Savita Tupe

Inspirational

4.0  

Savita Tupe

Inspirational

अनाथांचा नाथ

अनाथांचा नाथ

5 mins
206


   राहूल दोन दिवस झाले आश्रमाच्या वर्गणीसाठी बऱ्याच ठिकाणी फिरत होता पण कुठेही त्याचे काम होत नव्हते . तो खुप हतबल झाला होता .आजही पैश्याची काही सोय झाली नाही तर मुलांना आजही उपवास घडणार होता . 

  मनातून त्याला त्याच्या पप्पांचा खुप राग येत होता . त्यांच्यामुळेच राहुलला आज पैश्यासाठी असे वणवण फिरावे लागत होते .

 इतका मोठा व्यवसाय आहे , भरपूर पैसा आहे मग त्यातला थोडासा समाज कार्यासाठी खर्च झाला तर काय फरक पडणार होता त्यांना ?

   उलट या गरीब लेकरांची दुवा मिळत होती त्यांना पोटाला दोन घास मिळत होते तर . 

  आठ दिवसांपूर्वी झालेल्या त्यांच्या कंपनीच्या एका महत्वाच्या मीटिंगला राहुल गेला नाही म्हणून चिडून त्यांनी त्याला सगळ्या संपत्ती मधून बेदखल केले होते . त्याचे बँक अकाऊंट , त्याचे ATM कार्ड सुध्दा बंद केले होते . त्यात अजून भर म्हणजे त्याला कुठूनही मदत मिळणार नाही याचीही पुरेपूर काळजी घेतली होती त्या माणसाने . 

  राहुलचा समाजकार्याचा वसा त्यांना भिकारचाळे वाटत होता . त्याला जर परत घरी यायचे असेल तर त्याने हे सगळं सोडून त्यांचे ऑफिस जॉईन करावे अशी अट घातली होती. पण राहुल या मुलांमध्ये इतका गुंतला होता की त्याने त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी स्वतःच्या वारसा हक्कावर पाणी सोडले होते. आततायी पणाने आणि रागाने घेतलेल्या निर्णयामुळे आता मात्र तो खुप अडचणीत आलेला होता .

  विचारांच्या नादात तो बऱ्याच ठिकाणी फिरून थकला होता . कालपासून त्याच्याही पोटात अन्नाचा एकही दाणा गेला नव्हता .

  असाच फिरत असताना तो एका स्वामी मंदिराजवळ आलेला . आज गुरुवार असल्याने तिथल्या मठामध्ये महाप्रसाद चालू होता . त्याच्या मनात एक विचार चमकून गेला .

   राहुल मनातून अगदी श्रध्देने स्वामींचे नाव घेवून आतमध्ये गेला . तिथे असणाऱ्या मंदिराच्या पुजाऱ्याला सत्य परिस्थिती कथन करून त्याने दहा बारा जणांसाठी प्रसाद बांधून देता का म्हणून विचारले . त्यांनीही त्याला होकार देत पुरी , भाजी , भात आणि शिरा असा भरपूर प्रसाद बांधून दिला .

   स्वामींचे दर्शन घेवून , त्यांचे चरणी नतमस्तक होत त्याने मनापासून त्यांना मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी प्रार्थना केली आणि प्रसाद घेवून आश्रमात पोहोचला .

   सगळीकडे सामसूम वाटत होती . तिथे असणारी ४ पासून ७-८ वर्षे वय असणारी १० मुले भुकेने व्याकूळ होवून निपचित पडली होती . 

  राहुलने मनोजला आवाज दिला आणि लगेच सगळ्यांना जेवायला वाढायला लावले . 

  मनोज आणि राहुल डोळ्यात आलेले पाणी पुसत त्या भुकेल्या जीवांना एक एक घास भरवत होते . 

   दोन दिवसांपासून उपाशी असल्याने पोटात भर पडली आणि मुले शांत मनाने झोपली . 

  दोघांनी नंतर बाकीचे सगळं आवरलं आणि बाहेर येवून बसले.

  मनोज २२ वर्षाचा अनाथ मुलगा . काही दिवसांपूर्वी मनोज असेच भुकेपुढे लाचार होवून चोरी करायला गेला आणि पकडला गेला . त्याला लोकांच्या मारापासून वाचवून राहुलने त्याची चौकशी करून त्याला त्याच्या दुसऱ्या एका फ्लॅटवर घेवून आला .  

  मनोजने राहुलला त्याच्या सारख्या बेघर आणि बेसहारा मुलांची व्यथा सांगितली अन् राहुलचे मन हेलावून गेले .

    तेव्हापासूनच अश्या अनाथांना आसरा देण्याची बुध्दी राहुलला झाली आणि बघता बघता एका वर्षभरात मुले आणि मुली मिळून जवळपास १० जण त्याच्या या अनाथालयात गोळा झाली . 

