Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

AnjalI Butley

Drama Classics

3  

AnjalI Butley

Drama Classics

गहन प्रश्न

गहन प्रश्न

1 min
7


गहन प्रश्न पडतो रोज

भाजीवाला येतो दारी

भाज्यांची नावे घेत

मारतो जोरात हाळी...


नजर त्याच्या गाडीवर

पडता वाटते मला

सुटेल गहन प्रश्न 

कोणती भाजी घेऊ...


भाजीगाडी जवळ जाता 

बघता नेहमीच्याच भाज्या

गहन होत जातो

प्रश्न अधिक अधिक...


भाजीवाला म्हणतो कसा

ही घ्या ताई

ताजी आहे भाजी

बाजारात भाव खाई ...


सिझनवाल्या भाज्या आणतो

उद्या खास तुमच्यासाठी 

पण दर त्यांचे

असेल गगनावर भिडलेले... 


मग म्हणू नका

का देतो महाग भाजी

बाजारात जा तुम्ही 

आणि करा खात्री...


येतो दारी भाजीवाला

त्रास वाचतो माझा

दारावरच मिळतो मला

दररोज ताजा भाजीपाला...


गहन प्रश्न रोजचाच

कोणती भाजी करू 

सुटता सुटत नाही

घेऊन रोज ताजी... 


मग समजवते स्वतःला

छोटे छोटे प्रश्न 

गहन करण्या पेक्षा

आनंद लुट... आहे त्याचा... 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama