स्वप्न
स्वप्न
दाटली डोळ्यांत स्वप्ने
उलगडू कोणाकडे
माझ्या मनाचा विचार
मांडू तरी कोणाकडे
लोटले कितीदा दूर
स्वप्नांना माझ्याच लांब
अंतरी घुमतो नाद
कुठेतरी आता थांब
सापडे मोकळा श्वास
नाही पुरता जीवनी
साचल्या मर्यादा पुढे
कसली फोल पर्वणी
नको उदास होऊस
समजाव वेड्या मना
पंखात लपले बळ
ताठ आहे तुझा कणा