   २०-२५ मुलांना सांभाळणे त्याला तसे अवघड नव्हते कारण त्याच्या वडिलांचा मोठा व्यवसाय होता , पुढे जाऊन तो त्यालाच बघायचा होता . 

  परदेशात शिक्षण घेवून आल्यावर त्याने वडिलांना थोडा वेळ स्वतःसाठी मागून घेतला होता . काही दिवसांनी ऑफिस जॉईन करेन असे सांगून त्याची जरा मित्रांसोबत भटकंती चालू होती आणि याच काळात त्याला मनोज भेटला आणि पुढे हे सर्व चालू झाले . त्याचे ऑफिस जॉईन करायचे लांबणीवर पडत चालले होते . इतके दिवस त्याचे वडील त्याला भरपूर पॉकेट मनी देत होते आणि त्याला लागणारा पैसा त्याला अगदी सहजतेने मिळत होता पण मध्येच हा घोळ झाला अन् त्याचा नाईलाज झाला .

  आजचा दिवस तर स्वामी कृपेने पार पडला होता पण उद्या पासून त्याला मुलांच्या जेवणाची सोय करणे गरजेचे होते . मनाशी काहीतरी निर्णय घेतल्यावर तो जरा शांत झाला .

  दुपारी पुजाऱ्याने दिलेल्या भरपूर प्रसादामध्ये रात्रीचे जेवणाचे सुध्दा भागले आणि दुसऱ्या दिवसाची काळजी स्वामींच्या हवाली करत राहुल तसाच तिथे पहुडला .

  सकाळी मात्र जणू एक चमत्कार झाला होता . त्याच्या वडिलांना आणि अजून काही लोकांना त्याच्या आश्रमात बघून तो शॉक झाला .

  वडिलांनी त्याच्या जवळ येवून त्याला मिठी मारली . ते त्याला म्हणाले , " घाबरु नको , मागच्या तीन चार दिवसात मी जे काही वागलो त्यामागे एक कारण होते . मला फक्त तुझी परीक्षा घ्यायची होती . तू हे जे समाज कार्याचे काम करतो आहेस ते तू अगदी मनापासून करतो आहेस की फक्त टाईम पास म्हणून करतो आहेस हे मला बघायचे होते .

   इतके दिवस तर तू हे फक्त माझ्या जिवावर करत होतास पण जेव्हा मी काही देणार नाही तेव्हा तुझा स्टँड काय असेल ते मला बघायचे होते . पण मला हे जास्त ताणून नाही धरता आले . काल दिवसभर तुझी आणि या अनाथ मुलांची जी उपासमार आणि परवड झाली त्यामुळे मी तुला अजून जास्त त्रास नाही देवू शकलो . मला कालच्या साठी माफ कर . "

   भविष्यात या मुलांवर अशी वेळ पुन्हा कधी येवू नये म्हणून मी या लोकांना तुझ्या मदतीसाठी घेवून आलो आहे .

  या मुलांच्या भविष्याची तरतूद म्हणून हे मोठं मोठ्या कंपन्यांचे काही लोक माझ्यासोबत आले आहेत . 

  ते प्रत्येक जण इथून पुढे सुध्दा इथे येणाऱ्या त्या अनाथ मुलांना दत्तक घेवून त्यांच्या आयुष्यभराचा आणि त्यांच्या शिक्षणाचा सगळा खर्च करणार आहेत . 

  आजपासून त्या मुलांचे संगोपन करायची जबाबदारी यांची . त्यासाठी मी आपला हा बंगला अश्या अनाथ मुलांच्या आश्रयासाठी तुझ्याच नावावर करून देत आहे . " घराचे पेपर त्यांनी राहुलच्या हातात दिले . राहुलला तर अगदी भारावून गेला होता वडिलांची कृती बघून .

" हा बंगला आज पासून मातोश्री अनाथालय म्हणून वापरला जावा अशी माझी इच्छा आहे ."

 या सगळ्या सोबतच माझी अजून एक महत्वाची एक अट आहे आणि ती म्हणजे इथून पुढे या आश्रमासाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठी तुला आपला व्यवसाय पूर्णतः सांभाळावा लागेल .

  राहूल हे सगळ अगदी अगतिक होवून ऐकत होता .वडिलांचा हा निर्णय मान्य करून त्याने त्यांच्या पायावर डोकं ठेवलं .

  त्याच संध्याकाळी मात्र या मातोश्री अनाथालयात सगळ्यांसाठी अगदी पंचपक्वांनाची मेजवानी आयोजित केली होती . 

   आणि आता स्वामींच्या कृपेने इथून पुढे सुध्दा या अनाथ मुलांना दोन्ही वेळेला साग्रसंगीत जेवण जरी नाही मिळाली तरी पोटाला दोन वेळचे पोटभर मिळेल याची सोय निदान नक्कीच झाली होती .


समाप्त .


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational