तो ती ते
तो ती ते
तो ती ते
सगळे झाले गोळा
म्हणे आज घरी
जन्म माझा झाला...
वाजवत ढोलताशे
फेर धरला माझ्या समोर
आनंदले सगळे लहान थोर
वाटले पेढे गावभर...
आनंद दिला मी
काही तासांचा त्यांना
मला मांडीवर घेतच
आईने प्राण सोडला...
लक्ष होते सर्वांचे
मुलगा जन्माला आला
पण आईच्या तब्येतीचे
कोणाला होते सोयरसुतक?
मला जन्म घालण्या आधी
मुलगी नको करत
मोठ्या दिमाखात
गर्भपात केले साह-सात...
नको नको म्हणत
असतांनाही माझ्या आईने
वाजत गाजत मला
जन्माला घातले आज...
माझा जन्मदिवस
तीचा मृत्यूदिन ठरला
तरी ही तो ती ते
मग्न होते माझ्या स्वागतातच
माझ्या स्वागतातच!