Ratnadeep Sawant

Inspirational

4.0  

Ratnadeep Sawant

Inspirational

सर

सर

4 mins
151


शाळेतले सर्व मूल आजच्या दिवशी भेटायचं अस ठरलं आणि मी निघालो. गेट टू गेदर आम्ही ठरवलं होत. मी एक दिवस आधीच निघालो. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रणित ने मला बोलवलं होत, भेटून संध्याकाळी ठरलेल्या वेळेत जायचं अस आमच ठरल होत.

खुप वर्ष माझ्या डॉक्टर मित्राला माझं भेटणं झाल नव्हतं. प्रणित ने मला त्याच्या हॉस्पिटल मध्ये बोलावल होत. त्याची हि प्रगती बघून मला आमचे शाळेचे चे दिवस आठवले. जिथे आम्ही छोट छोट्या गोष्टीन मध्ये आनंद शोधत मजा करायचो. कधी मित्रानं मध्ये तरी कधी घरी आम्ही मजा करत असायचो. एकमेकांचे प्रॉब्लम स्वतःचे समजून जगायचो. आज त्याला त्या डॉक्टर च्या ड्रेस मध्ये पाहून इतका आनंद झाला. आम्ही एकमेकांना भेटत मिठी मारली. त्या पाच सहा सेकंदांसाठी आम्ही पुन्हा भूतकाळात जाऊन आलो होतो. तो म्हणाला तु बस मी आलो पेशन्ट ला बघून. मी सुद्धा विलंब न करता येऊ का सोबत विचारलं. "अरे विचारतोस काय चल दाखवतो शाळेत नसलो तरी हॉस्पिटल मध्ये किती फेमस आहे" आम्ही राऊंड ला गेलो आणि दुसरा राऊंड आय सी यु मध्ये होता. जेव्हा मी बघितलं सगळे पेशन्ट सिरिअस होते. माझी नजर एक वृद्ध व्यक्ती कडे गेली. प्रणित त्याचे पेशन्ट चेक करत होताच तितक्यात माझं लक्ष गेलेल्या वृद्ध व्यक्ती जवळ मला मन घेऊन गेल. त्यांना कुठेतरी बघितल्या सारखं वाटल पण आठवत नव्हतं कुठे, मी त्यांना विचारलं तुमची तब्यत कशी आहे. "माझ्याकडे वेळ कमी आहे. माझं अंतरमन सांगतंय आज कसा बसा जाईल पण उद्या पाहू शकत नाही". वाईट वाटलंच पण दुःख सुद्धा वाटल की आयुष्य जगून जर हाच शेवट असेल, जिथे शेवटच्या क्षणाला सोबत कोणीच नाही. आपले परके कोणीच नाही. सोबत कोण आहे अस विचारलं तर मुल परदेशीं आणि बायको साथ लवकर सोडून गेली. मी विचारलं "तुमची काय मदत करू शकतो" 

      "देवाकडे एक दिवस अधिक मागून बघ देतो का?"

हे वाक्य ऐकताच न कळत डोळ्यातून पाणी आल.       

       तितक्यात प्रणित सर्वांना चेक करून आला. मला म्हणाला तु ह्यांना कस विसरू शकतोस. ज्यांनी आपल्याला इथ पर्यन्त यायला मदत केली. आज मी जो कोणी आहे तो ह्यांच्या मुळेच आणि तु सुद्धा. मला समजल नाही पण जेव्हा तो अस म्हणाला तेव्हा एकदा नीट त्यांच्याकडे बघितलं. तर आमच्या शाळेचे शिक्षक आणि आमची ह्यांना बघूनच भीती उडायची अशे आमचे सर होते. त्यांनतर आम्ही मनसोक्त त्यांच्याशी गप्पा मारल्या. प्रणित म्हणाला त्यांची तब्यत खुप खालवलीय. त्यांची मुल अमेरिकेमधून यायला तयार नाही आहेत. अस्थी पाठवा अस म्हणाली. ह्या माणसाने आयुष्य खुप अप्रतिम जगून समाजिक रित्या स्वतःला प्रबळ बनवलं. मी म्हणालो "यार पन्या सरांना आपण कस बघायचो. हि हालत बघवत नाही रे" सुरुवात जशी होती. एंड पण दणकट व्हायला हवा. ती अतरंगी परत आणूया का? अस म्हणताच पन्या समजला आणि आम्ही अरेंज मेंट केलेली.

     शाळेच्या ग्रुप वर एक मेसेज गेला. आणि लोकेशन शाळा नसून, हॉस्पिटल च नाव आल. सर्व चकित झालेच. पण दिलेल्या वेळेत तिकडे उपस्तिथ राहिले. एका हॉस्पिटल च्या मोठ्या रूम मध्ये सरांना आणलं होत. तिकडे सर्व मुल होती. फरक फक्त इतकंच होता. आम्ही सर्व सर आले की पुस्तक उघडायचो पण सर तेच पुस्तक बंद करत होते. सर्वांना बघून सर खुप खुश झाले. आणि सरांना बघून सर्व दुःखी पण आनंदी सुद्धा होते.

      हॉस्पिटलमध्ये जीवनाचा एक उल्लेखनीय उत्सव तयार केला. आम्ही त्यांच्या रूम ला आनंदाच्या आश्रयस्थानात बदलले, फुले, फुगे आणि अनमोल आठवणी असलेल्या छायाचित्रांनी सजवले. रूग्णालयातील कर्मचारी सामील झाले, कथा आणि हशा सामायिक करत, आठवणीं रंगल्या आणि जुने दिवस नवीन झाले.

      प्रत्येकाने सर्वांची एक आठवण सरांसोबत जपून ठेवली.

सर म्हटल्या प्रमाणे त्यांना आम्ही आनंद दिला. जो आनंद त्यांना खुप वर्ष भेटला नव्हता. ते म्हणाले मला एक दिवस एक्सट्रा हवा आहे. आम्ही त्यांना खुप दिवस दिले. ते जगले, ते हसले, ते मनोरंजक झाले. त्यांचं शरीर हॉस्पिटल मध्येच होत, पण त्यांच मन आम्ही पुन्हा शाळेत घेऊन गेलो होतो. आम्ही आमच्या आयुष्यात खुप पुढे आलो होतो. प्रत्येक जण चांगल्या पोस्ट वरती काम करत होता. काहीजण व्य्यवसायिक झाले होते. पण जेव्हा आम्ही पुढे गेलो. तेव्हा मागे एकदा बघायला विसरलो होतो. शाळा सुटल्यावर पुन्हा उद्या शाळेत जायचंय हे माहित होत. पण आयुष्यात पुढे चालत गेल्यावर विसरतो. की आपल्या मागे खुप काही आहे. जे आपल्याला बघून खुश होणार आहे.

         आमच्या आयुष्यातला अनमोल हिरा म्हणजे आमचे गुरु होते. त्यांना आम्हाला घडवलं म्हणून आम्ही आज चांगल जीवन जगू शकलो. काही दिवसानी सर जग सोडून गेले. विचार करत बसलेलो तितक्यात मला पन्या चा फोन आला. आणि तो म्हणाला, सर जाताना काहीतरी देऊन गेलेत. तु उद्या मला भेट तुला सांगतो.

         मी गेल्यावर पन्या ने मला एक बॉक्स दिला. त्या बॉक्स वरती एक चिट्टी होती. त्यात लिहलं होत.

        काय रे मुर्खा तुला काय वाटलं मला हे सर्व कळणार नाही. मला माहित होत तुम्ही सर्व भेटणार आहात. पण ज्या दिवशी तु मला भेटलास त्या दिवशी मी मुद्दामून तुला ते वाक्य म्हणालो. तो एकदिवस मला तुमच्या साठी हवा होता. कारण मला माहित होत दोन अतरंगी माझ्या बाजूला बसलेत ते काही ना काही डोक चालवणारच आणि तुम्ही ते चालवलतच बर वाटलं तुम्ही मला माझ्या शेवटच्या क्षणी भेटलात. मी पहिला माणूस असेन जो मारताना आनंदी होतो. आणि तो आनंद तुम्ही सर्व होतात. 

        आठवत का तु शाळेत असताना माझ्या घरी आला होतास. माझा रेडिओ तुला खुप आवडला होता. तु तो मागितला होतास. पण मी म्हटलं होत की मी हा रेडिओ माझ्या आवडत्या विद्यार्थ्याला देणार आहे. तु त्याच्यावरती लक्ष नको देऊस अस म्हणतास, जेव्हा माझ्या समोरून गेला तो सर्वात दुःखी विध्यार्थी होता. पण मला अश्या आहे आज तो विध्यार्थी सर्वात आनंदी असेल, आज एकदा हस आणि बॉक्स उघडून बघ.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational