प्रीती
प्रीती
तुझे शौर्य आता दिसू दे जगाला
सखी प्रेम माझे कळू दे जगाला
कुठे भाव आहे इथे भावनांना
जरा आपल्यावर हसू दे जगाला
तुझी आसवे तू मला दे शहाणे
तुझ्या हासण्याने जळू दे जगाला
गुलाबी फुलांनी लपावे कशाला
चिरे काळजावर करू दे जगाला
खरा धर्म प्रीती खरी जात प्रीती
मला प्रेम दे तू लढू दे जगाला