सांताक्लॉज
सांताक्लॉज
सांताक्लॉज येता
खूश होतील मुले
आनंद फूले
चेहऱ्यावरी ||१||
सांताक्लॉज आणे
गिफ्ट किती छान
हरपते भान
मुलांचे ||२||
त्याच्या येण्याने
सारी मुले आनंदती
वाट पाहती
आवर्जून ||३||
सांताक्लॉजचे गिफ्ट
खूप सुंदर असते
मुलांना आवडते
नेहमीच ||४||
नाताळाच्या पूर्वसंध्येला
भेट घेऊनिया आला
आनंद झाला
बालचमूंना ||५||
पूर्ण करीतो
साऱ्या मनीच्या इच्छा
देतो सदिच्छा
सकलांना ||६||