Ratnadeep Sawant

Drama Horror Thriller

3  

Ratnadeep Sawant

Drama Horror Thriller

माळावरची जकीण

माळावरची जकीण

4 mins
177


         अमावस्या होती आणि भल्या रात्री कुत्रे ओरडत होते. रात्रीचे बारा वाजले होते. मुंबईवरून सावतांचा मुलगा येणार होता. आणि त्याला नेमका उशीर झाला. त्याची संध्याकाळची बस चुकली. आणि गावात जाणारी कोणतीच गाडी त्याला मिळेना. म्हणून त्याने गावा जवळच्या फाट्यावर जायचं ठरवलं आणि तिथून कोण ना कोण जाणार भेटेल म्हणत तो तिकडे उभा राहिला. त्याला पिंगरी भेटली. ती एका डमडम मधून जात होती. तो डमडम वाला सावतांचा पोर सुम्या आणि पिंगरी अशी तीन माणस त्या डमडम मध्ये होती. डमडम मध्ये फक्त डमडम वाला एकटाच बडबडत होता. हिकडच्या तिकडच्या गोष्टी सांगत. तो म्हणाला मी तुम्हाला गावच्या बाहेर सोडतो तिथून चालत जा. सुम्या चालेल म्हणाला कारण जिथे रस्ता संपतो तिथून गाव आणि सुम्याच घर अगदी दहा मिनिटावर होत. डमडम वाला म्हणतो हे घ्या आल तुमचं गाव. अस बोलत तो तिथून निघतो. आणि पिंगरी व सुम्या चालायला सुरु वात करतात. पिंगरी एक तरुण मुलगी असते. ती दिसायला सुंदर असते. तीने लाल कलरची साडी आणि पांढरी ओढणी डोक्यावर घेतलेली असते. रात्रीच्या अंधारात तिची वेशभूषा सुम्या ला पटकन ओळखता येत नाही. पण सुम्या खुश असतो. की माझ्या गावा तल्या घरा पर्यंत माझ्या सोबत कोणीतरी आहे. तो पिंगरी ला तिच नाव विचारतो तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो. तुमचं घर कुठे नुकतच नवीन लग्न झालाय का. तुम्हाला ह्या आधी गावत बघितलं नाही. पण पिंगरी एका शब्दाने सुद्धा बोलत नाही. 

      शेवटी कंटाळून सुम्या तिचा हात धरतो आणि तिला थांबवतो. म्हणतो तुम्ही का माझ्याशी बोलत नाही आहात. तितक्यात ती म्हणते समोरची विहीर आली की सांगते. ती विहीर दोनशे वर्ष जुनी असते. त्या विहिरीला देवी वाघिश्वरीचा आशीर्वाद असतो. ती गावची हद्द सांगणारी विहीर असते. भूत पिच्छाच ह्या गोष्टी विहिरी जवळ फिरकत सुद्धा नाही. दोघेही विहिरी पुढे जातात. आणि एक दिवा दिसतो. त्या दिव्याच्या आड वाटेच्या शेजारी स्मशान असत. ती दिव्याच्या खाली थांबते आणि डोक्यावरचा पदर काढते. तीने लाल टिळा लावलेला असतो. तिचा चेहरा एका सुंदर स्त्री प्रमाणे चमकदार दिसतो. तिचे केस पायापर्यंत लांब असतात. एवढं सौन्दर्य बघताच. सुम्या ला शब्द सुचत नाहीत. तो तिला बघताच क्षणी तीच्या प्रेमात पडतो. ती म्हणते माझ्या पिशवीत भाकरी आणि कांदा आहे. तु मुंबई वरून आलास खाऊन जा घरी. आपण माझ्या माळावरती जाऊया. तिथे बसून तु सावकाश खा. माळ- रान अगदी ओसाड पडलेला असतो. खुप वर्ष झाली त्या माळावर कोणीच आलेलं नसत. एक पडका वाडा त्या वाड्याला चारी बाजूनी वडाच्या झाडाने घेरलेलं असत. वाड्याच्या बाजूला मोठी कलक असते. ती कलकि मोठ मोठ्याने आवाज करते. समोर मोठी विहीर त्या विहिरीत दगडी टाकून ठेवलेल्या असतात. सुम्या खुप घाबरलेला असतो. एकतर इतका अंधार त्यात भकास माळरान आणि तिथे फक्त हि दोघ जण. सुम्या पिंगरी ला म्हणतो इथे उजेड करण्या सारखं काय आहे का. पिंगरी म्हणते आहे. वाड्याच्या वरच्या मजल्यावर कंदील आहे. तो पेटवाला तर उजेड मोठा होईल. ती पुढे सुम्या मागे वरती चालत जातात. पायऱ्या चालता चालता पिंगरी गायब होते. सुम्या वरती लगेच बघतो तर तिच्या हातात कंदील पण तिच तोंड गायब् असत. सुम्या जोरात ओरडतो. तितक्यात शांत हो आणि चल खाली म्हणत मी दुसऱ्या वाटेने येते. सुम्या कंदील घेऊन खाली जातो. खाली बसतो भाकरी हातात घेतो. तिचे केस समोर दिसतात. केसांना पकडून ती वरच्या मजल्यावरून खाली येते. समोर येते तेव्हा तिचे पाय वरती डोक खाली आणि केस वरच्या माळ्यावर बांधून ती लटकट असते.

हे बघून सुम्या हातातली भाकरी वरती उडवतो आणि जोरजोरात ओरडतो. ती हळूच खाली येते आणि म्हणते ओरडू नकोस हे माझ्या साठी नेहमीच आहे फक्त तु नवीन आहेस. ती वडाच्या झाडाला आपले केस लटकवते आणि उंच झोका घेते. जेव्हा ती वरती जाते. तेव्हा विहिरीच्या कड्यावर उडी मारते. विहिरीत उडी टाकते. आणि तिच्या ओरडण्याचा आवाज येतो, आणि शांत होतो. सुम्या ची बोबडी वळलेली असते. पण तो तिला बघायला विहिरीजवळ दबक्या पावलांनी जातो. 

     जेव्हा खाली बघतो तेव्हा ती हळू हळू चढत वरती येत असते. सुम्या आपल्या खिशा तला लाईटर् काढतो आणि तिला घाबरवायला बघतो. ती तिचे केस फुडे करते आणि ती लाईटरची आग तिच्या केसांना लागते. ते केस पूर्ण अंगाला ओढून घेते. आणि सुम्या ला नाचून दाखवते. तिच अंग पूर्ण आगीने पेटलेलं असत. ती जेव्हा नाचायला सुरुवात करते तेव्हा कलक मोठ मोठ्याने आवज करते, वडाच्या पारंब्याचा आवाज यायला सुरुवात होतो. ते दृश्य भयंकर असत. सुम्या तिला पेटत्या अवस्थेत बघून वरच्या मजल्यावर धावत जातो. हळू हळू विहिरीतून रक्ताच पाणी वाहायला सुरुवात होते. आणि ते पाणी इतक भरत की पिंगरी त्यात बुडून जाते. त्या पाण्याचा प्रवाह मजल्या पर्यंत येतो. आणि तो वाडा रक्ताने भरून जातो. दोन मिनिट सर्व शांत होतो. सुम्या सगळीकडे तिला शोधतो. पण ती कुठेच त्याला दिसत नाही. हळूच मागून त्याच्या हात येतो. तो मागे बघताच पिंगरी त्याच्या छातीवर लात मारते. आणि सुम्या पाण्यात पडतो. सुम्या तिच ते रूप बघून बेशुद्ध पडतो. सकाळी त्याला जाग येते. तेव्हा तो त्याच्या घरी असतो. त्याला आजू बाजूच्या माणसांनी बघायला गर्दी केलेली असते. रात्रभर कुठे होतास अस विचारताच "पिंगरी" हा शब्द बोलुन पुन्हा बेधुद्ध पडतो. अग बाय पिंगरीन पोराला पिंगवलान वाटत बोलत माणस तिथून निघून जातात


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama