AnjalI Butley

Abstract Thriller

4.7  

AnjalI Butley

Abstract Thriller

गोंगाट

गोंगाट

4 mins
325


प्रवास म्हटले की प्रत्येकाचा उद्देश वेगळा, लहान मोठे सोबत असतील तर मधल्यांची काय अवस्था होते ते तोच जाणे!

पहिलाच विमान प्रवास आई वडिल, मुलांना घेऊन जायचे म्हणजे टेंशनच! सोबत काय घ्यायचे काय नाही, दहा वेळा चेक केले तरी लहान मुलांच्या खिशात काय सापडेल काय नाही चे टेंशन, किती ही वर वर हसरा चेहरा ठेवलातरी त्यामागे लपलेले टेंशन जाणकारांच्या नजरेतुन सुटत नाही!

सुरक्षापाहणी झाली तरी एका मुलाच्या खिशात नेल कटर सापडलाच! त्याने तो खेळणे म्हणून सुरक्षारक्षकाने बाजुला काढून ठेवलेल्या वस्तू काढून ठेवतात त्या ट्रेमधून उचलला, कोणाला कळलेपण नाही! उगाऊ कुठला!!

असाच छोटा दिड तासाचा प्रवास! विमान फूल होते, प्रवाशांनी फूल भरलेले!

बस, ट्रेनमधे जशी गर्दी असते तशीच गर्दी विमानात वाटत होती! 

कोणी कोणाच्याही सीटवर बसले आहे, गोंधळ गोंगाट चालु, हवाई सुंदर्यापण लांबुनच बघत होत्या, फक्त इंग्रजीत काय सांगत होत्या कोणास ठाऊक!!

त्यातील एक जण मोठ्याने आपाल्याच जागी बसा, विमान ऊडण्यास आपल्या गोंगाटाने उशिर होत आहे म्हणत होती! तरी कोणाचेच लक्ष तीच्याकडे नव्हते!

एक हवाई सुंदरी लहान मुलांच्या गोंगाटाने कानात बोट टाकत होती, तीला कापसाचा बोळा सापडला नसेल, आधी सारखे कॉटन बॉलस् विमान प्रवासात मिळत नाही!

विमानाचा दरवाजा बंद होता, खिडक्या पॅक बंद होत्या म्हणून बरे.. नाहीतर मुलांनी दारातुन बाहेर उडी मारायला व खिडकीतून हात बाहेर काढायला मागे पुढे पाहिले नसते! आई वडिल ही यांच्यामागे नीट एका सीटवर बसा म्हणून पळत होती पण ऐकणार कोण! 

मोठी माणसे सीटवर बसली होती, पण सीटबेल्ट कसा लावणार करत न लावताच बसले, पुढे असलेला ट्रे उघडून बसली होती!

मी गंमत बघत होती, काय करणार? 

त्यात बाहेर पाऊस पडत होता! विमान ऊडायला वेळ होत होताच!

कसे बसे मुले सीट वर बसली, सीटबेल्ट लावली, तरी काही नवआईंच्या मांडीवर एक एक मुल होतच!

मोठ्यांनीपण सीटबेल्ट लावला एकदाचा कसातरी!

हवाई सुंदर्यांनी काही कोणाला मदत केली नाही, सामान वरती ठेवायलापण नाही! आपले कृत्रिम हास्य घेऊन वावरत होत्या! आधी सारख्या विमानात हवाई सुंदर्या मदत करत नाही! खाण्यापिण्याचीपण चंगळ नसते!

निम्यापेक्षा जास्त आज लहान म्हणजे ६ महिने ते ६ वर्षवाली प्रवासी होते! 

हवाईसुंदरीने आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे सुरक्षेच्या सुचना दिल्या! कोणी एकल्या की नाही कोण जाणे! 

विमान एकदाचे सुरु झाले, आकाशात झेपावताच लहान मुलांचा परत गोंगाट सुरु झाला!

मला गोंगाट वाटला सुरवातीला पण त्यांच्या नजरेतुन बघितले तर ते आनंद घेत होते! एकमेकांना धीर देत होते, ओरडत होते! काहींनी तर थेट सीटवरच ऊभे राहुन आपला आनंद व्यक्त केला, एकाला बघून दुसरा, असे करत एक एक जण सीटवर उभे राहून एकमेकांना हात दाखवत होती, खिडकीतून बाहेर बघत होती, त्यांच्या कविता म्हणजेच पोयम् म्हणत होते.. अप अबाऊ द स्कॉय...! क्लाऊड... क्लाऊड... वैगरे! पांढरे पांढरे ढग खिडकीतून बघत होती, गंमत म्हणजे ती त्यांच्या आई वडील, आजी आजोबांच एकत नव्हती आपल्याच आनंदात होती...

