Sandhya Ganesh Bhagat

Crime

3  

Sandhya Ganesh Bhagat

Crime

ड्रिंक फ्रेंड भाग 3

ड्रिंक फ्रेंड भाग 3

5 mins
132


समीर अर्धा तासात रेखाच्या घरी पोहोचला...

" गूड मॉर्निंग मोनॅको... आज सकाळी सकाळी आठवण काढलीत..." समीर.

" हो काम खूप महत्त्वाचं आहे... ही न्यूज वाच..." रेखा.

" अकोल्याचे नामवंत व्यावसायिक... आकाश इनामदार यांचा गूढ रित्या खून..." समीर.

त्याने तिच्याकडे बघितल...

नंतर पुढची संपूर्ण बातमी मनात वाचून काढली... 

" हे तेच ना... तू मला सांगितलेलं... की तुला क्रश आहे..." समीर.

" हो... एवेन काल आम्ही भेटलेलो... मी मनातल सांगणार होते पण हिम्मत नाही झाली..." रेखा.

" आणि रात्रीचं... ओ माय गॉड..." समीर.

" हो... मला खूप वाईट वाटलं वाचून..." तिचे डोळे पाणावले... समीर समोरून उठून तिच्या बाजूला बसला...

" शांत हो... कुल..." समीर

" अरे पण नेहमीच माझ्यासोबत च का अस..." रेखा

" शालू कुठंय...?" समीर विषय बदलत म्हणाला...

" ही आले बघ समीर ... तुझा आवडता नाश्ता घेऊन...तुझ्या खारे बिस्कीट ची तब्येत जरा खराब आहे... लवकर काम आटोपून निघ...मॅडम ना आराम करू दे... " शालू.

" हो बाई... तिची इतकी काळजी घेते... तू काय तिची आई होती का मागल्या जन्मी..." समीर.

" मागल्या का... ह्याच जन्मी..." शालू.

तिने दोघांना ही नाश्ता दिला... 

" वाऊ... उपमा... त्यावर कुरकुरीत शेव... थॅन्क्स शालू..." समीर.

" सकाळी मॅडम खूप खुश होत्या... नंतर अचानक चक्कर आली..."शालू.

" शालू... " रेखा.

" सॉरी... पण काळजी वाटते तुमची... समीर तूच बघ बाबा काय ते..." शालू. 

"तुघे ना शालू नाश्ता... " समीर

" हो घेयिन नंतर..." शालू आत गेली.

" काय मोनॅको... काळजी घेत जा स्वतःची... ती बिचारी काय काय बघेल..." समीर.

" तू केस बघ ... प्लीज... कसं झालं शोधवच लागेल... नाहीतर मी अडकेल यात... कारण पोलिसांच्या म्हणण्यानुसार मी शेवटची व्यक्ती आहे जी मिस्टर आकाश ना भेटली होती... " रेखा.

" एक एक पॉइंट व्यवस्थित सांग..." समीर.

रेखा त्याला अगदी पहिल्या भेटी पासून सगळ डिटेल सांगते... सगळे मेसेज दाखवते...


त्यानंतर समीर इन्स्पेक्टर शिंदे ना भेटायला गेला... त्याला अंदाज आलाच होता की हो ना इन्स्पेक्टर शिंदे नी त्याला ह्या केस संदर्भातच बोलवलं असणार... त्याने कॉल केला... 

सुलभा मिसळ. मध्ये इन्स्पेक्टर शिंदे समीरची वाट बघत होते... तितक्यात समीर तिथे पोहोचला....

" जय हिंद सर..." समीर.

" जय हिंद.. बस... " " आण्णा... दोन मिसळ आणि कडक चहा घे..." इन्स्पेक्टर शिंदे

" अहो सर इतक्यात नाश्ता करून आलोय... एकच घ्या..." 

" असू दे... टेस्ट एवढी भारी पण जास्त गर्दी नसते अण्णा कडे... बराच वेळ लागेल आपल्याला ... " इन्स्पेक्टर शिंदे. 

" बरोबर सर... मराठी माणसाचा लोक धंदा होऊ देत नाहीत... आणि वर शिकवतात... की मराठी माणसाला धंदाच करता येत नाही..." समीर.

" बर एक खूप महत्त्वाची केस आहे... हाय प्रोफाईल... तुझी मदत हवी... तुला एक सोबत देतो... थोडा वेळात तो येईलच इथे..." 

" हो...कल्पना आहे कुठली केस आहे..." 


रेखा ने सांगितलेली इत्यंभूत माहिती तो इन्स्पेक्टर शिंदे ना सांगतो.... 

त्यानंतर इन्स्पेक्टर शिंदे ही त्यांची सगळे डिटेल्स त्याला सांगतात... की आकाश इनामदार कुठे आणि कशासाठी नाशिक मध्ये आले होते... सोबत कोण होत... वगेरे... सगळ... काही फोटोकॉपी पण त्याला दाखवतात... 

सगळी माहिती त्याला सांगतात

तितक्यात एक कुरळ्या केसांचा मुलगा... तिथे येतो... काउंटर वरचा माणूस... इन्स्पेक्टर शिंदे च टेबलकडे बोट दाखवतो... 

" जय हिंद सर..." 

" बस अर्णव... हे समीर... ह्यांना तुला असिस्ट करायचंय..." 

" ओके सर..." अर्णव.

" तुम्ही आताच अकोल्याला निघाव लागेल... " 

" पण सर आधी मला स्काय लार्क आणि अश्विन मध्ये जावं लागेल... समीर.

" जशी तुझी इच्छा... मी पण येतो सोबत... म्हणजे सोयीचं होईल ..." इन्स्पेक्टर शिंदे.

" ओके... निघू लगेच..." समीर.

" आधी खाऊन घ्या... नंतर कुठेच स्टॉप नाही घ्यायचा..." इन्स्पेक्टर शिंदे.

" अण्णा... अजून तीन घे रे..." 


तिघे ही खाऊन लगेच पोलीस व्हॅन मध्येच निघतात...

इन्स्पेक्टर शिंदे ड्रायव्हिंग करत होते...

समीर ने अर्णव ला पोहोचल्यावर काय करायचं ते समजावून सांगितलं... खरतर अर्णव सोळा वर्षाचा एक टॅलेन्टेड हॅकर... पण नाबलिक असल्याने त्याला लीगली ते डिपार्टमेंट मध्ये घेऊ शकत नव्हते... पण समीर ला तशी काही फारशी गरज नव्हती अर्णव ची... पण इन्स्पेक्टर शिंदे. च मन मोडायची त्याची इच्छा नव्हती...

तिघे ही स्काय लार्क ला आले... तेथील संपूर्ण सीसीटीव्ही फूटेज घेतल... अगदी एंत्रास चा पण बघितला... त्यात रेखा कार घेऊन निघून गेल्ानंतर बरोबर सात मिनिटांनी मिस्टर आकाश ची कॅब आली होती... 

कॅब चा नंबर नोट केला... 

नंतर ते अश्विन मोटेल मध्ये गेले... तिथे त्यांनी सिल केलेली रूमची पुन्हा तपासणी केली...

तिथे दोन बारीक टाचण्या मिळाल्या...त्यांची टोक जरा हिरवी होती .. समीरने ते एविदेन्स म्हणून एक पाउच मध्ये ठेवल्या....

बाकी सगळ्या वस्तू अगदी जशाच्या तशाच होत्या... 


" सर हे फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवा..." ते पाउच इन्स्पेक्टर शिंदे च्या हातात देत समीर म्हणाला... 

" मी अकोल्याला निघतोय... आता लगेच..." 

" बर... पण अर्णव..." इन्स्पेक्टर शिंदे.

" नाही सर ... त्याची गरज वाटली तर. बोलवेन त्याला नंतर..." समीर.

तो खाली गेला... आणि अंदाज लावला की नीडल फायर कुठून झाल असणार... 

