AnjalI Butley

Children Stories

4.0  

AnjalI Butley

Children Stories

मला वेळ नाही

मला वेळ नाही

3 mins
406


याला काही ही काम सांगितले तर नेहमीच न ना चा पाढा वाचतो, मी नाही जा,  मला वेळ नाही ताईला सांग काम!

आनंद नेहमीच काम करण्यासाठी वेळ नाही, हे माझे काम नाही करत असतो, आई तरी त्याला वेळेचे महत्व समजावून सांगत असते, हे माझे काम नाही ताईचे असे काही नाही सर्व कामे आपल्याला यायला पाहिजे, वेळ कोणावर सांगुन येते का?

आज ताई घरात आहे म्हणून तीनेच काम करायचे का? ऊद्या ती सासरी गेल्यावर कोण करणार? हा असा पसारा घरात तसाच राहणार का? तू केल्याने काही कमी पणा येणार नाही! मुलगा मुलगी असा भेदभाव करून चालणार नाही. मी बाई म्हणून काहीच करायचे नाही बाहेरचे असे म्हटले असते तर आज तू असा दिसला असता का? मी केलेच ना काम खंबिरपणे बाहेर पडून! 

अरे मी अशी अधून मधून आजारी पडते म्हणून तूला सांगते थोड तुझ्या भल्याचेच!

आई, हो ग कळतय मला, पण मी अभ्यास करतो न ग, म्हणून म्हटले वेळ नाही म्हणून, आता नाही म्हणत जाणार!! चल मी आणि ताई मिळून आता स्वयपांक करतो!

ताई करू का ग मदत तूला, मला ही भूक लागली आहे!

ताई हसते, व हो म्हणते!

ताई तीच्या वयापेक्षा खूप आधीच समजुतदार झाली, आईला मदत करत असे आपला अभ्यास सांभाळून, 

बाबा असतांना तीचे खूप लाड झाले होते, जे म्हणेल ते आईबाबा तीच्यासाठी करायचे!

आनंद पाच वर्षाचा असतांना एका अपघातात बाबांचे निधन झाले व काही समजायच्या आतच आम्ही पोरको झालो. आई आनंद व ताईकडे बघून आपले दुःख मनात दाबून बाबांच्या जागी काम करत होती, ती बाबांसारखीच शिकली असल्यामुळे हे शक्य झाले होते.. पण अॉफिसमध्ये जाऊन काम करणे, घरचालवण्यासाठी पैसे कमवणे, कमवलेल्या पैशाचा खर्चाचा मेळ जमवणे कठीण जात होत तीला! तरी ती हळुहळू शिकली!

आनंद छोटा असल्यापासूनच तीला त्याला वेळेचे महत्व पटवून द्यायचे होते.. बाबापण मला वेळ नाही करत बाहेर जाणे, घरात काही काम करण्यास नकार देत असे, नंतर करू, नंतर बघू करत असे!

वेळेवर अभ्यासास ऊठवणे हे आईचेच काम, आई आनंदला शाळेत वेळेवर पाठवण्यासाठी त्याच्या आधीच ऊठायची त्याचा डबा तयार ठेवायची!

एकदा आनंदला वेळ झाला झोपेतुन उठायला परीक्षा होती शाळेत, शाळेत पोहचायला वेळ झाला, अभ्यास नीट झाला नव्हता मग परीक्षेत गुण कमी पडले, 

आई रागवणार आता हे माहित होत, पण आई काहीच बोलली नाही त्याला! तुझे तुला समजायला हवे! मी थोडी आयुष्यभर पुरणार आहे तुला...

आनंद, चांगला मुलगा असला तरी, काम चुकार होता, सारखी आठवण करून द्यावी लागयची त्याला त्याच्या जबाबदारीची, वयाने छोटा असलातरी काय झाले? बाप नसलेले मुल-मुले आपसूकच त्यांच्या वयापेक्षा आधीच प्रौढ बणतात.. 

आई आजारी होती, तस बघीतले तर खूप गंभिर असे काही नव्हते पण ताप व अशक्तपणा असल्यामुळे अॉफिसला गेली नव्हती, ताईनेच घरातले आवरले व चहा सकाळचा नाष्ता केला.

आई नेहमी घेत असलेल्या गोळ्या संपल्या म्हणून आनंदला, अरे आनंद हे घे पैसे व ह्या गोळ्या शेजारच्या मेडिकलवाल्याकडून आण बर, 

आनंद आपला हो आणतो करत आपला अभ्यास करण्यात व्यस्त राहिला.. थोड्या वेळाने तो आईला दे आता आणतो गोळ्या म्हणून तीच्या जवळ गेला, आई काहीच बोलली नाही, त्याने हाक मारली पण ओ नाही म्हणाली आई, तो आईला हलवण्या जवळ गेला, तीला हलवले, पण आई काहीच प्रतिसाद देत नव्हती, त्याने ताईला हाक मारली, ताई घाबरली, तीने नेहमीच्या डॉक्टरांना फोन लावला, डॉक्टरांनी काही प्रश्न विचारली ती याची उत्तर देत होती, ताई रडायला लागली, आनंदला पण काही कळत नव्हते, तेवढ्यात डॉक्टर अॅंबूलन्स घेऊन आले, पटकन आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, अतिदक्षता विभागात अॅडमिटकरून उपचार सुरू झाले.

आई, उपचाराला प्रतिसाद देऊ लागली १-२ दिवसांनी थोडी तब्येत बरी झाल्यावर घरी आणले तीला. 

काळ आला होता पण वेळ नाही... 

आनंद, आपले अश्रू पुसत आईला म्हणाला आता मी 'मला वेळ नाही' असे नाही म्हणणार!

आईने आनंदला जवळ घेत त्याचे अश्रू आपल्या हाताने पुसले. तूलाच समजले हे बरे झाले करत दोघ ही हासत होते... त्यांचे हसणे येकून ताईपण आली व तीघे ही हसत राहीले थोड्यावेळ.. ताईने आनंदला म्हटले जा पटकन आपल्यासाठी चहा कर.. 

आधीचा आनंद पटकन म्हणाला असता मी नाही, मला वेळ नाही...

पण बदलेला आनंद, हसत पटकन चहा करायला स्वयंपाक घरात गेला!


Rate this content
Log in