दैनिक आनंद
दैनिक आनंद
पहाट उमले स्वच्छंदी
वाहे उत्साहाचा झरा
पाखरांचा किलबिलाट
पसरवे आनंद खरा
सोनपावली उगवे
रवी किरणे साजिरी
आकाशाची लाली दिसे
अद्भुत अन् गोजिरी
निसर्गाने दान द्यावे
अशी उज्वल संपदा
समाधानाने फुले
आयुष्याची बाग सदा
मानू या सुख जीवनी
मिळवूनी सहवास खरा
करू या मैत्री निखळ
ओलावा जपू या नात्यात जरा