AnjalI Butley

Abstract

3.5  

AnjalI Butley

Abstract

अक्षरांचे चक्रीवादळ

अक्षरांचे चक्रीवादळ

3 mins
116


जावद, काय ते जावड चक्रीवादळ येऊन धडकणार, हाय अलर्ट सांगितले आहे हवामान खात्याने... आजकाल इतके इंग्रजी शब्द वापरतो आपण मराठीत की ती माय मराठी पण गळा काढायची थांबली, हो नं?

दोन मैत्रिणीचा मोबाईलवर संवाद चालला होता! संवाद तीसरा माणूस येकणार म्हणजे त्याला गंमतच! 

काय सरड्यासारखे! हो सरडा कसा रंग बदलतो तसेच ह्या मैत्रिणींच्या गप्पांचे!

मोबाईलवर बोलतांनाही एकमेकींच्या हातावर टाळ्या काय देतात! एकमेकींचे गालगुच्चे काय घेतात!

प्रिया मनातल्यामनात हसत होती, आपण ही सरीताशी बोलतांना असेच करतो!

बरे झाले आठवण झाली करत प्रियाने हातातला मोबाईलवर बोटाने स्क्रिनवर खालीवर करत एक नंबर लावला.. हॅलो... हॅलो...

अरे भलताच नंबर लागला वाटत गडबडीत... कट करत.. बिझी असेल का, नंतर करू... नको आताच करते!

परत कॉल लावला सरीताला... हं बोल प्रिया, अग मी तुझीच आठवण काढत होती! तुलाच कॉल करायला मोबाईल हातात घेतला होता..

दोघी मैत्रिणी शेजारीच रहात होत्या.. गॅलरीत उभे राहुन ही समोरासमोर गप्पा मारता येईल एवढ्याजवळ राहातात,  पण... तेवढाच हातभार मोबाईल नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हायडरला व बनेगा इंडिया डिजिटल साक्षरतेला!. 

काय ग पाऊस पडतोय या डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी.. काल उन्हाळ्यांसारखे कडक उन्ह, आज पाऊस व थंडी दोन्ही!! उहिसाळा म्हणायचे!

अग विसरलेच मी, तुला कॉल कशासाठी केला होता... हं ते ९४व्या मराठी साहित्य संमेलनाची तयारी ग...

तु जाणार होतीस नं

नाही जमले जायला..

मग काय झाले? का नाही जमले?

पावसामुळे का?

नाही ग अक्षरांचे चक्रीवादळ आले नं म्हणून..

म्हणजे काय? बाबा काही बोलले का? की आई तुझी.. नाही तीचा सारखा तोंडाचा पट्टा चालु असतो नं म्हणून वाटले!

अग नाही तसे काही नाही..

निमंत्रण पत्रिका सार्वजनिक आहे,पेपरमध्येच, छापली आमंत्रण का निमंत्रण पत्रिका.. 

तु येणार का? संमेलन होत राहिल आपण आपल्या गप्पा मारत जाऊ, आणि मधुन मधुन पाहु काय चाल ले आहे ते..

ये सगळे कसे धास्तावले ते ओमिक्रॉन काय तो नविन करोनाचा भाऊ आलाय म्हणे अॉफ्रिकेतुन! कोणत्या तरी स्पर्धेसाठी आपल्या गावातील काही जण आफ्रिकेला गेले होते ते परत आले आणि घोर लावला!

अगं आता मी तुला संमेलना बद्दल विचारत होते तु विषय बदलला! 

हं तर झाली असेल सगळी तयारी, कॉलेजचे लोक आहे राबायला, नाही गं, निविदा काढून कामाचे नियोजन, खर्च करत आहे!

हे तु त्या शलाकाला विचारतेस का येणार का म्हणून? 

छान टाईमपास होईल, तीचा भाऊ असेल की आपल्याला गाडीतून ने जा करायला!

शलाकाला नको ग! अस करू लतिकाला विचारू.. ती चा भाऊ मला आवडतो तो पण असेल सोबत तर मज्जा येईल.. त्याची पण गाडी आहे.. मी त्याला विचारल तर भाव खाईल खुप म्हणून लतिकाला विचारायचे!

नको... नको... मला एक भनाट आयडायची कल्पना सुचली! आपण त्या कलापथका सोबतच जाऊ, पुस्तक दिंडी आहे, छान नटून थटून! आणि त्या मोठ्या सिलिब्रिटीज बरोबर सेल्फिपण काढता येईल.. 

हो आईडाय... भन्नाट, पण सकाळी साडे आठला सुरू होणार, लवकर उठावे लागेल! त्यात माझ्याकडे लाल ड्रेस नाही.. कालच इस्रीला दिला!

तुझे हे नेहमीचेच झाले.. पुस्तक़ दिंडी.. लाल ड्रेस काय सबंध.. अगं प्रिया आपण लग्नाला नाही चाललो.. एकतर कोणी आपल्याला ओळखणारे नाही, आपणच आहोत... पाऊस थंडी आहे आपली जिनस् घालु वरून पाहिजे ती ओढणी, शॉल घे, स्वेटर घाल!

ठेव तो फोन आता सरीता, प्रिया सरीताला म्हणते..

अग ते राहिलेच तु काय ते 'अक्षरांचे चक्रिवादळ' का म्हणत होती.. जावद एकले आताच हे काय तु अक्षरांच म्हणतेय... अक्षरा नाव आहे माझ्या मैत्रिणीच्या मुलीचे!! आणि स्वतःच हसते! अग मला 'अक्षरांच चक्रीवादळ' येत आहे म्हणजे काही तरी लिहायच आहे.. कविता.. हं कविता सुचतेय... मनात ते चक्रीवादळा सारख कमी दाब चा पट्टा तयार झाला पण अक्षरांचे अजून शब्द तयार होत नाही आहे, नुसतेच मनात सोसाट्याच्या वार्यासारखे घोघांवत आहे! कानात वीज कडाडल्या सारखे होत आहे! ढगांचा गडगडाट होतो तसा मोठा आवाज होत आहे! चक्रीवादळाने कसे नुकसान होत न दुसर्याचे तस काही तरी होत आहे, माहीत नाही कोणी ह्या आपल्या नगरीत आलेल्या साहित्यीकांना हाय अलर्ट सांगितले की नाही माझ्या सारख्या नवख्या साहित्यिकांचा जन्म होईल व एक नविनच चक्रीवादळ येईल.. हो चक्रीवादळ येईल! हं ह्या चक्रीवादळाचे नाव ठेवले आहे मी 'अक्षरांचे चक्रीवादळ' !

अक्षर ओळख नीट नाही, मराठीत लिहीता येत नाही, मराठीत बोलायची लाज वाटतेय पण आज म्हणे मला साहित्य लिहिण्याचे डोहाळे लागले!

साहित्य म्हणजे काय ते माहित नाहीपण मी तयारी करते हाडाची कार्यकर्ती...

प्रिया व सरीताचे फोनवर शाब्दिक भांडण काय होत आणि मी तुझ्याशी बोलणार नाही, तुझ्या सोबत संमेलनालापण येणारपण नाही.. जो तो तुझा कोण मित्र आहे न त्याच्या सोबत!!

ठेव तो मोबाईल खाली आता... म्हणे मी साहियीक, डिजिटल युगातली साहित्यीक! काय तर 'अक्षरांचे चक्रीवादळ' 

चेहरे पहा कसे वेडे वाकडे करत आहे ळ,थ,ड,ठ सारखे! हा...हा.... हा...!!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract