वादळासारखी
वादळासारखी
1 min
11
भेट ही आपली वादळासारखी
दोन डोळ्यातल्या आसवासारखी
मी निखाऱ्यापरी सारखा पेटलो
साजणी तू मला गारव्यासारखी
धावता धावता मी जिथे संपलो
तू तिथे जिंकली कासवासारखी
दाट अंधार मी तू उजेडातली
सूर्यमालेतल्या भास्करासारखी
वाळके रोप मी वाळवंटातले
तू मला भेटली पावसासारखी