जवळ घे
जवळ घे
कधीतरी असाच ये
कुठूनही क्षणात ये
तहान खूप लागली
ढगातल्या जलात ये
तुझेच गीत आठवे
गळ्यातल्या स्वरात ये
तुलाच माळ घालते
सजून मांडवात ये
कशास दूर दूर तू
मिठीत बंधनात ये
उन्हात तूच सावली
नभातल्या ढगात ये
तुझेच स्वप्न पाहते
पहाटच्या धुक्यात ये