तो त्या खिडकीच्या खालच्या बाजूला एक्झॅक्ट जागी येऊन उभा राहिला... वेगवेगळ्या अँगल ने उभा राहिला... पण त्याला कुठला ही पुरावा नाही मिळाला... पण निराश न होता त्याने पुन्हा आसपास काही सीसीटीव्ही कॅमेरा आहे का चेक केल पण तस काही त्याला दिसल नाही... आणि त्या भागात कुठलाही सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता...


त्याला इन्स्पेक्टर शिंदे यांनी एक बॉक्स त्या हाती दिला... आणि निघून गेले... बाहेरच टॅक्सी उभ्या होत्या... समीर टॅक्सीत बसून निघणार तोच बाजूचा टॅक्सीवला त्याला म्हणाला...

" साहेब... तुम्ही ते खुनाच्या तपासला आलते ना..."

" हो... तू ओळखतो ह्यांना...?"

"हे साहेब साठी हॉटेल न माझीच टॅक्सी बुक केलती..."

" तुझ नाव..." 

" मी मोहन..."

" मग तुला काही संशयास्पद दिसले का... एक मिनिट.. आत ये... बसून बोलू..."

समीर त्याला घेऊन आत गेला.. वेटर ने टेबल दाखवला...

" काय खाणार..."

" काही नाही साहेब..." 

समीर ने दोन चहा सांगितलं...

दोन दिवसात कुठे कुठे गेला... कुणाला भेटला सगळी इत्यंभूत माहिती त्यानं समीर ला दिली. 

समीर ने त्यासोबत हस्तांदोलन केलं... आणि निघाला... 

" साहेब तुमचं बॉक्स..." 

" अरे हो... राहीलच ते... थँक यू मोहन...आणखी काही लागलं तर मी कॉल करेल तुला..." 

" काधिबी करा साहेब...अजून एक राहील...चला तुम्हाला दाखवतो... "

तो गाडीजवळ आला... दशबोर्ड वरून एक वस्तू उचलली आणि समीर च्या हातात दिली... 

" हे त्यादिशी त्या साहेबाच्या कोटला चिकटेल  होत... त्या बाई भांडत होत्या.. त्यांचं असणार बहुतेक... कारण त्यानं रागांच फेकल व्हत..." 

त्याने ते ब्रेस्लेट निरखून पाहिलं..." चल मी सांगतो तिथं सोड..."

आणि त्याने समीर ला घरपर्यंत सोडवलं...

पैसे घेत नव्हता पण समीरने जबरदस्ती त्याच्या खिशात जरा जास्तच पैसे कोंबले....


त्याने घरात येऊन बॉक्स उघडला तर त्यात गन आणि बुलेट्स होत्या... ती फुल लोड केलेली गन अनलोड करून सोबत घेतली.... बुलेट्स घरीच काढून ठेवल्या... खरं तर तपासात त्याला गन यूज करायला आवडत नाही ... पण एक दरारा... कुणी आडवा आल तर धाक दाखवनार फक्त...

ह्या सगळ्या साठी इन्स्पेक्टर शिंदे नी त्याला एक स्पेशल पास दिलेला होता .. जेणेकरून चौकशी दरम्यान कुठे काही अडवायला नको...

सायंकाळचे साडेपाच झाले होते... तो आता निघाला तर दोन तासात अकोले त पोहचेल असा अंदाज लावला...तसा रस्ता तीन चार तासांचा... पण समीरचा ड्रायव्हिंग स्पीड भयानक होता... आणि कही जुजबी समान घेऊन भरधाव वेगाने तो अकोलेचे दिशेने निघाला... एक ठिकाणी ढाब्यावर थांबून जेवण ऑर्डर केले... आणि आजूबाजूला टेहळणी करू लागला... त्याने मिस्टर आकाश इनामदार यांचा फोटो दाखवून एक काम करणाऱ्या मुलाला विचारल... की असा कुणी माणूस इकडच्या आसपास च्या एरियात दिसला का... पण त्याकडून काही मनाजोग उत्तर मात्र मिळालं नाही... जेवण करून तो मस्त गाणी ऐकत तो तिथून निघाला... 


क्रमशः




Rate this content
Log in

Similar marathi story from Crime