Ratnadeep Sawant

Horror Fantasy Thriller

2.9  

Ratnadeep Sawant

Horror Fantasy Thriller

गॅलेरी

गॅलेरी

3 mins
283


शाळा संपली आणि अनिरुद्ध इंजिनियरिंग करण्यासाठी बाहेर जाणार होता. एका नामावंत विद्या पिठामधून त्याच शिक्षण पूर्ण करून त्याने जॉब साठी दुसऱ्या मोठ्या शहरात जाण्याचं ठरवलं. 

जाण्या आधी एक दोन आठवडे त्याच्या घरी जाण्याचं ठरवतो. दोन दिवसात तो घरी पोहचतो. घरचे गावाजवळील नुकत्याच एका जुन्या इमारती मध्ये राहायला आलेले असतात. तिकडे सर्वच जण नवीन असतात. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या कोणाशी तितका संबंध येत नाही. अनिरुद्ध खुप दिवसानी घरी आलेला असतो. त्यामुळे त्याचे खुप लाड होत होते. खाण पिण मजा करण, सकाळी वाटेल तेव्हा उठून गॅलेरी मध्ये वेळ घालवण. त्या दिवशी नेमका अनिरुद्ध गॅलेरी मध्ये जाऊन चहा घेत होता. त्याच्या बाजूच्या गॅलेरी मधून एक मुलगी त्याला बघत होती. आधी त्याने दुर्लक्ष केल. पण नंतर ती च त्याच्याकडे बघण अनिरुद्ध ला आवडू लागल. त्याने तिला हात वारे दाखवत हॅलो म्हटल आणि तीने लगेच उत्तर देत बोलणं सुरु केल. रोज सकाळी अनिरुद्ध उठून गॅलेरी मध्ये जायचा आणि तिथे ती शेजारच्या गॅलेरी मध्ये मुलगी त्याची वाट बघत असायची. त्यांचं बोलणं वाढत गेल.

दुसऱ्या दिवशी अनिरुद्ध ला कंपनी मधून फोन आला आणि त्याला कामावरती यायला सांगितलं गेल. त्याने घरी सांगितलं आणि सकाळचं निघायचं ठरवलं. अनिरुद्ध त्याच्या कामाच्या जागेवरती पोहचला. त्याने ठिकाणा बद्दल आणि कामाबद्दल घरच्या लोकांशी संवाद साधला. पहिलाच दिवस अनिरुद्ध चा खुप मस्त गेला. काम करून खुप थकून तो झोपायला गेला. जेव्हा सकाळ झाली तेव्हा अनिरुद्ध त्याच्या गाव च्या शहरातल्या घरी होता. त्याने डोळे उघडले अंथरून झटकलं व धावत बाहेर गेला. तर सगळे त्याला बघून चकित झाले. की तु घरी कसा आलास. हा प्रश्न त्याला स्वतःला पडला होता. की ज्या रात्री तो झोपी गेला होता. तेव्हा दुसऱ्या शहरात होता. आणि जेव्हा डोळे उघडले तेव्हा गावच्या घरा मध्ये होता. सर्वांना वाटल की त्याने लगेच ट्रेन पकडून घरि आला. त्याने पुन्हा बॅग भरली आणि निघायचं ठरवलं. आणि ऑफिस ला गेला. पूर्ण दिवस बिझी गेला. आणि शहरातल्या त्याच्या घरी जाऊन त्याने सर्व पाहिलं तर सर्व त्याच जागी होत. कोणतीच गोष्ट हिकडची टिकडे झाली नव्हती. त्याने जेवण केल व झोपायचं ठरवलं. त्याचे डोळे पेंगत आले आणि तो झोपी गेला.

जेव्हा सकाळ झाली तेव्हा त्याच्या ऑफिस च्या कलीग चा फोन आला. आज येत आहेस ना, तर हो म्हणत त्याने झोपेतच चादर झटकवली आणि पुन्हा तो त्याच्या गावच्या घरी होता. बाहेर पुन्हा धावत गेला. सर्व हॉल मध्ये होते. त्याला बघून सर्व पुन्हा चकित झाले. सर्वांना बघून त्याला सुद्धा धक्का बसला. त्याचे बाबा म्हणाले तु जातोस आणि लगेच घरी कसा येतोस. अस वारंवार होत राहत. त्याचे खुप जॉब जातात. त्याचे आई वडील त्याला तांत्रीकाकडे नेतात. पण काहीच फरक पडत नाही. मग तो बाहेर शहरात जाण टाळतो. दुसऱ्या सकाळी गावी घराबाहेर गॅलेरी मध्ये चहा घेत त्या मुलीची वाट पाहत असतो. आणि ती बाहेर येते. ती हसते आणि बोलायला लागते. मागून त्याची आई येते आणि म्हणते कोणाशी बोलतोयस तर तो हसत तिच्याकडे बोट दाखवतो. तेव्हा आई म्हणते तिकडे तर कोणीच नाहीय. तो फ्लॅट खुप वर्ष बंद आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror