Ratnadeep Sawant

Drama Romance Fantasy

3  

Ratnadeep Sawant

Drama Romance Fantasy

ई -प्रेम

ई -प्रेम

6 mins
159


   सकाळचे सात वाजले होते. मी माझ आवरल आणि कॉलेज ला निघालो. सर्व मुल शाळेत आणि कॉलेज ला चालत जायची. गप्पा मारत कॉलेज ला जाण त्यांना आवडायच. कॉलेज गावात असल्यामुळे जास्त सुविधा नव्हत्या. ना नेटवर्क व्यवस्थित होत. ना रेंज नीट मिळायची. त्यामुळे मनोरंजन म्हणजे गावातले सण, विविध नाटक, इत्यादी असायचं. त्यामुळे गावातली माणस आणि मुल आपापल्या कामात व्यस्त असायची. त्या दिवशी दुपारी बारा वाजता कॉलेज सुटल व मी घरी यायला निघालो. नेहमी प्रमाणे सुम्या थोडा वेळ लॅपटॉप आणि मोबाईल वापरत राहायचा कारण कॉलेज मध्ये रेंज मिळायची. त्यामुळे मी त्याला ण सांगताच निघालो. गावातून अर्ध्या तासावर कॉलेज त्यामुळे मी बाईक वरून लवकर घरी यायचो. रेंज चा प्रोब्लम असल्यामुळे ठराविक ठिकाण होत. तिथे रेंज यायची. आणि ती ठिकाण गावातल्या सर्व मुलांना माहित होती. त्यामुळे लांबून बघितल तर प्रत्येक ठिकाणावर कोण ना कोण उभ दिसायचं. मी बीएसएनएल च वाय फाय घरी बसवून घेतल होती. ते घेण्यासाठी जवळ जवळ सहा किलोमीटर खूप शारीरिक तडजोड आम्हाला करावी लागली. म्हणून मला कधी इंटरनेट ची गरज भासली नाही. दूरदर्शन सुद्धा आमच्याकडे होता. रोज शनिवार रविवार मुल काका काकी लोक सर्व आमच्या घरी चित्रपट पाहायला यायचे. 

       रोजच्या प्रमाणे त्या दिवशी मोठ्या आंब्याच्या झाडाखाली पर्णिका मला दिसली.ती थोडा वेळ म्हणजेच रोज साधारण अर्धा एक तास तिथे टाईमपास करायची. पर्णिका म्हणजे 'पनु' गावात पनु या नावाने सर्व तिला हाक मारायचे. दिसायला सुंदर आणि बोलायला गोड अशी मुलगी होती. तीच राहणीमान अगदी शहरातल्या मुलींसारख तीच होत. पनु माझ्या हून दोन वर्षांनी लहान होती. माझ्या बाबांना ती लहानपणापासून खूप आवडायची. माझे बाबा आणि तिचे बाबा मित्र होते. झाडा झुडूपानविषयी दोघांना खूप आवड होती. जेव्हा पनु चा जन्म झाला. तेव्हा माझ्या बाबांनी पर्णिका हे नाव तिच्या बाबांना सुचवलं. त्यामुळे आमच्याकडे खूप काही होत दूरदर्शन सारख्या वस्तू त्या तिला आवडायच्या म्हणून तीच जाण येण चालू असायचं. तिला तंत्र-द्याना विषयी खूप आवड होती. त्यामुळे मला सतत काही न काही विचारात राहाण तीच चालू असायचं. माझा लॅपटॉप घेऊन त्यामध्ये गेम खेळन. नव नवीन गोष्टी शिकन तीच चालू असायचं.

पण तंत्र द्यानाविषयी पारंगत असलेली मुलगी आताच्या युगात कोणत्याच सोशल मिडिया अकाऊंट तीच नव्हत. ना कोणते मैदानी खेळ तिला आवडायचे. सतत त्या युट्यूब वरती टेकनोलोजी संबंधित व्हिडीओ बघण, स्टीव जॉब्स चे मोविज बघण अब्दुल कालमान सारख्या थोर माणसांची पुस्तक वाचण तीच चालू असायचं. ती ज्या आंब्याखाली तासान तास उभी असते. तिथे नेमकी काय करत असते. अस विचारावस वाटायचं. पण एखाद्याच्या पर्सनल गोष्टीन मध्ये का जाव अस सुद्धा वाटायचं. 

        त्या दिवशी रविवार होता. आणि ती आली मला म्हणाली मला लॅपटॉप दे मला चित्रपट बघायचं. मी तिला लॅपटॉप दिला. आणि तिने 'The Social Network' चित्रपट पाहायला सुरुवात केली. जवळ जवळ तो चित्रपट तिने तीस वेळा पहिला होता. सकाळ पासून संध्याकाळ होई पर्यंत चित्रपट आणि मध्ये मध्ये जोर जोरात कीबोर्ड चे आवज. काहितरी जोरात टायपिंग करण्याचे आवाज यायचे. पण मी जास्त लक्ष ण देता माझ्या कामात व्यस्त राहायचो. कारण तिला हे सर्व आवडायचं पण तिची परिस्तिथी खूप गरिबीची होती. त्यामुळे ह्या महागातल्या गोष्टी तिच्या साठी घेण त्यांना जमणार नव्हत.

तीच काम झाल कि ती कंटाळली कि सर्व निट ठेवून घरी जायची. तिच्या अश्या वागण्याची मला सवय झाली होती. तिने एक सांगून ठेवल होत कि माझे दोन फोल्डर आहेत. त्यांना फक्त हात नको लावू त्यात जे आहे त्यामुळे तुझ्या privacy मध्ये अडथळा येणार नाही. पण गेली एक वर्ष मी त्या फोल्डर ला हात सुद्धा लावला नव्हता. मन करायचा कि एकदा बघूया आणि बंद करूया. पण नाही तस केल. 

 दोन दिवसांनी तिचे बाबा तिला घेऊन घरी आले. पनुचा बारावीचा फॉर्म भरायचा आहे. भरून देतोस का ? मी म्हटल काका तुमची मुलगी ह्यात खूप हुशार आहे. तिने स्वताहून भरला असता. तुम्ही उगाचच यायचं कष्ट घेतलात. पनु लॅपटॉप घे जा आणि भर फॉर्म अस म्हटल. त्यावेळी आम्ही बाहेर बसून गप्पा मारत बसलो.त्यावेळी गाव बाहेरच्या नंद्याचा मला मना पासून राग आला, कारण तिने तो फॉर्म अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये भरून टाकला आणि तोच फॉर्म नंद्या एक तास घालवायचा. तिचे बाबा चकित झालेच. वरून मी पण चकित होऊन बघत राहिलो. त्यांच्या शहरात राहणाऱ्या मोठा मुलगा जितका हुशार नव्हता त्याहून दहा पटीने हि हुशार होती. थोड्या वेळाने बोलून ते निघू गेले. मी आत गेलो. ह्या वेळी तिने लॅपटॉप तसाच चालू ठेवून गेली होती. मला झोप आली होती. माझा डोळा लागणार इतक्यात लॅपटॉप मधून नोटीफिकेशन चे आवाज यायला लागले. तीच इमेल अकाउंट लॉग इन राहील होत. मी पुन्हा दुर्लक्ष केल आणि झोपून गेलो.

        संध्याकाळ झाली मी आळस देत उठलो. पाच वाजले होते. फ्रेश झालो आणि फेरफटका मारायला निघालो. वाटेत पनुच घर लागल. आणि घरा मधून भांडणांचे आवज येऊ लागले. भांडण जोरात ऐकू यायला लागल. पनू बाहेर बसून रडत होती. इतक्यात काकी बाहेर आल्या तिला ओढत आत नेत होत्या आणि त्यांनी मला चुकता चुकता बघितला. आणि वरती ये तुला हिच्या करामती सांगते बोलून आत गेल्या. मी वरती गेलो. काका डोक्याला हात लावून बसलेले त्यांना आधी शांत केल. दोघेही शांत झाले. आणि काकी सांगत गेल्या. पोर हाताबाहेर गेलीय. हीच बाहेर काहीतरी चालू आहे. फसवंतेय हि आई बापाला कुटे फेडेल हि पाप. दोन मिनिट मी शांत झालो. मला विश्वासच बसेना. ती मला नजर द्यायला तयार नव्हती. म्हटल पनु काका शक्य नाही मी हिला लहानपणा पासून ओळखतो. हि अस करेल अस शक्यच नाही. कारण तिच्या वागण्यातून, बोलण्यातून, कधी दिसून आल नाही. हि मुलगी प्रेमात आहे आणि मला कस कळल नाही. ह्या वयात भविष्याचा विचार करणारी मुल ह्या असल्या भानगडीत पडत नाही. त्यांना पूर्ण शांत केल. तिला समोर बोलवून शांतपणे विचारलं पनू तू अस काही करत आहेस का? तर तिने स्पष्ट शब्दात नकार दिला. 'मी अस काहीच करत नाहीय विश्वास ठेव माझ्यावर' अस म्हणत ती आतल्या खोली मध्ये निघून गेली. काका काकीना विचारलं तुम्हाला का शंका आली कि ती प्रेमात आहे. ते म्हणाले तीच वागण बदलून गेलाय. निट जेवत नाही. पूर्वी सारखी बोलत नाही मजा करत नाही. एकटी एकटी राहते. सतत बाहेर असते. इतकी कारण पुरेशी नाही आहेत का रे ? नाही काका अश्या गोष्टीन वरून तुम्ही ती प्रेमात आहे अस नाही ठरवू शकत. हि बाकी कुठे जात असते का कोणाला भेटते का तर नाही. काय ते तुमच्याकडे जाते तेवढीच. ती अस करणारी मुलगी नाहीय. तिच्यावर विश्वास ठेवा ती साधी सरळ आणि संस्कारीच आहे. ते म्हणाले एकदा फोन तपासून बघ, ठीक आहे म्हटलं आणि मी तिचा फोन घेतला. फोन मध्ये कोणतेच सोशल मिडिया एप नव्हते. सर्वाना शांत केल त्यांना सुद्धा फोन दाखवला. त्यांना विषय पटला. घर शांत झाल तस मी तिथून निघालो. घरी आलो डोक शांत ठेवल आणि खुर्चीला टेकून बसलो होतो. लॅपटॉप ला पुन्हा नोटीफिकेशन यायला सुरु झाल्या. अडमिशन करून दोन दिवस झाले नाही आणि इतके मेल. 

         तिचा इमेल मी उघडून बघितला तर त्यात सर्व गुगल चे इमेल जास्त होते. गुगल चे इमेल उघडून पहिले. ते खूप प्रमाणत होते. पण गुगल कडून येणारे इमेल पूर्ण इंग्रजी भाषेत. हे इमेल नसून इमेल मध्ये केलेले मेसेज होते. हे मेसेज गुगल नावाने तिला येत होते. आता नुकताच केलेला गुगल ला मेल होता. 'आपल प्रेम प्रकरण घरी कळून आल आहे'. असा गेम हि मुलगी खेळत होती. म्हणजे गुगल चा इमेल म्हणजे कोण उघडून बघणार नाही. आणि त्यात इंग्रजी मधून त्यामुळे उघडला तरी कोणला तो कळणार नाही. थोडा वेळ तो गुगल कोण आहे. ते कळण्यात माझा गेला. तितक्यात मला तो फोल्डर आठवला. तो "एरर" नावाने सेव होता. त्यात प्रकरण उघडीस आल. सर्व फोटो, सर्व मेसेज चे स्क्रीन शोर्ट. हा गोंधळ आणि डोक चालवून केलेलं काम होत. दोन मिनिट मी लॅपटॉप बाजूला ठेवला. आणि तीच कौतुक केल. म्हटल असाही तंत्रन्यानाचा वापर होऊ शकतो. तिचा रागही खूप आला होता. कारण तिने पद्धत चुकीची वापरली होती. तिने मला आणि तिच्या कुटुंबाला खोट पाडलच होत. पण स्वतःला जास्त फसवल होत.

        हि प्रेमात आहे हे माझ्या लक्षात आलच होत पण कोणासोबत आहे हे अजून चांगल कळून आल. तिला "गुगल" या नावाने इमेल करणारा आणि माझ्या वर्गात माझा सर्वात हुशार मित्र ज्याला सर्व "एरर" ह्या नावाने ओळखतात तो 'सुम्या' होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama