AnjalI Butley

Others

3.5  

AnjalI Butley

Others

खिल्ली स्वातंत्र्याची

खिल्ली स्वातंत्र्याची

2 mins
175


एकमेकांवर कुरघुडी करतांना आपण विसरुनच जातो, आपण काय बोलतोय ते.. नुकतेच स्वातंत्र्याचा अमृत मोहोत्सव साजरा करतोय, पद्दम पुरस्कार जाहिर झाले, अगदी शोधुन शोधुन उत्तम कामगिरी केलेल्यांना पुरस्कार मिळाले, त्यातच सिने क्षेत्रात कामगिरी केलेल्या नटीला पण पद्म पूरस्कार मिळाला, नटी नंतर असे काही देशाच्या स्वातंत्र्याबद्दल बोलली की तीचा पुरस्कार वापस घेण्यासाठी राजकारणी नेत्यांनी काही दिवस आवाज ऊठवला.. नंतर तो विरला.

देशाला मिळालेले स्वातंत्र हे आनंदाने स्विकारायचे तर त्यावर उलट सुलट चर्चा व एक मुद्दा जो राजकारणासाठी वापरला जातो, विविध लोकांनी त्यात सहभाग घेतला, हुतात्मे झाले. पण काहीच लोकांचे नाव, घराणेशाही पुढे आली... 

देशाचे स्वातंत्र असो की विचार मांडण्याचे, एक नागरीक म्हणून सगळ्या देशवासीयांना काही मुलभूत गोष्टी मिळाल्या आहे.

आज दिवाळी मेळाव्यात कुलकर्णीबाई आपले विचार मांडत होत्या, आज त्या ऐक्यांशी वर्षाच्या आहेत, व स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा ५-६ वर्षाच्या, स्वातंत्र्य लढ्यात सहभाग त्यांच्या आईवडिल व मोठ्या भावाने घेतला होता, भाऊ स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा झाला होता! वडिल स्वातंत्र्य सैनिक होते शिक्षक म्हणून काम केले होते, आईपण शिक्षिका होती! त्या त्यांच्या स्वातंत्र्य लढ्याच्या गोष्टी सांगायच्या!

स्वातंत्र मिळाले मग हिंदु मुस्लिममधले दंगे, हैद्राबाद, महाराष्ट्रा सिमा प्रश्न, मुसलिमांची बायकांवरची बळजबरी, धर्मांतर! जिवंत होतो तोपर्यंत वेगवेगळ्या कारणासाठी लढा देत राहायचे!

बाई म्हणून विचार मांडण्याचे स्वातंत्र कुठे होते? शाळेत मुलींना शिकवते म्हणून समाजाने वाळीत टाकल्याचा प्रसंग विसरायचा म्हटले तरी विसरला जातच नाही!

तुमच बरे आहे मुलींनी आता ह्या पिढीला एवढे स्वातंत्र मिळाले की त्यांना स्वातंत्र्याची किंमत नाही, स्वातंत्र्याची खिल्ली उडवत आहे!

आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे, पण ते मांडतांना आधीच खुप विचार करायला हवा...

मुलींनो, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात क़ाम करावे ह्या साठी शुभेच्छा, पण कधी कोणाची खिल्ली उडवु नका!

ऊतु नका मातु नका घेतला वसा टाकू नका, 

आपल्या देशाचा सन्मान आपणच ठेवावा, परत कोणा मुळेही पारतंत्रात राहण्याची वेळ येऊ नये!

स्वातंत्र्याचा उपभोग घ्या! ही तुम्हाला शुभेच्छा!

बाईंनी आपले विचार मांडले व मी विचारच करत राहिले, आपण तर कधी कोणाची गंमतीत खिल्लीतर उडवली नाही नं?


Rate this content
Log in