एवढ्यात विमान एका बाजुला कलले, आणी मुल एकमेकांवर पडली पण ती हसत होती!

सीटवर उभे राहून लाईटचे बटन दाब! हवाई सुंदरींना बोलवायचे बटन दाब, खिडकीचे दारच उघड बंद कर! एकमेकांना टपल्या मार असे सगळे प्रताप गोंगाटात चालू होते!

एका सीटवरुन दुसर्या सीटवर पळ, अशी छान पळापळ चालु होती!

काही अगदी छोटी मुल मोठ मोठ्याने रडत होती!

शेजारी बसलेल्या एका आजींनी तर मास्क बाजुला करुन, आपल्या पर्समधुन छोटा आरसा व लिपस्टीक काढून आपले ओठ रंगवले! केस नीट केले!

पुढच्या सीटवर उभी असलेल्या मुलीने आजींकडे बघुन त्यांची नक्कलपण केली! तीची नक्कल बघुन दुसरीने केली!

एका आजोबांना भूक लागली पण खायला जवळ काहीच नव्हते! ते पाणी मागत होते ते कोणी बघीतले नाही पण ती समोर सीटवर उभी असलेल्या मुलीने पाहिले व ती मोठ्याने वॉटर... वॉटर करत वर असलेल हवाई सुंदरीला बोलवायचे बटन दाबले!

हवाई सुंदरीनेपण पटकन पाणी आणले व आजोबांना दिले!...

खाण, जेवण देण्याची वेळ झाली होती, ज्यांनी आधी जेवण घेणार म्हणून सांगितले होते त्यांनाच जेवण दिल्या गेले!

जेवणाचा वास बाकीच्यांच्या नाकात गेलाच असणार... यांना ही भूक लागलीच असणार कारण बर्याच जणांनी पैसे देऊन महागडा खाऊ विकत घेतला!

मुलच ती सांडवासांडवी करणारच... चालत्या विमानात पाणी खाली सांडव, जेवण खाली सांडव करत होते! 

त्यात दोघांची मारा मारी! कोका कोला कोण पिणार वरून ती बॉटल ते एकमेकांना फेकून मारत होते! त्यात ती एका आजोबांना बॉटल लागली! परत गोंधळ चालु झाला!

माझ्या मनात शंका कुशंका, विमान प्रवासात असा गोंधळ, काही झाल तर, समुद्रावरून विमान चालले आहे, हवामानही चांगले नाही! 

मनातली शंका मनातच ठेवावी! उगाच...शंका नको पण... आजतर सुरक्षेची ऐशी की तैशी चालली आहे ह्या आकाशात उडणार्या विमानात!

खाणे द्यायची वेळ संपली, थोड्याच वेळात विमान खाली आपल्या गंतव्य स्थानावर उतरणारची घोषणा झाली! 

पोटात दोन घास गेल्यावर मुलांचा गोंगाट दुप्पट सुरु झाला! 

मोठ्याने ओरडून त्यांना शांत करावे असे वाटले पण परत.. नको.. म्हणत गप्प बसले!

विमान धावपट्टीवर जोरात धडकले! मनात धस झाले!डोळे घट्ट मिटले, क्षणभर काहीच ऐकायला आले नाही, काही समोर दिसत नव्हते! मनात देवाचा धावा सुरु झाला! हो हे असे आपोआप होत बर का!

नंतर तोच मुलांचा गोंगाट सुरु झाला! कोण आधी उतरणार? काहींनी तर सीटवरुन उडी मारत सीट खालुन घसरत दारापुढे रांग लावली खाली उतरण्यासाठी! 

त्यांचा निरागसपणा छानपण वाटला पण त्यांना विमानप्रवासाचे गांभिर्य कोण समजुन सांगणार!

की आता विमान प्रवास असाच असणार सुरक्षेची तेवढी काळजी न करता!!

गोंगाट आता माझ्या मनात सुरु झाला.. थांबेल ना तो पटकन? सुरक्षा नावाखाली विमानप्रवास महाग आहे पण हा असा गोंगाटातला प्रवास करायचा?



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract