करडी नजर
करडी नजर
1 min
13
काळे काळे डोळे
तरी म्हणती तीरळे
पण असे त्याची
भारी करडी नजर...
घारे घारे डोळे
बोले त्यांना मधाळे
पण असे त्याची
भारी करडी नजर...
निळे निळे डोळे
साहेब रुबाब मिळे
पण असे त्याची
भारी करडी नजर...
करडी नजर म्हणता
धाक असे त्यांचा
नकळत सर्व त्यांच्या
दोन हात लांबच...