष्य||२||
रंगीबेरंगी रंगांनी
रंगले जीवन मैत्रीचे
असे खात्रीचे
मैत्रीभाव||३||
फुलांचा संगतीने
दरवळला मैत्रीचा सुगंध
पसरला गंध
मनामध्ये||४||
आपली मैत्री
असे आयुष्यभराची आठवण
मनात साठवण
कायमची||५||
आपल्या दोघांची
मैत्री अशी असावी
साथ निभवावी
क्षणोक्षणी||६||
आपल्या दोघांची
असे मैत्री खरी
संकटात धरी
साथ||७||