AnjalI Butley

Horror Thriller

4.3  

AnjalI Butley

Horror Thriller

धूक

धूक

4 mins
377


दिवाळी आली, दिवाळी गेली सुद्धा!! दिवस कसे पटकन जातात! थंडी असून सुद्धा लवकर उठायचे, थंड पाण्यानेच लवकर आंघोळ करून पहिले मी करत फटाके फोडायचे!

जास्त धुर झाला फटाक्यांचा तर आईला उगाच सांगायचे बाहेर धुके आहे ते!

सध्यातर एकाच दिवशी सगळ्या ऋतूंचा अनुभव घ्यायचा सकाळी थंडी म्हणजे हिवाळा, दुपारी पाय पोळेल एवढ ऊन म्हणजे ऊन्हाळा संध्याकाळी धो धो पाऊस म्हणजे पावसाळा, रात्र परत ओल्या थंडीत घालवायची सकाळी लवकर उठले की बाहेर धुक, १० फुटावरच या धुक्यात काही दिसणार नाही, 

त्यात मी ड्रायव्हर म्हणुन काम करणारा, सणासुदीला जास्त कमाईचे खूळ डोक्यात वाजत राहत! मग काय भल्या पहाटे पासूनच कामावर जायच, अजून स्वतःची गाडी नसली म्हणून दुसर्याच्या गाडीवर बदली ड्रायव्हर म्हणून काम करायचे, चांगले पैसे जमले तर स्वतःची गाडी घेऊच!

मुंबईच भाड होत, एकाच घरातील ५ जण, फोर सिटर गाडीत दाटीवाटीने बसून जायच ठरले, मी धरून गाडीत सहाजण, सकाळी पाचलाच निघणार होतो, म्हणजे माझ्या झोपेच खोबर झाल होत. रात्री ऊशिराच घरी आलो होतो, जेम तेम दोन तास झोप झाली!

पण थाटातच आपल्याला काही होत नाही करत, अंगावर विंडशिटर, स्वेटर न घालताच गाडी चालवायला घेतली, थंडीत हात थरथरत होते पण गुटखा घाऊन वा काय छान थंडी आहे करत आव आणत होतो! बाकीची मंडळी गाडीत बसल्या नंतर थोड्याच वेळात झोपी गेली! थंडी होती, डोळ्यावर झापडही होती पण बाकीचे लवकरच झोपी गेल्यामुळे कोणाला मी डुलकी घेतोय हे कळले नाही! 

इगतपुरी पासुन धुके सुरू झाले, गाडी हळुच चालवत होतो, रस्ता नेहमीचा असल्यामुळे गाडी बिनधास्तच चालवत होतो, बाजुला जाणार्या गाडींना कट मारत, मोठ्याने हॉर्न वाजवत आपल्याच धुंदीत मोठ्याने गात होतो, डूलकी कमी करण्यासाठी सर्व धडपड चालु होती. दिवाळीची सुट्टी संपली म्हणून लोक परत घरी चालली होती, ट्रफिक जाम होत! तरी त्या धुक्यात मी आपली वाट काढत पुढे जातच राहिलो, तो अंधारा वळणदार घाटातला रस्ता, तसाही अपघातांसाठी प्रसिद्ध, ghost road, हे ही एक नाव! सगळ माहित असतांना मी माझा मी नव्हतोच! ताबाच नव्हता माझा माझ्यावर!

एवढे हॉर्न वाजवुनही प्रवासी झोपलेच होते. मलाही विचित्र वाटले.. 

कसा बसा मी घाट पार केला, थंडी व धुक्यामुळे डोळ्यावर पाणी मारू व चहा पिण्यासाठी धाब्यावर गाडी थांबवली. तेवढ्यात एक पोलिस समोर आला, नेहमीचा ओळखीचाच मामा पण आज वेगळाच वाटला!

काय रे कोण प्रवासी, एवढ्या दाटीवाटीने बसून कसे आले?

आमच संभाषण चालू असतांनाही एकही जण हु का चू करत नव्हता, मी गंमतीने मामाला म्हटले 'पहिल्यांदाच अशा मुडद्यांना घेऊन चाललो आहे'

मामापण गंमतीने हातावर टाळी देत हसले!

झोपले आहे प्रवासी म्हणून मी ही काही जास्त लक्ष दिले नाही, झोपू दे, आपण चहा पिऊ करत मी व मामा चहा प्यायला गेलो, गाडी सुरूच ठेवली होती एसी चालु होता!

अंधार व धुके होते, मिणमिणता धाब्यावरचा लाईट चालु होता, काटकसर, विज बिल कमी येयासाठी,

थोड्या वेळाने ५-६ कुत्रे जोर जोरात गाडी जवळ भूंकत होते. 

धाब्यावर काम करणारी मुले बाहेर कुत्री का भुंकत आहे हे बघायला गोळा झाली, कुत्रांची भुकणे वेगळे होते!

काय झाले करत मामापण मुलांजवळ गेली तर त्यांना ही वेगळे वाटले, त्यांनी मला इशार्यानेच बोलवले! मी बाहेर आलो तर गाडीत बसलेले प्रवासी झोपुनच होते! कुत्रांचे एवढे भुंकणे, गाडीच्या काचांवर ओरखडे पाडणे असुन सुध्दा!

मामाने माझ्याकडे मोर्चा वळवला कुठून बसवले ह्यांना, नाव काय, मोबाईल नंबर काय वैगरे, 

मी तर ह्यांची माहिती घेतलीच नव्हती, परिवार हॉटेलच्या कोपर्यावरून बसवले होते, हॉटेल मधे काम करणार्या एका मुलाने काल रात्री ११ ला फोन करून बुकिंग केले होते, सकाळी बाकी माहिती देतो! मीपण आपल्याच खुशीत जास्त पैसे मिळणार म्हणून हो म्हटले!

गाडीत हे बसले तेंव्हा माझ जास्त लक्ष नव्हते थंडी व धुक्यामुळे अंधूकच दिसले त्यांचे चेहरेपण बघितले नाही नाव ना ऐकला आवाज!

मामांनी कुत्रांना दंडूकाचा धाक दाखवत बाजुला सारले, गाडीच दार ऊघडून प्रवाश्यांना ओ करत ऊठवयाचा प्रयत्न केला पण ऊठले नाही! हात लावला तर एक जण बाहेर मामांच्या आंगावर पडला! मामा घाबरले हे काय, मी मामांच्या मागेच ऊभा होतो व माझ्या मागे धाब्यावरची मुले, कुत्रे होतेच!

बरे, अजुन दुसरी गाडी ह्या धाब्यावर थांबली नव्हती! नाहीतर शुटींग चालु झाले असते!

बघितले तर गाडीतले सगळे प्रवासी मुडदेच होते! मेलेले!

मी पार गोंधळून गेलो. मामांनी त्यांच्या पोलिस चौकीत फोन करून सांगितले, अधिकारी गाड्या घेऊन घटनास्थळी आले, मग चौकशी साठी त्यांच्या सोबत चौकीत! झाला प्रकार त्यांना सांगितला!

एव्हाना ही बातमी सगळीकडे पसरली, घरी दारी सर्वीकडे! 

पोलिस अधिक तपास करत असतांना समजले ज्या प्रवाशांनी माझी गाडी बुक केली ते तीथेच होते, मी भलत्याच प्रवाश्यांना सोबत घेतले, थंडी धुक्यामुळे काही पाहिलेच नाही गाडीत कोणाला बसवल!

ज्याने फोन बुकिंग गेले त्याला फोन केला तर त्याचा फोन लागत नव्हता!

त्याचे बोलने एका दुसर्या कामगाराने एकले होते व याच्या हातुन हत्या केलेल्या मुडद्यांना अंधार, धुके, थंडीचा फायदा घेत त्याने ह्याना गाडीत बसवले!

मी सावध राहीलो असतो तर ह्यांनी माझ्या गाडीतुन प्रवास केला नसता!

पण पोलिसांना अनेक गुन्हे केलेले मोस्ट वॉन्टेड टोळीचा तपास लावता आला!

कानाला खडा लावला गाडीत प्रवास करणार्या प्रत्येक व्यक्तीला नीट पाहुन घ्यायचे, आपलेच प्रवासी आहे का ह्याची खात्री पटल्यावरच गाडी हाकायची, पैश्याच्या मागे धावायचे नाही, आपलेच महिनीतीचे असलेतरी घाई करायची नाही!


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror