Priya Jawane

Drama Romance Fantasy

3  

Priya Jawane

Drama Romance Fantasy

हम तुम

हम तुम

45 mins
291


एका प्रसिद्ध मासिकाच्या ऑफिसमध्ये त्या पॉश केबिनमध्ये ती बॉसलेडी सियावर अक्षरशा बरसत होती.

 

' no सिया, मला तुझे आर्टिकल्स आवडतात. खुप छान रिस्पॉन्स मिळाल‍ाय, पण माझा निर्णय झालाय आता.'

 

'पण ma'am मी एकटी लिहू शकतेय पुढचा सिजन.प्लिज एक चान्स द्या.'

सिया स्वतःची बाजु मांडत म्हणाली.

 

'हे बघ सिया, तु माझी लाडकी लेखिका आहे. तुझी प्रेम मांडण्याची पद्धत खुपच सुरेख आहे. पण तुझा प्रेम याकडे पाहण्याचा दृष्टिकोण खुपच स्वप्नवत आहे. just like a colourful world, which is not exist and now i want reality.'

 

'bt ma'am. . . .'

 

सिया काकुळतीला येऊन स्वतःची बाजु मांडण्याच्या प्रयत्नात होती. 

 

'तुझा या आर्टिकलसाठीचा नवा पार्टनर काही वेळात तुला join होईल.now leave!' 

एका कडक आदेशयुक्त स्वरात त्या bosslady ने सिया ला जायला सांगितलं.

 

सिया तिच्या क्युबिकलमध्ये येऊन बसली, विचारातच. तिने 'माझा आरसा तो त्याची सावली मी...!' साठी खुप सुंदर लिखान केल होतं. वाचकांनी तो आर्टिकल आवडीने वाचला होता. मासिकाचा खप त्यामुळे वाढला होता. पण आता बॉसला त्या सेक्शन मध्ये काही तरी बदल हवा होता, वास्तविकतेचा बदल. सिया त्या टेबलवर एक हात लांब करुन त्यावर डोक ठेऊन डोळे बंद करुन शांत झाली.

 

सिया,यश राज फिल्मच्या हिरॉईनसारखी. दिल तो पागल है मधली माया होती ना अगदी तशी, स्वप्नाळू. कोणीतरी पांढर्‍या घोड्यावर राजकुमार येईल आणि गुडघ्यावर बसून प्रेम व्यक्त करेल या भावनेतच तिने आज वर आयुष्य काढलं होतं. एकही romantic movie तिने सोडली नव्हती. DDLJ चे अक्षरक्षा पारायनं चालायचे. रंगीत कपडे,खुप सार्‍या बांगड्या, ब्रेसलेट्स, कानात मोठे झुमके, पायात मोजडी अशी काय ती आपली सिया. प्रेमाच्या अनेक गोष्टी शब्दात मांडत असली तरी स्वप्नांच्या दुनियेतच हरवलेली. प्रेम ही भावना आजवर फक्त शब्दातच अनुभवलेली.

 

तिने तिच्या मागच्या प्रोजेक्टसाठी खुप मेहनत केली होती. त्याच्या प्रतिक्रिया ही सुखावनार्‍या होत्या पण आता तिला कोनाच्या तरी सोबत काम कराव लागनार होतं. कोनत्यातरी प्रॅक्टिकल व्यक्तिसोबत. तिने तिची गुलाबी रंगाची डायरी काढली. 

 

Dear Diary,

स्वप्न संपवायचेत का आता.? हे माझं आर्टिकल होतं पण आता ही भावना मला वाटून घ्यावी लागनार होती. वास्तवाशी सबंध असणार्‍या व्यक्तीशी, माहीत नाही कोन आहे, कशी असेल?? 

 

ती तिच्या या आणि अशा अनेक भावना त्या डायरीला सांगत होती. तसं तिला त्यात लिहिण्यासारखं ही काही नसायचं. मैत्रिणी होत्या पण त्या ही रोजच नव्या प्रेमात. आणि ही आपली स्वतःत गुंग. तिच्या या मनातल्या गोष्टी ऐकायला, अनेक पांढरे पंख लावलेल्या पर्‍या तिला दिसायच्या. 

 

ती अजुनही त्या नव्या पार्टनरबद्दल विचार करत होती.

 

 'नक्कीच ही नवी writer बॉसची एखादी चमची असणार'

सियाची एक ऑफिस फ्रेंड तिच्या खाद्यांवर हात ठेवत म्हणाली. 

 

'काय फरक पडतोय. काम कराव लागनार हे च खरं.' 

सिया थंड श्वास सोडत म्हणाली.

 

'तुला माहीतिये, तु खुप छान लिहीते पण तुझ्यातलं प्रेम फक्त त्या भावना उघड करत. सगळं कसं गोड गोड असतं. काहीतरी झनझनीत, चटपटीत चाट सारखं ही काही असावं असं नाही वाटत तुला?'

ती मैत्रिण बोलत होती. 

 

तिच मत सियाला पटत होतं पण आता त्याबद्दल विचार करण्यात अर्थ नव्हता. तिला तिचं काम वाटूनच घ्यावं लागनार होतं. कितीही न पटनार्‍या गोष्टी असल्या तरी त्यावर लिहावंच लागणार होतं.

 

तिच्या विचारातच असतांना एक black कलरची KTM तिच्या अॉफीसच्या पार्किंग ला लागली. हेल्मेट काढुन त्या व्यक्तीने मिररमध्ये पाहत लाघवी स्माईल केलं. तो गाडीवरुन उतरेपर्यंत पार्किंगमधल्या सगळ्यांची नजर त्याच्यावर होती. त्याने सगळ्यात आधी गाडीच्या पुढे लागलेली धुळ हाताच्या बोटांनी प्रेमळपणे साफ केली. समोरच उभ्या असणार्‍या आणि एकटक त्यालाच पाहणार्‍या मुलींकडे पाहत त्याने मनमोहक स्मित केलं. तो लिफ्टकडे चालु लागला. जातांना वॉचमेन मामांसोबत हसून बोलत त्याने त्याच्या प्रिय डार्लिंगकडे अर्थातच बाईककडे लक्ष देण्यास सांगितलं. 

 

रफ जिन्स्, व्हाईट फुल स्लिव्हस् कुल dude टाईपचा टि- शर्ट, फास्टट्रॅकच स्पोर्टी घड्याळ, अॅविऐटर शेपचा गॉगल,लाल स्पोर्ट शुज अशा अवतारात तो ऑफीसमधल्या प्रत्येकाच्या नजतेत भरत होता. त्याला पाहत अनेक मुलींनी थंड श्वास घेणं सुरु केलं होत. तो हे सगळं मजेत पाहत बॉस केबिन कडे निघाला होता.

 

'may i come in sweetie?' 

अर्थातच तो केबिनमध्ये निम्मा प्रवेश घेत त्या bosslady ला विचारत होता. चेहर्‍यावर तेच लाघवी हसू. 

 

'ओह. . .my goodness, please come.' 

bosslady ने चालु असलेल काम थांबवत त्याला आत येण्याच आमंत्रण दिलं. (ते नसतं दिल तरीही तो आलाच असता.)

 

बर्‍याच गप्पा झाल्यानंतर bosslady ने त्याला पिऊन सोबत सिया कडे पाठवलं. पण सियाला मी शोधतो. तुम्ही कॉफी घेऊन या. असा सल्ला त्याने पिऊनकाकांना गळ्यात हात टाकत दिला. आणि त्याची नजर सियाला शोधु लागली.

 

पूर्ण ऑफिस फिरता्ना सगळेजण हपापल्या सारखे त्याला बघत होते. तो मात्र ते special attention enjoy करत होता. ऑफिसच्या शेवटच्या क्युबिकलमधून विंडचेनचा सुरेख आवाज येत होता. त्याची पावलं आपसूक तिकडे वळाली.

 

'सिया. . .?' 

त्याने तिला अावाज दिला. तिने त्याच्याकडे शांततेत पाहिलं. तो मात्र स्तब्ध झाला.

 

'येस. . .???'

तिने त्याला भानावर आणण्यासाठी पुन्हा विचारलं.

 

'hi myself Kabiir...!' 

तो पुर्ण आत्मविश्वासाने हात पुढे करत बोलला.

 

तिचे डोळे आधीसारखेच शांत होते. तिने नकळत त्याच्या हातात हात दिला आणि उठून उभी राहिली. कबीरही तिला पाहत विचारांती होता. आयुष्यात पहिल्यांदा त्याने अशी मुलगी पाहिली होती. जिच्या डोळ्यात त्याला पाहून चमक आली नव्हती. हे सगळं त्याचा इगो दुखावनारं होतं. 

 

तिला पार करुन तो तिच्या चेअरवर बसला.

 

'तुझ्या आर्टिकल्स मला खुप कामाच्या होत्या.' 

तो मनमोहत हसत तिला म्हणाला.

 

'थॅंक्‍यू...! पण कश्या?'

कोणीतरी वाचक तिच्या आर्टिकल्सबद्दल बोलायला अॉफीसपर्यंत आलाय या आनंदात ती आधीच सगळं विसरली.

 

'रात्री झोप नाही आली कि वाचायचो, मग बोअर होऊन शांत झोपायचो'

कबीर पेनस्टॅड उचकत म्हणाला.

 

सियाला राग आला ती अोरडून काही बोलणार इतक्यात बॉस तिथे आली.

 

'सिया meet कबीर, इ-बुक्स् चा king म्हण हव तर. आर्टिकलसाठी तुझा पार्टनर. कबीर प्लिज सियाला सांभाळून घे'

bosslady एवढं बोलून निघून गेली. 

 

(सियाचा राग सातव्या आसमानवर होता. एकतर हा कबीर तिच्या लिखाणाची खिल्ली उडवत होता, त्यात तोच तिचा पार्टनर. आणि आता बॉसने सांभाळून घ्यायला त्याला सांगितल होतं.)

 

तो मात्र काहीच झालं नाही या अशाच भावनेने तिथे उचकपाचक करत होता. त्याची कॉफीही आली.

 

'ति माझी चेअर आहे'

कबीर बसलेल्या चेअर कडे बोत दाखवत राग कंट्रोल करायचा प्रयत्न करत सिया म्हणाली.

 

'होती. . .! आता माझी आहे.'

कबीर तिला अजुन चिडवत म्हणाला. 

 

याच्या नादी लागून उपयोग नाही म्हणून सिया तिथून निघून गेली.

 

तिचं बाकीच काम, तिला हवी असणारी चेअर सगळं पुन्हा जागेवर होत संध्याकाळ झाली. ती पुन्हा तिच्या, आता कबीर आणि तिच्या क्युबिकलमध्ये आली. कबीरने तिच सगळं सामान तिथून हटवलं होतं. आता तिथे फक्त PC आणि नोटपॅड होता. सगळ्या प्रेमळ, गुलाबी- लाल वस्तू तिथून गायब होत्या. विंडचेन तेवढं जागेवर होतं. गुलाबाच्या फुलांना हातात घेऊन कबीर कितीतरी वेळ

'she loves me, she loves me not' 

असं काहीतरी बरळत होता. सगळीकडे पाकळ्या पसरल्या होत्या. तिचा पारा अजुन चढला होता.

 

'हे सगळं काय आहे?' 

तिने रागातच विचारलं

 

'तु कधी केलं नाही का? एखाद्याचं प्रेम तपासण्यासाठी?

तो भुवई वर करत तिला खिजवत म्हणाला.

 

'पण एक फुल पुरे आहे हे सगळ समजायला. तु सगळा गुच्छ उदवस्त केलास.'

ती हताशपणे म्हणाली.

 

'हो मग प्रत्येक GF साठी एक फुल. तशे मला अजुन हवे होते. आहेत का?

तो तिला चिडवण्यासाठी बोलत होता.

 

तिने एक डिस्गस्टींग लुक त्याला दिला आणि बॅग घेऊन निघाली. तो लगबगीने उठून तिचा रस्ता अडवून समोर उभा राहीला.

 

तिने हाताने काय म्हणून विचारले.

 

'कुठे जातेय?'

 

तिने हातातल्या घड्याळ त्याला दाखवत अॉफीसची वेळ संपली म्हणून सांगितलं. आणि त्याला बाजुला करून निघूनही गेली.

 

कबीर कितीतरी वेळ तिला जाताना पाहत होता. काहीतरी होतं या पहील्या भेटीत जे त्याला सुखावत होतं. अशी काहीशी नवीन, शांत भावना होती ती. हळूहळू ऑफीसच्या लाईट मंद होऊ लागल्या. तो ही निघाला. 

 

सिया उजवीकडे तिची गाडी घेऊन तर कबीर डावीकडे त्याची बाईक घेऊन आपआपल्या रस्त्याला लागले. हे दोन किनारे आता सोबत चालणार होते तेही प्रेमाच्या आर्टिकलसाठी. 

 

एक नया मोड लिया है इस जिंदगीने

किसी खास नजरको दगा दिया है हमने।

कोई नया, कोई चेहरा आपसा लगा है हमें,

तकदिर क्या क्या मोड लायेगी,

इस प्यार की नयी कहानी में।

 

आज सकाळी सियाला जरा उशिराच जाग आली. रात्र नवीन कथेच्या विचारात गेली. पण फार उशीराने लक्षात आल, आता तिला पार्टनरसोबत काम करायचयं, त्या कबीरसोबत ज्याला प्रेम आणि प्रेमकथा यातला फक्त टाईमपासच माहीत आहे. सिया अॉफीसला पोहचली तसं बॉसने केबिनमध्ये बोलवलं. कबीरसाहेब आधीच तिथे उपस्थित. 

 

'काल तू बिना काही चर्चा करता गेली?' 

बॉसने पहिला बॉम्ब टाकला.

 

'मॅम ऑफीसची वेळ संपली होती. आणि तसही कबीरकडे तरी कुठे वेळ होता.'

सिया रागात त्याच्याकडे पाहत म्हणाली. तो मात्र चेहर्‍यावर स्मित ठेऊन तिला त्रास देत होता.

 

'look सिया, आज Tuesday आहे, next week monday ला मासिकाचा ड्राफ्ट चेकिंगला आहे. त्याअगोदर तुम्ही दोघांनी मला आर्टिकल द्यायला हवयं. आणि तु cooperate करत नाहीस अस कबीरच मत आहे.' 

सियाने चिडून कबीरकडे पाहीलं. तो तिला खिजवण्यासाठी अोठ लांब करुन हसला.

 

'OK Ma'am' अजुन काही बोलण्यात अर्थ नाहीये म्हणून सिया क्युबिकलकडे निघाली. टेबलवर काही प्रिंटआऊटस् होत्या. कबीरने आर्टिकलसाठी लिहिलेल्या.

 

'त्या रात्री फार पाऊस होता. ती भिजलेल्या हाताने जानार्‍या प्रत्येक रिक्षाला हात करत होती. रस्ता तसा रहदारीचा पण पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी होतं. कोणीच रिक्षा थांबवत नव्हतं. प्रत्येकालाच घरी जायची घाई होती. ती छत्री सांभाळत अजुनही घरी कसं जाता येईल याचा विचार करत होती.

 

'ये मौसम भी बडा बेवफा़ निकला

हमें अकेला छोड, खुद बरस रहा है।

ये तन्हाई अब जान ना ले ले,

कोई तो हमराही साथ मिल जाये।'

 

तो आपल्याच धुंदीत कभी जो बादल बरसे ऐकत निघाला होता. बाईकचा स्पीड तसा कमीच होता, भिजत जानं हे एकमेव कारण. तिला पासून स्पिड अजुन कमी झाला. ते सौंदर्य पाहतच तिच्याजवळ थांबला. ति ही वेड्यासारखी काही विचार न करता बाईकवर बसली.

 

'प्लिज मला विनायक नगरपर्यंत लिफ्ट द्या. एकही रिक्षा थांबत नाहीये ती छत्री बंद करत म्हणाली. त्यानेही गाडी स्टार्ट केली. पाऊस वाढतच होता. तिचा उबदार स्पर्श त्याला जाणवत होता. तिने तर त्याला अोळखलही नव्हतं तो मात्र आज एवढ्या वर्षाने त्याच्या कॉलेज क्रशला बाईक वर घेऊन चालला होता. ते ही पावसाच्या या अश्या रोमँटिक वातावरणात. 

 

पाऊस वाढला तशी त्याने बाईक एका चहाच्या गाडीजवळ आडोशाला थांबवली. हेल्मेट काढलं तशी ती अोरडली,

 

'तु सुरज ना, मॉर्डन कॉलेज २०१५ बॅच???'

 

त्याने खुप गोड हसत होकारार्थी मान हलवली. तिने त्याला अोळखलं होतं, खुप सारे फुलपाखरं त्याच्या मनात उडत होते. तो पाऊस आता कोनतस प्रेमगीत गातोय असं त्याला वाटायला लागलं. सगळीकडे व्हायोलिन वाजत होते. हार्ट शेपचे लाल फुगे उडतायेत असा भास त्याला होत होता. ती हसून खुप काही बोलत होती. तो मात्र वेड्यासारखा फक्त तिच्याकडे पाहत होता.

 

(माहीत असतं की कॉलेजमध्ये ही आपल्याला अोळखते तर केव्हाच प्रपोज मारला असता. पण त्यात काय अाँख खुले तब सुबह, लगेच च विचारून टाकतो.)

 

खुप हिम्मत करुन त्याने I ओठांवर आणायचा प्रयत्न केला पण,

 

'चहा घेणार??' 

एवढचं काय ते तोंडातून बाहेर पडलं. 

 

सोबत चहा झाला. तिला घरी सोडतांना नंबरही मागितला तिने. तो सातव्या आसमान वर होता. एव्हाना पाऊस थांबला होता

 

'मग केव्हा फोन करु?' 

त्याने थोड लाडातच विचारलं.

 

'तु नाही मी च करेल.'

त्याची फिलिंग तर मनमे लड्डू फुटा टाईप होती.

 

'पुढच्या महीन्यात लग्न आहे माझं, आमंत्रण द्यायला नक्की फोन करेल.'

तिने हसत हसत त्याच्या प्रेम बंगल्यावर रोलर फिरवला.

 

त्याने झटकन तिच्याकडे पाहीले. आणि लवकरात लवकर गाडीला किक मारुन निघून गेला.

 

 'बहिणीच लग्न समजुन नक्की ये मी फोन करेल. . . . .'

असा काहीसा आवाज कानावर पडत होता. तो मात्र तुटलेल्या प्रेम बंगल्याच्या विटा विसरण्याचा प्रयत्न करत होता.

 

कबीर (स्व अनुभवावरून )

 

सिया ते वाचत वाचत हसून अक्षरशः चेअरवरुन पडता पडता वाचली. तिला हसू खरतर शेवटच्या तीन शब्दांवरून आलं होतं. कबीर मात्र चिडण्याऐवजी तिच्या हसूत हरवला होता. मेकअप मागे असलेल उसनं हसू त्याने अनेक पाहीले होते, पण सौंदर्यामागे असणारं निखळ, मनमोकळ हसू तो पहिल्यांदा पाहत होता. तिने हसत त्याच्या डोक्यात टपली मारली. कदाचित त्याची फजिती तिला त्याच्याविषयी सहानभुती जागृत करुन गेली. बिचारा कबीर होत असं कधी कधी.

 

ते दोघ थोडे का होईना पण सोबत मनमोकळे हसले होते. सिया ने डायरी आणि पेन घेतला. कबीर विचारांती गुंतला. प्रेमळ आर्टिकल यांच्या मैत्रीची सुरुवात करणार होत हे नक्की. 

 

"चलो अब शुरुवात करें,

दोस्ती ही सही बात तो करें।

अरे ये क्या, आप तो चल दिये,

जरा रुकीये रुकीये, 

जिंदगीसे कुछ पल चुरा लिये जाये।"

 

मैंने जब देखा था तुझको,रात भी वो याद है मुझको

तारे गिनते-गिनते सो गया. . .

दिल मेरा धड़का था कसके,कुछ कहा था तूने हँसके

मैं उसी पल तेरा हो गया. . .

आसमानों पे जो खुदा है, उस से मेरी यही दुआ है

चाँद ये हर रोज मैं देखूं तेरे साथ में. . .

 

आँख उठी मोहब्बत ने अंगडाई ली

दिल का सौदा हुआ चांदनी रात में

ओ तेरी नज़रों में कुछ ऐसा जादू किया

लुट गए हम तो पहली मुलाकात में

ओ आँख उठी. . .¦¦

 

पाँव रखना ना ज़मीं पर, जान रुक जा तू घड़ी भर

थोड़े तारे तो बिछा दूँ मैं तेरे वास्ते. . .

आजमा ले मुझको यारा, तू जरा सा कर इशारा

दिल जलाके जगमगा दूँ मैं तेरे रास्ते. . .

हाँ मेरे जैसा इश्क में पागल, फिर मिले या ना मिले कल

सोचना क्या हाथ ये दे दे मेरे हाथ में. . .

 

आँख उठी मोहब्बत ने अंगडाई ली

दिल का सौदा हुआ. . . ¦¦

 

हाँ किस्से मोहब्बत के हैं जो किताबों में, 

सब चाहता हूँ मैं संग तेरे दोहराना,

कितना जरुरी है अब मेरी खातिर तू,

मुश्किल है मुश्किल है लफ़्ज़ों में कह पाना. . .

अब तो ये आलम है तू जान मांगे तो

मैं शोक से दे दूँ सौगात में. . .

 

आँख उठी मोहब्बत ने अंगडाई ली

दिल का सौदा हुआ चांदनी रात में

ओ तेरी नज़रों में कुछ ऐसा जादू किया

लुट गए हम तो पहली मुलाकात में

ओ आँख उठी. . .¦¦

 

लुट गए हम तो तेरी मोहब्बत में. . .

 

गाणं गुनगुनतच कबीरने अॉफीसमध्ये एन्ट्री घेतली. ब्लुटुथ हेडफोन बंद करुन हाय व्हॉल्यूममध्ये मोबाईल एका टेबलवर ठेवला. कॉरिडॉरमधल्या स्पेसमध्ये सिया काही प्रिंटआऊट काढून येत होती. त्याने तसचं तिला जवळ घेऊन तिच्यासोबत डान्स सुरु केला. ती काहीशी वैतागुनच पण त्याच्या स्टेपस् फॉलो करत होती. 

 

आज कबीर साहेब भलत्याच भन्नाट मुड मध्ये होते. थोड्याच वेळात तिथे बॉसलेडी आल्या, कबीरने सिया ला फिरवत एका जागी सोडलं आणि तो बॉससोबत डान्स करु लागला. कॉरिडॉरमधल्या त्या छोट्या जागेतही तो उत्तम स्टेप्स करत होता. सगळे हसून टाळ्या वाजवत त्यांना प्रतिसाद देत होते. थोड्यावेळात गाणं संपलं, तसा कबीर राजेशाही थाटात बॉसला केबिनपर्यंत तर सिया ला क्युबिकलपर्यंत घेऊन आला. तिला तिच्या चेअरवर बसवून तो त्याच्या चेअरवर स्टाईलमध्ये बसला.

 

'काय भानगड? स्वारी आज मस्त मुडमध्ये?'

तीने त्याच्याकडे झुकत विचारलं.

 

'गेस कर. . .'

तो हि डोळे मिचकवत बोलला.

 

'हम्म. . . नवीन क्रश भेटली?'

- ती

 

'शी. . .तुझी गेसिंग पॉवर भलतीच खराब आहे'

तो काहीसा वैतागुन म्हणाला.

 

'एका सुंदर मुलीने कॉफीला विचारलं?'

- ती

 

त्याने तोंड वाकडं करत नकारार्थी मान हलवली.

 

'मग नक्कीच रस्त्यात पैसे सापडले असतिल.'

ती त्याला चिडवत म्हणाली.

 

'सिरिअसली??? तु भलतीच बोअर आहे.'

तो डोळे उडवत म्हणाला.

 

तिने लॅपटॉपकडे तोंड केलं. पण थोड्यावेळात पुन्हा काय झालं असा इशारा केला. त्याने तिची व्हीलचेअर जवळ अोढली. खुप सारा सस्पेन्स तयार करुन तो म्हणाला,

 

'मला आर्टिकलसाठी नवी स्टोरी सुचलिये. पण तुझी मदत लागेल.' 

 

ती ही हसून लगेच तयार झाली.

( या दोघांची पहीली भेट, त्यानंतरचे छोटे छोटे वाद जरी असले तरी कबीरसारख्या हसमुख, मनमिळाऊ व्यक्तीसोबत तोंड फुगवून राहन तस अवघडच.)

 

थोडी चर्चा झाल्यावर दोघंही आपआपल्या लॅपटॉपवर शस्त्रास्त्र सज्ज झाले.

 

'चंद्राची बारीक कोर आकाशात होती. हवेत गुलाबी गारवा होता, पण तो हवाहवासा वाटत होता. मुग्धा आणि सुभाष त्याच्या गाडीतून कुठेसे जात होते. दोघांकडे पाहून ते नक्कीच नवविवाहित असावे अस वाटत होतं पण ते गुलाबी प्रेम कुठे दिसत नव्हतं. ती शुन्यात गाडीतून बाहेर पाहत होती तर तो गाडी लवकरात लवकर पोहचता कसे येईल याच विचारात होता. 

 

काही वेळाने गाडी एका मोठ्या रिसोर्टच्या आत थांबली. ते दोघं त्याच्या मधुचंद्रासाठी आलेले होते. चेकईन झाल्यावर तो रुममध्ये निघाला ति ही यांत्रिकपणे त्याच्या मागे गेली. संवाद हा नव्हताच कुठे. जेवण झाल्यावर त्याने सोफ्यावर मान टाकली. मुग्धा त्या मोठ्या सुंदर बेडवर एका कोरपर्‍यात अश्रू घेऊन झोपली. 

 

सुभाष लग्नाआधी प्रेम होतं एका मुली. खुप स्वप्न सजवले तिच्यासोबत पण काही कारणाने ते वेगळे झाले. घरच्यांच्या दबावाने मुग्धासोबत लग्न केले. पण याप्रवासात सुभाषने तिचे ही स्वप्नभंग केले. लग्न नावालाच, दोन अनोळखी लोक सोबत राहतात तसचं आयुष्य असेल अस काहीस स्पष्ट सांगितल त्याने. तिच्यासाठी धक्का होता हा. सुभाषने भुतकाळाची काळी छाया त्याच्या आयुष्यावर टाकली होती. 

 

पण ती मुग्धा होती. तिचे स्वप्न तुटले नव्हते. ती काहीशी खचली होती. पण ति ही आज ची मुलगी होती. एका प्रेमळ व्यक्तीला ती प्रेमानेच जिंकू शकत होती. त्याचं मन पोळल होतं पण नष्ट झालं नव्हतं. एक व्यक्ती म्हणून एक मैत्रिण म्हणून सुभाषही मुग्धाची काळजी घेत होता. तिला समजुतदार पणा, प्रेमळपणा, काळजी या सगळ्यांमुळे तो तिच्याकडे अोढला जाऊ लागला. 

 

सुभाषचे स्वप्न तुटले होते, प्रेम संपलं होतं पण यामुळे तो मुग्धाचेही स्वप्न हिरावून घेतोय याची जानिव त्याला होत गेली. वेळ सगळ्यावर औषध असते, हळूहळू सुभाषची जुनी प्रेअसी त्याच्या विस्मरणात गेली. तो मुग्धाच्या प्रेमात पडू लागला होता. वेळ गेला मात्र मुग्धाने त्याला अंतर दिले नाही. तिला तिच्या प्रेमावर, तिच्या स्वप्नांवर आणि सुभाषवरही विश्वास होता.

 

काही दिवसातच सुभाषने त्याच्या वर्तणुकीबद्दल माफी मागितली. आणि खुपच सादगीने मुग्धावरच्या प्रेमाची कबुली दिली. तिनेही भरलेल्या डोळ्यांनी त्याला आपलसं केलं. आणि त्याचं चंद्रकोरीच्या साक्षीने मुग्धा आणि सुभाषने त्याच्या प्रेमाची नव्या आयुष्याची सुरुवात केली.'

 

~Written by 👧S.💞K.👦

 

'not bad, तु दिसतोस तेवढा dumb नाहीये, निदान लिखानात तरी'

सिया कबीरची स्तुती करत म्हणाली.

 

'तु माझी इन्सल्ट करतेय की स्तुती?'

तो हसत म्हणाला.

 

'jokes apart, पण खरचं, मल‍ वाटल होतं तु प्रेमाला काय वैज्ञानिक भाषेत मांडशिल वैगेरे.'

सिया त्याची खेचत म्हणाली.

 

'प्रेम स्वतःत एक विज्ञान आहे, त्याला कोणतच लॉजिक लागू होत नाही. प्रेमात विश्वास गरजेचा, संयम गरजेचा आणि व्यक्त भाव गरजेचे.'

तो शुन्यात पण धुंद होत बोलत होता. सिया त्याच्या पाणिदार डोळ्यात हरवली होती. इतक्यात त्याचा मोबाईल वाजला. दोघंही भानावर आले. त्याने फोन कट केला.

 

आर्टिकल पूर्ण झालं होत. बॉसला आवडलही होतं. दोघांनी आपआपलं काम चोख बजावलं होतं. प्रेम आणि वास्तविकता दोन्ही हि आर्टिकलमध्ये होतं. बॉसलेडी खुश होती. 

 

'मला वाटलं तु माझं काम बिघडवायला आलाय. पण तुझ्या विचारांनी तर सोन्यालाही अजून चमक आणली.' 

सिया क्युबिकलकडे जातांना कबीरला म्हणाली.

 

'तुला अस का वाटलं पण. हे बघ मी तुला विरोध करायला नाही आलेलो. देवाची मुर्ती घे ना ती आधीच किती सुंदर असते पण शृंगाराने तिला अजुन सुंदरता चढते. तसचं काही.'

तो तिच्याकडे पाहत हसून बोलला.

 

सिया मात्र काही क्षण स्तब्ध झाली. पहील्या भेटीतला कबीर आणि आजचा पार्टनर वेगळा होता अशी काहीशी शंका तिला येऊन गेली. कबीर त्याची बॅग उचलून निघालाही.

 

सिया जाणार्‍या त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहत विचार करु लागली.

(खरंच याच्या सुगंधीत विचारांनी तिच्या विचारांना शृंगार चढला होता.) 

ती हसत मागे वळाली मात्र तिचे पावलं आपसूक कबीर गेलेल्या दिशेने निघाले. कदाचित त्याला एकवार पुन्हा पाहण्यासाठी.

 

"कदम से कदम तो नही,

पर तु जिस जगह जाये,

अंधेरा हो या उजाला,

परछाई तेरे साथ चली आये।"

 

"चलते चलते ही सही,

कदम पे कदम तो नहीं,

पर. . .

अंधेरा हो या उजाला,

पर तु जिस जगह जाये,

परछाई तेरे साथ चली आये।"

 

"एक सलाम...!"

 

सिया आज कबीरची वाट पाहत पार्किंगमध्येच थांबली होती. ९.३० होत आले तरी साहेबांचा पत्ता नव्हता. थोड्यावेळातच कबीर आला, तसाच हवेच्या झोक्यासारखा. सगळ्यासोबत बोलत हसत लिफ्टने वरही निघून गेला, सियाकडे एकदाही न पाहता. ती जाणर्‍या त्याच्याकडे अा वासून पाहत होती. थोडी चिडली ही होती. 

 

वर क्युबिकलमध्ये गेल्यावर साधं good morning ही नाही केलं तिने. तो मात्र स्वतःच्या कामात एवढा गुंग होता की ती आलेली ही त्याला कळल नाही. खरतर त्याला समजल होतं पण तो तरीही बोलायला टाळत होता. १५ मिनिटं होउन गेले तरीही त्याने लॅपटॉपमधून ना वर पाहीलं ना ही नजर हटवली. तिने थोडी आदळआपट केली तेव्हा त्याने नजर तिच्याकडे फिरवली.

 

'अरेच्चा, तु कधी आलीस?'

तो पुन्हा लॅपटॉप वर नजर फिरवत म्हणाला. 

 

'तुला फक्त इथेच बोलता येतं का???' 

सिया हाताची घडी घालून तोंड फुगवुन बोलली.

 

कबीरची किबोर्ड वर वाजणारी बोटं थांबली. त्याने तिची चेअर जवळ अोढली.

 

'आधी मला सांग तु पार्किंगमध्ये माझी वाट पाहत होतीस ना?'

त्याने चेहर्‍यावर एक वेगळच स्माईल ठेवलं होतं.

 

'हो. . .'

सिया थोडी किंचाळतच म्हणाली.

 

'क्या बात है!! कबीर का जादू सियापे चल ही गया आखिर!!!"

कबीर स्वतःचीच पाठ ठोठावत म्हणाला.

 

सियाने त्याला एक खराब लुक दिला. उठून उभी राहीली.

 

'बॉसने आर्टिकलसाठी दोन जणांचा इंटरव्ह्यू घ्यायला सांगितलाय.'

ती हाताची घडी घालूनच कबीरकडे थोडी झुकत म्हणाली.

 

'अगं मग चलना बोलत काय बसलीस.'

कबीरने लॅपटॉप तसाच बंद करुन बॅग घेतली. सियाला अोढतचं पार्किंगपर्यंत घेऊन आला.

 

'आपण कॅबने जाऊया???'

सियाने विचारलं.

 

कबीर त्याची डार्लिंग बाहेर काढतच होता पण थबकला. 

 

'हो चालेल'

तो शुन्यातच बघत बोलला.

 

पुन्हा भानावर येऊन सियाकडे निरखून पाहू लागला. ती मोबाईलमध्ये काहीतरी करत होती. कबीरच वागणं काहीस बदलत होतं.

 

'निरागस सौंदर्य. . .' 

असच काहीस पुटपुटला. सियाला ऐकू गेलं नाही.

 

लगेचच कॅब बुक करुन ते दोघं निघालेही. ही पहीलीच वेळ होती दोघं बाहेर एकत्र जाण्याची.

 

इस छोटे सफर में क्या हमसफर मिला है,

मंजिलसे ज्यादा ये रास्ते अपने लगने लगे है।

कुछ पल कि खामोशी मिली है,

वो आवाज उस दिल तक पोहचाने के लिये।

 

कबीरची सतत फोनमध्ये चुळबुळ चालू होती. सियालाही समजल होतं काहीतरी झालंय म्हणून पण तिने विचारलं नाही. साधारण एक तासात ते ज्यांना भेटायचंय त्यांच्या ऑफिसपर्यंत पोहचले. कबीर अजुनही काहीतरी विचारातच होता. तो भलेही काही झालं नाही असं दाखवत असला तरी सिया त्याच्यावर लक्ष ठेऊन होती. त्याचं कामात लक्ष होतं पण तरीही तो बळेच काहीतरी वेगळ करण्याच्या प्रयत्नात होता. 

 

त्या ऑफिसमध्ये पोहचल्यावरही त्याने रिसेप्शनला थांबून सियाला ती मीटिंग करायला लावली. सियाने त्या दोन व्यक्तींचा उत्तम इंटरव्ह्यू घेतला. आर्टिकल्ससाठी तिला विषय आणि मायना दोन्हीही मिळाले. प्रेम असं ही होऊ शकतं याचं उदाहरण ते दोन व्यक्ती होते. 

 

सिया बाहेर आली तेव्हाही कबीर विचारातच गुंग होता. त्याच्या समोर ठेवलेल्या कॉफीवर साय जमली होती. सियाने हळूच जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला तसा तो गडबडून उठला. काहीतरी पकडल्या गेल्याची भावना त्याच्या मनात होती.

 

'काय झालं किती घाबरलास?'

- सिया

 

'डरना हमने सिखा नहीं'

कबीर स्वतःची शेखी मिरवत म्हणाला.

 

पण सियाला कबीरची ही बदललेली वर्तणुक समजत होती. मनाला येइल तस वागणारा कबीर आज स्वतःहून कामात लागला होता. तिला नजर देऊन बोलत नव्हता. गाडी त्याचा जिव कि प्राण होती तरीही सिया बोलल्यावर तो कॅबने यायला निघाला. मीटिंगला नाही आला. आणि सिया ला तो जणू टाळत होता. तिला अॉफीसला जायला सांगुन तो निघून गेला. कुठे ते मात्र त्याने सांगितले नाही. 

बॉसलेडी कबीरवर मेहेरबान होती म्हणून पुढचे दोन दिवस तो अॉफीसला उगवलाही नाही. 

 

सिया नवीन आर्टिकल्समध्ये बिझी होती. कबीर फोनही उचलत नव्हता. मेसेजला रिप्लाय मात्र कबुतराच्या चालीने द्यायचा, म्हणजे उशीराने. सियाने आर्टिकल्स लिहायला घेतलं. अर्थातच एकटीने कारण कबीरसाहेबांचा पत्ताच नव्हता. पण कबीर मात्र अॉफीसला येऊन जात होता. काहीतरी सिक्रेट काम करत होता. 

 

~ऑनलाईन भाव डाऊनलोडेड शब्द~

 

आजच्या धावपळीच्या जगात समाजमाध्यमांमुळे जग जरी जवळ आलं असलं तरी माणसं दुरावलीत, असं सांगणारे अनेकजण भेटतिल. आपल्या माणसांना वेळ देता न येणं हा दोष वेळेचा की माणसांचा? हा प्रश्न त्या लोकांवर सोपवला तरी चालेल. कारण निवड हि ऐच्छिक असते. एखाद्या गोष्टीच्या किती आहारी जायचं किंवा किती व्यसन लाऊन घ्यायचं हा सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न. पण तरीही या धावपळीत सगळा वेळ हा काही फुकट जात नाही हे ही तितकच खरं.

 

संवाद हा हवाच मग तो कोणाशीही असो. अनेकदा संवाद व्यक्तीच्या मनाचे अनेक कोपरे उघडतो. बंद दारामागे, मनात अनेक भाव लपलेले असतात ते बंद करुन नक्कीच चालत नाहीत. ही अशीच एका अबोल संवादाची कहाणी.

 

शब्द हेच शस्त्र असं काहीसं आयुष्यात असतं, काही लोक बोलतात. काही समजतात, काही समजवतात. उशिराने का असेना पण अनेकदा उमगतात, काही लोक. सावल्यांशी बोलणारे अनेक. तो ही असाच होता. एकांत प्रिय होता त्याला. सतत रात्री उशिरापर्यंत त्या रंगात शब्द शोधत राहायचा. बोलायला अस कोणी नव्हत जवळ. त्यापेक्षा असणार्‍या पर्यंत शब्द पोहचत नसायचे. 

 

तिला आठवायचा कायम. ती त्या हवेत होती त्याच्यासोबत. कधी अबोल तर कधी निरंतर बोलणारी, त्याची छवी. या अनोळखी जगात फक्त त्याची. तो अनेकदा भाव पोहचवायचा त्याचे. ती ऐकायची त्याला. आवाज नव्हता त्यात पण भाव होते. रोज ठरलेल्या वेळी भेटायचे दोघं, अॉनलाईन. तो सांगायचं मनातलं सगळं तिला. ती ही समजून घ्यायची. हळूहळू संवादाची जागा भावनेने घेतली. न बोलता उमगायला लागलं सगळं.

 

एके दिवशी अचानक ती अबोल झाली. कारण होतं आयुष्याचा नवा प्रवास. त्याने ही भाव व्यक्त न करता जाऊ दिलं तिला, तिच्या वाटेने. तो परत त्या एकांतात परतला. ती ही कदाचित नव्या वळणावर सुखावली असेल, असा विचार तो करू लागला. वेळ जातो तसं सगळंच स्वप्नाप्रमाणे अबोल झालं. त्यानेही आयुष्याचा निर्णय वेळेवर सोडला आणि साथ मिळाली एका नव्या सोबतीची. 

 

हळूहळू वेळ जाऊ लागला. तसं अनेक कोडे उलगडत जाऊ लागले. तिच्या अनेक सवयी या अोळखीच्या वाटु लागल्या. अनेक भाव अचानक आपलेसे वाटू लागले. ही नवलाई नक्कीच नव्हती. अॉनलाईन सावली प्रकट रुप घेऊन आली कि काय याबाबत तो साशंक होता. 

 

'जिला रोज शब्दांचे भाव उलगडायचो ती छवी समोर आल्यावर अगदी सोबतीसारखी दिसेल' 

 

असा काहीसा भाव त्याच्या मनात येऊ लागला. अनोळखीच पण कुठेतरी सतत संपर्कात येणारे भाव होते. तो ही आश्चर्यात होता, आणि ती ही. 

 

'रोज ऑनलाईन बोलणारा तो आपुलकीच मित्र जीवनसाथी बनुन भेटला तर नाही ना' असा काय तो मनात चालणारा तिचा विचार. या भावनेत नातं होतं, संवाद होता पण हवे असणारे शब्द नव्हते, व्यक्त होणारे भाव नव्हते. अनेक वर्ष हा अबोल संवाद चालू राहीला. 

 

मात्र एके दिवशी नकळतच भाव त्या ओळखीच्या शब्दातून व्यक्त झालेच. छवी शब्दातून व्यक्त झाली. आणि अनेक वर्ष कोंडून राहिलेला अनोळखी संवाद पूर्ण झाला. जिच्यासोबत रात्रदिवस स्वप्नात रंग भरले जायचे तिच जिवनाचे रंग बनवतीये ही भावना त्याला सुखावून गेली. मात्र संवाद घडायला एवढा वेळ गेला याचं च दुःख त्या दोघांना होतं. पण आता पुढचा अखंड वेळ ते संवादात आणि व्यक्त होत घालवणार होते. आयुष्याचे रंग सोबत भरणार होते, यावेळी सबंध आयुष्यभरासाठी...!

 

~Written by 👧S.👦K. 

 

आजच आर्टिकल्स सियाने तिच्या शब्दात लिहिलं होतं. तसचं स्वप्नाळू. पण यावेळची कथाही एखाद्या परीकथेसारखीच तर होती. खरतर अस होणं लाखात एक, म्हणूनच तर बॉसलेडीने यांची कहाणी आर्टिकल्ससाठी सुचवली होती. पण यावेळी शब्द पुर्णतः सियाचे होते, कारण कबीरचा पत्ताही नव्हता. तो अॉफीसला यायचा. सगळ्याशी बोलायचा मात्र सियाला टाळत होता. 

 

मार्चचा पहिला आठवडा होता. मागच्या आर्टिकल्स सबमिशननंतर कबीर पुन्हा पहील्यासारखा झाला होता. तसाच बोलायचा. टाईमपास करायचा. सियाच सतत डोकं खायचा. तिच्या स्वप्नांवर हसायचा असे अनेक त्रास त्याने सियाला दिले होते. पण कधी कधी सियाला वाटायचं तो जसा बोलतो, तिची खिल्ली उडवतो, यापेक्षा तो वेगळा आहे. पण परत त्याच्या वागण्यातून तो तिला तिचे विचार चुकीचे आहेत हे ही न बोलता पटवून द्यायचा. 

 

या महीन्याच मासिक घेऊन सिया-कबीरची एक सहकारी पळतच सियाकडे येत होती. कबीर साहेबांचा पत्ता नव्हताच. कबीर कोणत्याश्या तयारीत होता हल्ली. ८ मार्च ची तारीख होती, जागतिक महीला दिन. सगळ्याजणी सजून होत्या. सियानेही आज कधी नव्हे ती साडी नेसली होती. असो, त्या मुलीचा आवाज कॉरीडोअरमध्ये आदळत होता.

 

'काय झालं?? एवढी का अोरडतेय?'

सियाने तिला पकडून विचारलं. 

 

'आता नाही, सगळ्यांना अॉडीटोरीयममध्ये बोलावलय. खासकरून तुला' 

 

ती सहकारी एका दमात दम लागेपर्यंत बोलली.

 

सगळे ऑडिटोरीयमकडे निघाले. सियाही त्यामुलीसोबत निघाली.

 

सगळे आनंदात होते. महीलादिनाचं सेलिब्रेशन उत्तम चाललं होतं. अनेक रंगाचे फुगे आकाशात सोडण्यात आले. केक कापण्यात आला. बॉसलेडी आज खुप खुश होत्या. गेम्स झाले. सगळे मॅनेजमेंट अर्थातच कबीरने केलं होतं. यावेळचं मासिकही महिलादिन विशेष होतं. सियाने अजुन मासिक वाचलं नव्हतं. पण आलेले अनेक पाहूने, महीला तिला पाहून मंद स्मित करत होत्या. ति अजुनही शंकेतच होती.

 

कबीरने तिला महिलादिनाच्या शुभेच्छा दिल्या. कबीर ज्या पद्धतीने सगळ्यांसोबत बोलत होता, ते पाहून सियाही काही वेळ आश्चर्यात होती. कारण हा कबीर तिला फार वेगळा भासत होता. मुलींशी सतत फ्लर्ट करणारा, सुंदर मुलींना पाहून वेळ मारून नेणारा तो कबीर नव्हता हा. हा एक सुरेख मित्र होता. जो प्रत्येक स्त्री ची इज्जत करणारा, एक भक्त होता.

 

काही वेळात कबीरने माईकचा ताबा घेतला. यावेळचं मासिक त्याच्या हातात होतं. कोणीतरी सियाच्या मागे कुजबुजलं, की तो त्याने लिहीलेलं आर्टिकल्स वाचणार आहे. सियाला माहीत होतं यावेळी कबीरने तिला काहीच मदत केली नाहीये मग हा कोणतं आर्टिकल्स वाचणार होता. पण सगळीकडे शांतता झाली. बॉसलेडी सियाच्या शेजारी बसल्या होत्या, त्यानी सियाचा हात हातात घेतला. सियासाठी हे सगळं काहीसं वेगळं होतं. कबीरने वाचायला सुरुवात केली.

 

'कुछ तो बात है उन आँखोमें

यु ही नहीं हम उसमें खो जाते

कुछ तो आवाज है उन लबोंमें

यु ही नहीं हम यहीं थम जातें.

 

पहिली नजर पुरे असते समजुन घ्यायला. एखाद्याला भेटल्यावर मनापासून मानायला. काही लोक असतात ना ज्यांच्यासोनत फक्त वेळ घालवूनच सगळ्या समस्या संपल्यात जमा असतात. काही लोक असतात ना ज्यांना मनापासून आपलसं कराव वाटत. ज्यांना त्रास द्यावा वाटतो, हक्काने. आजवर अनेक नजरा पाहील्या, त्यातली चमकही पाहीली. पण आहे तसं स्विकारुन अबोल शब्द आणि बोलक्या डोळ्याची सिया त्यात कुठे नव्हती. सिया, आयुष्यात पहील्यांदा अशी मुलगी पाहीली, जिच्या डोळ्यात मला पाहून चमक नाही आली. आज तिच्याबद्दल लिहीतोय, कारण अशा फार कमी व्यक्ती असतात ज्यांच्यापुढे व्यक्त होता येत आणि कधी कधी व्यक्त होताही येत नाही. 

 

मैत्रिण ही उपमा मी केवळ सियालाच देऊ शकतो, हा एवढा छोटासा भाव तिला आजवर कळला नाही. गुलाबी रंगाशी विशेष प्रेम असणारी सिया, मी हलवलेल्या तिच्या गुलाबी वस्तुबाबत मला एकदाही बोलली नाही. प्रेम हा अर्धवट भाव ती तिच्या शब्दांने इतका खुलवते, कि वास्तविकता स्वतःच अस्तित्व विसरते. मैत्रिण म्हणून, कधी व्यक्ती तर कधी स्त्री म्हणून प्रत्येक पात्रात ती स्वतःला सिद्ध करते.

 

माँ का आचल हो या बेहेन कि राखी

दोस्त की डांट हो या प्यारकी बांहे

मासी का गुबारा हो या बुआ का चॉकलेट

दादी कि मिठाई हो या नानी की कहाणी

हर रुप में, हर चाह में तु परीपुर्ण है

ऐ नारी तुझे दिल से सलाम है, सलाम है।

 

स्त्री, आजच्या जगात सन्मानाने जगता यावं म्हणून झगडणारी ती देवी. सहनशीलता, सृजनशीलता, शालिनता, कोमलता, चंचलता, कुशलता या आणि अशा अनेक दैवी शक्ती निर्सगाने स्त्रीला बहाल केल्यात. तरीही अजुनही अनेकजण तिच्या निशब्द आकांताला तिची कमजोरी समजतात. प्रेम हा भाव केवळ स्त्रींयामध्येच आहे, चुकीचं नक्कीच नाही. 

 

स्त्री जर सीता बनुन सगळ सहन करु शकते तर काली बनुन विनाशही करू शकते. तिच्या तोंडावर हात ठेऊन तिचा आवाज दाबता येऊ शकतो मात्र बांगड्याच्या त्या मनगटातली ताकद अनेक पर्वत उलथुन टाकू शकते. तिच्या नजरेला नजर देऊन बोलण्याची तयारी नसेल तर तिच्या पायावर डोकं टेकवा, बाकी जागी नजर टाकण्याची परवानगी तर त्या विधात्याने कोणालाच दिली नाहीये. 

 

स्त्री जन्माचे स्वागत, आणि तिची सुरक्षितता हाच काय तो आपला धर्म. ती स्वतःची सुरक्षितता करू शकते. ती तेवढी सक्षम नक्कीच आहे, मात्र तरीही जर एक आई म्हणून, बहीण बनून, मैत्रिन-प्रेयसी-पत्नी बनुन जर ती आपली काळजी घेऊ शकते, मुलगी बनुन आपलं चालतं-बोलतं ह्रदय बनू शकते, तर तिच्या आनंदाची, सुरक्षिततेची जबाबदारी ही आपली.

 

आजचा हा लेख माझी पार्टनर सिया, माझ्या गुरु बॉसलेडी, माझ्या सहकारी महिलानां आणि त्या समस्त

स्त्रीयांना ज्यांनी जीवन प्रेमय केलयं.'

 

~Written by - 👦Kabir

 

टाळ्यांचा कडकडाट झाला. सिया अजुनही शॉकमध्ये होती. सगळा कार्यक्रम झाल्यावर चाट पार्टी झाली. थोड्यावेळाने कबीर सिया त्यांच्या क्युबिकलमध्ये आले. सियाच्या जागेवर एक गिफ्टबॉक्स होता. कबीरने ठेवला असेल यात तिला शंका नव्हती. तिने उघडून पाहीला. आत एक सुंदर किचेन होतं.

 

'Thank you!!' ती कबीरकडे पाहून म्हणाली. तो मात्र काही झालचं नाही याच नजरेने तिला पाहत होता.

 

'Thank you, माझ्याबद्दल लिहिलं त्याबद्दलही.' ती मनापासून बोलली.

 

'तुझ्याबद्दल लिहिण तस अवघड होतं' तो बर्‍याच वेळानंतर बोलला. तिने त्याच्याकडे पाहीलं.

 

'तुझ्याविषयी खुप स्वच्छ भाव येतात मनात. सिया तुला भेटल्यापासून कुठेतरी शांत वाटायला लागलयं. आजवर अनेक मुली पाहील्या पण मैत्रिण कशी असावी, तुला पाहून कळतं. Thank you so much माझी मैत्रिण म्हणून माझ्या आयुष्यात येण्यासाठी.' तो तिचा हात हातात घेऊन मनापासून बोलत होता. शब्द जरी मैत्रीचे असले तरी भाव दोघांसाठी अनोळखी होते. 

 

ऑफिसमध्ये अजुनही महीलादिन सेलिब्रेशन सुरुच होतं. काम म्हणावं तस काहीच चालू नव्हतं. कबीरने गिटार वर एक गीत वाजवायला घेतलं. आणि सगळेच त्यात रमुन गेले.

 

तु हि तु, . . .

तु हि तु,. . . .

तु हि तु. . . .

तु हि तु,. . . .

 

ममता भी तु, क्षमता भी तु

चंचल भी तु, नटखट भी तु

आंचल भी तु, बादल भी तु

मेरा आज तु, मेरा कल भी तु

 

मैं तेरा हि तुझमें ही, 

तुझ में ही, मैं मुझ में ही

तु हि तु, तु हि तु,

 

तु हि उमंग

तु हि तरंग

तु हि डोर डोर

तु हि पतंग

 

दुर्गा भी तु, लक्ष्मी भी तु

तु सरस्वती, काली भी तु

मैं तेरा हि तुझमें ही, 

तुझ में ही, मैं मुझ में ही

तु हि तु, . . . 

तु हि तु. . . .

 

'काय बोलाव या कबीरला? पाहीजे तेव्हा गायब होतो. बॉसपासून वाचवावं ही लागतं. कुठे गेलाय कोणाला माहीत.'

 

सिया स्वतःशीच बडबड करत अॉफीसच्या पायर्‍या उतरत होती. मध्येच दोन पायर्‍यावरुन घसरली, सावरायला रेलिंग घट्ट पकडलं तिने. 

 

(अनेकदा असचं होतं ना. आपण आपल्याच धुंदित असतो. सोबत रेलिंगसारख सावरायला कोणीतरी असतं पण जोपर्यंत पाय घसरत नाही तो पर्यंत रेलिंगची किंमत कळत नाही. मग घसरुन पडण्याआधी आपण घट्ट रेलिंगला पकडुन राहतो, अगदी सावरुन गेलो तरी. असो.)

 

सियाने ठरवलं होतं कबीरला जाब विचारायचाच. आर्टिकल दोघांच होतं. मेहनत दोघांची होती तरीही कबीर वेळ देत नव्हता. काम तो करायचा. त्याचा मायना वेळेत तयार असायचा मात्र तरीही सियाला तो भासत नव्हता. अनेकदा क्युबिकलमधली त्याची चेअर मोकळी असायची. ड्राफ्टच्या आधी मात्र आर्टिकल पुर्ण असायचं. खरतर कबीर आर्टिकल्स ला पुर्ण वेळ देत होता, सियाला नाही, हे च सियाला कुठे तरी खटकत होतं.

 

तिने रागातच गाडी चालु केली. ऑफिसमधून कबीरचा पत्ता भेटला होता. थोडी चौकशी केल्यावर त्याच घरही लवकर सापडलं, हो घर. बॅचलर असला तरी एक उत्तम घर होत ते. बाहेर बाग, चाफा, जास्वंद, गुलाबाचे झाडं. उदास वातावरनातही मोहरुन येईल असं घर. असणारचं तेवढं प्रसन्न, अफ्टरऑल कबीरच घर होतं ते. त्याच्यासारखं सदैव प्रफुल्लित. कुठेच काही बोलायला वाव नाही असं. 

 

आत जाईपर्यंत सियाच्या डोक्यात कबीरविषयी राग होता. पण ती हिरवळ, सुंदर फुले आणि मोहक सुगंध यामध्ये ती सगळंच विसरुन गेली. बेल वाजवली तसा आतमध्ये काहीसा आवाज झाला. थोड्याच वेळात कबीरने दार उघडलं. सियाला दारात पाहून तो डोळे विस्फारून पाहू लागला. 

 

'फोन करुन यायला हव होतं' असं काहीसं सियाच्या मनात येऊन गेलं.

कबीरने काहीच न बोलता हातानेच तिला आत यायला सांगितलं. सिंपल साधा फॉर्मल स्लीव्हस् फोल्ड केलेला शर्ट, आणि ट्राऊजर होती अंगावर. डोळ्यावर कधी नव्हे ते बारीक काड्यांचा चश्मा होता. ऐरवी तो लेन्सेस वापरायचा. डोळे थोडे लाल होते. सिया सोफ्यावर बसली. त्याने तिला पाण्याची बाटली दिली आणि तिच्यासमोर बसला.

 

'ते तू ऑफिसला आला नाही म्हणून.'

सिया पाणी पिऊन झाल्यावर उगचच काही बाही बोलुन गेली. खरतर तिला ही समजत नव्हतं ती का आलिये म्हणून.

 

'पण ऑफिसचं तर सगळं काम पुर्ण आहे?'

कबीर थोडा विचार करत म्हणाला.

 

'हो. . . पण तु. . . . येत नाही ना. . . . ऑफिसला. . .' सिया थोडी अडखळत म्हणाली.

 

'मग??'कबीरने डोळे बारीक करुन तिला विचारलं. तो थोडा रोखुन पाहत होता.

 

'मग काय. . .का नाही आला. . .म्हणून आले.'

सिया थोड्या मोठ्या आवाजात म्हणाली.

 

'सिया, तू पार्टनर आहेस माझी ते ही कामापुरती. आणि काम पुर्ण आहे. सो माझ्या पर्सनल लाईफमध्ये येन बंद कर. मला काम आहेत खुप.'

 

कबीर रुक्षपणे म्हणाला. शेवटच वाक्य त्याने दरवाजाकडे हात करत बोललं. सियाला खुप लागलं त्याचं बोलणं. ती काही न बोलता सरळ निघून गेली. ती गेल्यावर मात्र कबीर डोळे घट्ट मिटुन बसला. त्याने काय केलयं हे लक्षात यायला थोडा वेळ गेला. काही वेळात सियाला थांबवायला दरवाज्याजवळ आला मात्र ती निघून गेली होती. कदाचित रडतच.

 

काही वेळापूर्वी,

 

कबीर मस्त मुडमध्ये गाणे म्हणत साफसफाई करत होता. कुठेतरी त्याला सिया आठवत होती. तिच हसू, निरागस बोलणं, तिचे स्वप्न हे सगळं परत आठवत तो स्वतःशीच हसला. गाणे गुनगुनत त्याचं काम सुरु होतं. 

 

थोड्या वेळात त्याचा फोन वाजला. खुप जवळच्या मित्राचा फोन होता. मस्त गप्पा झाल्या कबीरच्या त्याच्या सोबत मात्र त्याचं काम कबीरला राग आणायला पुरेसं होतं. तो मित्र सिया चा नंबर आणि माहीती मागत होता. कबीरला खुप राग आला त्याचा. तो रागात अनेक शब्द बोलून गेला.

 

'आजवर तुझ्या सगळ्या गर्लफ्रेंड आम्ही ही फिरवल्यात पण आता तुला या सियाचा जरा जास्तच पुळका आहे.'

मित्र फोनवर हसत कबीरची खिल्ली उडवत म्हणाला.

 

'सिया फक्त माझी. . . . . . .'

 

वाक्य पुर्ण होण्याअगोदरच फोन कट झाला. 

 

कबीरला समजत नव्हत तो एवढा का चिडला. सियाबाबत कोणी अस बोललेल त्याला सहन होत नव्हत. सियाला तो आता पार्टनर, मैत्रिण यापलिकडे जाऊन काहीतरी खास समजायला लागला होता. आजवर अनेक मुलींसोबत तो राहीला होता पण सिया वेगळी होती. पैसे, कॉफी, डेट, मुव्ही यापलिकडे तिच एक जग होतं ज्यात निव्वळ प्रेम होत. 

 

आता,

 

कबीर सियाला फोन लावत होता. मेसेज करत होता पण कशाचाच रिप्लाय नव्हता. काहीवेळाने फोन ही स्वीच ऑफ यायला लागला. कबीर आवरुन ऑफिसलाही गेला मात्र ती तिथेही नव्हती.

 

पुढचे दोन दिवस असेच गेले. सियाच्या घरी जाणं कबीरला योग्य वाटत नव्हतं म्हणून तो गेला नाही. सियाच्या मैत्रिणी तिच्या कॉन्टॅक्टमध्ये होत्या. कबीरला फार नाही पण थोडी फार खबरबात मिळायची तिची. अशातच ड्राफ्ट सबमिशन्सची वेळ आली. आर्टिकल्स तयार नव्हतं. कबीरने स्वतःचा मायना पुर्ण आहे पण सियाचा नाही, असं काही कारण देऊन, बॉसलेडीकरवी सियाला बोलावणं पाठवलं.

 

कबीरला माहीत होतं, बॉसच्या बोलवण्यावर सिया नक्की येईल आणि तो तिची माफी मागु शकेल. पण त्याचा हिरमोडच झाला. सियाच्या जागी आलं फक्त आर्टिकल.

 

~ओळख~

 

कुछ बंदिशे है हमारी, कुछ राज दफऩ है।

कहीं पिंजरे है यहाँ, कहीं बंद ताले है।

कोई दुर खडा़ आवाज दे रहा है।

ये जंजिरे अब तोडनी है।

उस अौर दौड लगानी है।

जहाँ बस सवेरा है।

जहाँ बस सवेरा है।

 

आयुष्याच्या वाटेवर अनेक जण भेटतात. काही थांबतात काहीपुढच्या प्रवासाला निघतात. आठवणी मात्र सगळेच देऊन जातात. काही प्रेमळ आठवणी, काही सुखद आठवणी, काही शाब्दिक मार तर कधी न विसरता येणारा वेळ.

 

कधी कधी सगळ एका सजवलेल्या पिटार्‍यात टाकून दूर समुद्रात सोडून द्यावा वाटतो तर कधी उंच शिखरावर जमिनीखाली पुरावा वाटतो, तो वेळ. एखाद्याला समजुन घेतांना अनेकदा खर्च होतो तो वेळ. हे नुकसान फार मोठ, भरुन न निघणार. कारण एवढा वेळ खर्च करुनही व्यक्ती अनोळखीच असेल तर मिळकत ती काय. 

 

सौंदर्य पाहणार् या च्या नजरेत असत. पण समोरचा नजरच चोरत असेल तर काय. अनेकदा हे भाव शब्द बोलत नाहीत. समोरच्याचे डोळे बोलतात. पण तरीही ते नाकारलं जात असेल तर प्रसंग बिकट होतात.

 

अनेकदा बोलणंच सगळ्यावर उपाय असतो असं ही नाही. पण तरीही शब्द घाव देतातच. नकळत एका वाटेवर निघालो तर सोबत हवी ती मिळेलच माहीत नाही अनेकदा झिडकारलं ही जातं, कारण न सांगता. मग अशा वेळी मन फक्त चुका मोजत बसतं. 

 

सतत बदलते रंग एकवेळ वेगळे करता येतिल पण मानसांच्या स्वभाव रंगाचं काय? ते कशे अोळखायचे. आणि अोळखले तरी व्यक्ती अनोळखीच. समजण्यासाठी वेळ गरजेचा पण तरीही चुक होत असेल तर पुन्हा पारखुन घ्यावं. व्यक्ती निवडन्यात तर चुक नाही झाली ना, कारण उशीराने कळलेल शहाणपण, अोळखीला अनोळखी नजर देते.

 

अंजान सफर पे अंजान साथी थे,

वक्त गुजरा जानेपेहचाने से हो गये।

अब राह तो पेहचानी लग रही है,

पण साथी अनजाने हो गये।

 

~Written by - 👧S.&K👦

 

कबीरला आता स्वतःचा च राग येऊ लागला होता. कोणाचा तरी त्रागा त्याने सियावर काढला होता. तिची काही चुक नसतांना. खरतर कबीर सियाविषयी काहीतरी खास भावना ठेऊन होता. पण तो तिच्यायोग्य नाहीये हे ही त्याला माहीत होतं, म्हणूनच टाळत होता तिला. पण जे व्हायला नको होतं तेच झालं. सिया दुर होती त्याच्यापासून, आणि यापेक्षा वाईट ती नाराज होती, दुःखी होती.

 

'बास, सियाची माफी मागायची.काहीही झाल तरी तिला मनवायचं.'

 

कबीरने मनाशी पक्क केलं.

 

यार को मनाने चले, कुछ दुअा करो यार।

भलेही माफी ना मिले, एक मुस्कान मिले यारो।

करने उसकी नाराजगी दुर हम चल दिये उन राहो पे,

जहाँ हवायें के गीत भी उनकी हसीं के मोहता़ज हेै।

 

 

👧हम-👊💓👊-तुम👦 = "Hide & Seek...!"

 

अक्सर कुछ बाते दिल बयाँ करना चाहता है...

शब्द जबान तक़ आके वहींसे लौट जाते है...

वो अनजाना शक्स अपना सा बन जाता है...

ये वक्त का नशा है जनाब...

ना तो वक्तसे उतरता है...

ना वक्तको उतारने देता है।

 

कबीर असचं काहीतरी लिहित होता. सियासोबत बोलणं होत नव्हतं. आता त्याने हि प्रयत्न सोडले होते. आर्टिकलच काम तेवढ काय ते वेळेत आणि योग्य चालायचं. पण त्यातुनही आता प्रेमाचा रंग हरवला होता. कोणीतरी दुखी आत्माने आर्टिकल लिहिलं असाव असच काहीसं वाटायचं. बॉसलेडीने एक दोनदा जाऊ दिलं. पण हरवत चाललेला फेम तिला परत मिळवायचा होता. सिया कबीर एकत्र आले तरच ते शक्य होणार होतं. 

 

बॉसलेडीने सिया कबीरला मेसेज करुन केबिनमध्ये बोलावलं. कबीर वेळेत पोहचला पण सियाला यायला उशीर होणार होता. वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. बॉसलेडी सिया येईपर्यंत कबीरसोबतही काहीच बोलली नाही. वातावरण काहीस तंग होतं. कबीरही उगीचच टेबलवरच्या पेन सोबत खेळन्यात मग्न होता.

 

सिया कबीरच्या घरुन आल्यापासून हरवल्यासारखी वागत होती. कबीरचं बोलणं तिच्या मनाला फार लागलं होतं. कबीर जो सगळ्यासमोर रंगीत मुखवटे खालून मिरवतो, मुलीसोबत अनेकदा फ्लर्ट करतो, सोप्या भाषेत मुली फिरवतो, तोच कबीर मुलींबाबत किती हळवा आहे हे सिया ओळखून होती. त्या डॅशिंग कबीरमागे एक स्वच्छ मन असलेला कबीर ती पाहत होती. वॉचमेनला वॉचमेनकाका आणि पिऊनला पिऊनमामा करुन त्यांच्याशी गट्टी करणारा कबीर तिला ठाऊक होता. प्रेमाला कितीही टाईमपास म्हणत असला तरी खर्‍या प्रेमावर विश्वास असणारा आणि त्याची वाट पाहणारा कबीर तिला माहीत होता. त्याचा हाच निर्मळ स्वभाव पुरे होता सियाला त्याच्या प्रेमात पाडायला. पण कबीरचा तुसडेपणा तिला दुखावून गेला होता. तिचे विचार सावरायला तिला वेळ हवा होता, म्हणून ती कबीरला टाळत होती. पण तरीही आर्टिकलमधुन तिचे भाव व्यक्त झालेच. 

 

आज बॉसलेडीने भेटायला बोलावलं होतं. म्हणजे कबीरशी सामना पक्का. सिया मनाची तयारी करुन होती. कबीरविषयी तिच्या भावना कोणत्याही परिस्थितीत त्याला कळु द्यायच्या नव्हत्या तिला. ती अॉफीसमध्ये पोहचली. दिर्घ श्वास घेऊन केबिनमध्ये प्रवेशली.

 

कबीर आणि सियाची नजरानजर झाली. तो काही बोलणार इतक्यात बॉसलेडीने सुरुवात केली.

 

'वेलकम बॅक सिया, अजुन किती दिवस आर्टिकल दुखात जाणार आहे?'

 

कबीर सिया एकमेकांकडे पाहत होते फक्त, अपराधी भावनेने.

 

'सॉरी. . . . .'

दोघ एकसोबतच म्हणाले.

 

'मला आर्टिकलमध्ये प्रेम हवयं. थोडा ट्विस्ट ठिक आहे पण कायमचा डिस्टंन्स नको. आता कामाला लागा. आणि हो, ही लास्ट वॉर्निंग.'

बॉसलेडी ऐव्हील स्माइल करत म्हणाली.

 

कबीर सिया केबिन बाहेर आले. त्यांच्या क्युबिकल कडे चालु लागले. मध्येच कबीर जागेवर थांबला, सियाला जाणवले पण ती चालतच राहिली.

 

'सॉरी सिया. . .'

कबीर काकुळतीला येऊन तोंड बारीक करुन म्हणाला.

 

सियाने मागे वळून पाहीले. तिचा चेहरा शांत होता.

 

'कोणाचा राग कोणावर निघाला. आर्टिकलसाठी नाही पण खरचं मी खुप मिस केलं तुला.'

कबीरचे चे डोळे भरले होते. तो खर मनापासून बोलत होता आणि सिया हे जाणून होती. ती ने स्माईल केली आणि डोळे मिचकावले. 

 

कबीरने हसत जाऊन तिला मिठी मारली. तशी ती थोडी अनकम्फर्टेबल झाली. 

 

'thank u so much, सिया मला वाटलं मी माझी मैत्रिण कायमची हरवली.'

 

कबीर नॉनस्टॉप बोलत होता. कबीर सियाने त्याला माफ केलं या आनंदात होता आणि सियाला भिती होती तिच्या कबीरविषयीच्या भावना त्याला समजल्या तर काय होईल. तिने थोड्या वेळात त्याला दुर केले. आणि दोघ क्युबिकलमध्ये आले. 

 

आज इतक्या दिवसांनी दोघं सोबत काम करणार होते. क्युबिकलमध्ये सियाच्या सगळ्या जुन्या गुलाबी रंगाच्या वस्तु जागेवर होत्या ज्या कबीरने आल्यावर हटवल्या होत्या. त्या पाहून सियाने कबीरकडे प्रश्नार्थक नजरेने पाहीलं.

 

'तु नव्हती तेव्हा इथे प्रेम पसरवायला काहीतरी तर हवं होतं ना! तुम नहीं तो तुम्हारी प्यारी चिजे सही!'

तो फिल्मी अंदाजात सियाला चेअरवर बसवत म्हणाला. कबीरने स्वतःची चेअर तिच्या जवळ घेतली.

 

'मग काय विषय घ्यायचा यावेळच्या आर्टिकलचा'

सिया work mode on करत म्हणाली.

 

'विषय नाहीये डोक्यात, प्रेम वाटन कमी झालयं सध्या. तु दुर गेल्यापासून एका ही गर्लफ्रेंडला भेटलो नाहीये'

 

शेवटच वाक्य तो जीभ चावत म्हणाला. सियाने झटकन मान वर करुन त्याला पाहीलं. कबीर आणि मुलींपासून दुर ते ही सिया मुळे. ही भावना सियाला सुखावत होती पण कबीर तिला फक्त एक मैत्रिण मानत होता. ती त्याला रोखुन पाहू लागली.

 

'मग तुझाच विचार असायचा, अफ्टरअॉल माझी बेस्टी चिडली होती. पण तु एवढ्या लवकर ऐकशिल माहीत असत तर तुझ्या घरापुढे मी या आधीच आंदोलन केलं असतं.'

 

कबीर हसत हसत सियाला ही हसवायचा प्रयत्न करत होता. कारण सिया खोट हसतीये किंवा काहीतरी लपवतिये हे त्याला समजत होतं.

 

'मैत्री आणि प्रेम किती स्पेशल आहे ना. पण एका दरवाज्यातून दुसर्‍यातला प्रवेश तितकाच अवघड. . .'

 

खुप वेळाने सिया धुंदीत बोलत होती.

 

'मैत्री. . . या वेळी मैत्री आणि प्रेम याविषयी लिहू या?'

 

कबीर excitement मध्ये म्हणाला. सियाने हि हसून संमती दर्शवली.

 

~मनातून झालेली मनासोबतची लपवाछपवी~

 

"कुछ केहना है हाल ए दिल तुम से,

दिल कि बात दिल तक़ ही रखनी पडती है।

दोस्त तुम ही हक़दार दिल के,

ये बात जुबान पे दबानी पडती है।"

 

मैत्री एक सुरेख शब्द, त्याहून सुरेख नातं. जिथे बंधन नसूनही त्या साखळीतून कोणी सुटून जात नाही. अगदी क्षणाक्षणाला भेटनारा मित्र अथवा मैत्रिण वर्षानुवर्ष दुर असले तरी नात्याचे बंध सुकत नाहीत. कोणत्याही नात्यात एकदा दुरावा आला की पुन्हा जोडल्यावर ती जोडनीची गाठ थोडा त्रास देतेच. वेळ जाईल तसा नातं अजुन घट्ट होत जातं. मैत्रीत तस होत नाही. कारण एकतर नातं तुटावं इतकं कोणी अोढत नाही आणि जरी गाठ बसलीच तर होतीच केव्हा म्हणून दोन मित्र हातात हात घालून चालु लागतात. 

 

एक लडका और लडकी कभी दोस्त नहीं होते. हा काय तो जुना फिल्मी स्टुपिड डायलॉग. पण मैत्रीत कधी तो किंवा ती येतच नाही. मैत्रीत येत ते नवं नातं, आपुलकीचं, काळजीच, हक्काचं आणि प्रेमाचं.

 

तो किंवा ती आयुष्याच्या, मैत्रीच्या नात्याच्या या वाटेवर कधी ना कधी प्रेमात पडतेच. मग मैत्री तुटेल अथवा मित्र दुर जाईल म्हणून सुरु होतो लपाछपीचा खेळ. सगळं स्पष्ट असुनही त्या भावना शिताफीने लपवल्या जातात. झुरनी वाट्याला येते. हे सगळ चालु असतं फक्त समोरची व्यक्ती आपल्यापासून दुर जाऊ नये म्हणून. हळूहळू ही लपवाछपवी वाढते आणि सुरु होतो हक्काचा खेळ. आणि आपण मैत्रीचा हक्क सोडून एका वेगळ्याच नात्याने समोरच्यावर हक्क गाजवायला जातो, मग मिळत एक उत्तर, जे फरक समजावतं मैत्री आणि गाजवत असलेल्या हक्काचा. वास्तविकतेचा साक्षात्कार झाल्यावर दुःख काय ते वाटेला.

 

सवय, मैत्री आणि प्रेम या सगळ्यात जिंकते ती वेळ. एखाद्या व्यक्तीच्या सवयीला आपण मैत्री समजतो तर कधी कोणाच्या मैत्रीला प्रेम. या नात्याच्या खेळात सगळ्यांनाच घाई असते. त्यामुळे ही मैत्री कि प्रेम की फक्त आसक्ती हे समजायला वेळ हा हवाच. अपेक्षा तुटतात तेव्हा त्रास हा होनारचं ना. कारण नातं बनवलं जातं, खुलवलं जातं, लादलं जात नाही आणि जाऊ ही नाही. पण प्रयत्न हा हवाच. तिटकारा येईल इतका नाही. कारण बांधून ठेवलं हातात असलं तर मन हे स्वैर आहे. आणि प्रेम ही भावना त्याहून ही स्वछंद. 

 

कित्येकदा दोन्ही बाजुनी प्रेमाची भावना असते पण समोरचा काय विचार करेल याच विचाराने लपवाछपवी सुरु असते. दोन भिन्न स्वभाव त्यावेळी एकच विचार करत असतात. मैत्रीच सही पण या नात्यात दुरावा नको, मग जिवघेणा अबोला सुरु होतो. अशा वेळी व्यक्त होनं ही गरजेचं, नाहीतर मैत्री, प्रेम आणि व्यक्ती हि वेळेनुसार निर्णय घेतात. एखाद्या नात्याला वेळ द्यावा पण वेळ आल्यावर कबुली हि द्यावी. 

 

कारण नात्यात बंधन नसलं तरी बंध हे असतातच.

 

"रुक जाओ ना घडीभर,

बात आज लब्जोपे लानी है।

कुछ केहना हेै जुबान को,

तुम सुनना मुझे सुनानी है।

मत जाओ इस रास्तो से दुर।

युही साथ चलते चलते,

ये जिंदगानी बितानी है।"

 

~Written by - 👧 S. & K. 👦

 

'उफ्फ. . .आज लिखानाला पहील्यासारखी झालर चढली.'

कबीर चेअरवर मागे रेलत म्हणाला.

 

'सॉरी. . .'

सिया मान खाली घालत म्हणाली.

 

कबीर आश्चर्याने तिला पाहू लागला.

 

'मी जरा जास्तच तुझ्याबाबतीत इंटरफेअर करायला लागले होते. तुला राग येनं स्वाभाविक होतं तरी ही मीच ऐवढा वेळ वाया घातला.'

ती खुप शांततेत पण दुखी होऊन बोलत होती. कबीरने तिची चेअर जवळ अोढली.

 

'अनेकदा नात्यांना वेळ द्यावा. पण इतकाही नाही कि वेळेतून नातं निसटून जाऊ लागेल. मला आनंद आहे की तु सावरायला वेळ घेतलास पण हा वेळ मलाही तुझी जागा समजुन द्यायला उपयोगी आला.'

कबीर मनापासून बोलत होता.

 

सिया त्याच्या डोळ्यातले भाव समजुन घ्यायचा प्रयत्न करत होती. पण ते पाणीदार डोळे वाचनं तिला अवघड जात होतं.

 

कबीर थोड्यावेळात प्रिंटआऊटस् घेऊन बॉसलेडीकडे निघाला. सिया अजुनही कबीरच्या वाक्याचा अर्थ लावण्यात गुंग होती. 

 

'अनेकदा व्यक्त होनं दुरावा नाही तर नवं नातं हि देऊन जातं'

 

कबीर क्युबिकलच्या दरवाज्यातून सियाकडे पाहत म्हणाला. सियाने चमकुन त्याच्याकडे पाहिलं. तो तिच्याकडे पाहत मागे चालत होता. त्याने डाव्या हाताच्या मुठीने दोन वेळा त्याचं ह्रदयावर हळूच मारलं आणि सियाकडे बोट करत झटकन मागे वळून बॉसलेडीच्या केबिनकडे गेला. सिया च्या चेहर्‍यावर अलगद हसू झळकलं, कदाचित कबीरचं मन तिला समजायला लागलं होतं.

 

दिल मांग रहा है मोहलत तेरे साथ धड़कने की. . .

तेरे नाम से जीने की तेरे नाम से मरने की. . .

 

तेरे संग चलूँ हरदम बन कर के परछाई. . .

एक बार इजाज़त दे मुझे तुझमें ढलने की. . .

 

देखा है जबसे तुमको मैंने ये जाना है. . .

मेरे ख्वाहिश के शहर में बस तेरा ठिकाना है. . .

 

मैं भूल गया खुद को भी बस याद रहा अब तू. . .

आ तेरी हथेली पे इस दिल को मैं रख दूँ. . .

 

दिल मांग रहा है मोहलत तेरे साथ धड़कने की. . .

तेरे नाम से जीने की तेरे नाम से मरने की. . .

👧हम-👊💓👊-तुम👦 =

"अबोल ती अव्यक्त मी...!"

 

कुछ मोह़लत चाहीये इस वक्त से, 

कुछ लब्जोकि तय्यारी तो कर ले

यार को दिल बात बतानी है, 

खुदा से कुछ दुआ तो कर ले

 

अे दोस्त ना जाना दुर हमसे, 

हम अकेले ना रेह पायेंग।

एक पल तो हात थांम लो 

फिर कभी ना छोड जायेंगे।

 

सिया डायरीत असेच काहीसे शब्द उमटवत होती. कबीर विषयी तिची अोढ तिला दुर राहू देत नव्हती. उघडउघड ना सही पण कबीरही मनातल्या गोष्टी अलगद उमलुन देत होता. पण त्याचा स्वभाव पाहता प्रेम ही भ‍ावना समजन त्याला अवघड जाणार होतं हे नक्की.

 

'हमे मोहब्बत से मोहब्बत होती अगर आप इस आईसक्रिम को कबूल कर लेते.'

सिया समोर आईसक्रिम चा कोन करत कबीरने फिल्मी अंदाजात विचारलं.

 

सियाने पटकन डायरी बंद केली. त्याच्या हातातून आईसक्रिम कोन घेतला.

 

'हल्ली तु कोणत्या टाईपचे मुव्ही पाहतोय?'

सियाने डोळे बारीक करुन विचारलं.

 

'cool ना, म्हणजे फिल्मी अंदाज जाणवतोय तुला!'

कबीर स्वतःची शेखी मिरवत म्हणाला.

 

'जरा जास्तच. . .'

सिया कबीरला ऐकू जाणार नाही इतकं हळू म्हणाली. पण तरी त्याने ऐकलचं. तो डोळे बारीक करुन तोंड फुगवून तिला लटक्या रागाने पाहू लागला.

 

'ok sorry, मी तुला काही सजेस्ट करु का?'

सिया थोडी excited होऊन म्हणाली.

 

'Love Stories चे पारायण करण्यात मला इंटरेस्ट नाही.'

तो आईसक्रिम चा लास्ट चॉकलेट पार्ट खात म्हणाला.

 

'मग सध्या कोणत्या अजीबोगरीब फिल्म सुरु आहेत.?'

सिया तिचं आईसक्रिम संपल्यावर रुमालाने हात पुसत विचारलं. कबीरने तिच्या हातून रुमाल घेतला आणि तोंड पुसु लागला.

 

'तुला न सांगितलेल बरं. उगचं रडत बसशिल?'

हसत हसत कबीरने उत्तर दिलं. तशी सिया रागाने झटकन वळून लॅपटॉपमध्ये लिखान करायला लागली.

 

कबीरने तिची चेअर जवळ अोढली. आणि तिच्या नाकावर बोट मारत म्हणाला.

 

'SRK च्या फिल्मी आणि रोमॅन्टिक मुव्हीज पाहतोय, इमोशनल. प्रेमाची ती बाजु हि समजुन घेण्यासाठी.'

सिया ला त्याच मत पटलं. सोबतच दोघांना नवीन आर्टिकलचा विषयही सापडला.

 

 

~ते अनोळखी नातं......!~

 

"नयी राहे नयी मंजिल

अंजान सितारे घुमता आसमाँ

ये जुगनुअो की टिमटिम

अंधेरेकी सरसराहट

दोस्त कहीं बिछड़ ना जाये हम. . .

भरोसे से ये हात थांम साथ चले चल. . ."

 

नव्या व्यक्तीला भेटतांना अनेक प्रश्न असतात मनात. कोण असेल ? स्वभाव कसा असेल वैगेरे वैगेरे. पण त्या व्यक्तीसोबत नातं कसं खुलेल याविषयी विचार केला जात नाही. वेळ जाइल तसे प्रश्न ही बदलतात. पण ठरवून अस काही होत नाही. 

 

कधी कधी ठरवलेल तरी कुठे पुर्ण होतं. आयुष्याच्या वाटेवर अनेकदा अनोळखी भेटतातच ना मग सोबत फक्त आठवणींच का म्हणून जपायच्या, ते नाते आयुष्यभरही जपता येतच की. मैत्री अनेक नात्यांना अोळख देते. दादा ताई, काका काकु किंवा अजुन कोणतही टॅग खरतर वयातलं अंतर समजावत असतं. त्या नात्याच्या कापडाला झालर तर मैत्रीच्या स्वप्नांचीच ना शेवटी. पण मैत्री अनेकदा फक्त मैत्री राहत नाही. नवं नातं सगळे बंधन मिटवुन टाकतं. अनेकदा यामुळे दुरावा येतो, मैत्रीत कि नात्यात हाच प्रश्न आहे.

 

वेळ अनेक गोष्टीवर अौषध आहे. पण दुरावा हा एकमात्र उपाय असेल तेव्हा. बांधून ठेवल्यावर त्रास होत असेल, स्वप्न थांबत असतिल तर सोडून देनंच योग्य नाही का होणार. दुर राहून सुरेख आठवणी जपनं हे जवळ असुन दुखी असण्यापेक्षा बर नाही का?

 

त्याला थांबवनं म्हणजे जरी आयुष्याचा सोबती मिळवण्यासारखं असलं तरी त्याचं मन तर कायम त्या स्वप्नांच्या वाटेवरच रमनार. मग आपल्या वाटेला येतं एक उदास हतबल अपेक्षाभंगाची सल घेऊन जगनारं एका सोबत्याचं मन. अशा वेळी त्याला त्याच्या स्वप्नांसोबत एकटं सोडनं कधीही चांगलं. दुरावा अशा वेळी त्रास देत नाही. कारण दुर जाऊ दिल तरी ते परत आपल्याकडे येईल ही भाबडी आशा मन कधी सोडत नसतं.

 

आठवणी जेवढ्या जगता येईल तेवढ्या जगाव्यात. नवीन जमवाव्यात, पण सोबतीचा अट्टहास करु नये. कारण स्वप्नांना पंख आणि आठवणींना प्रेमळ झालर ही तिच व्यक्ती लावते, जी आपल्यावर जीव लावते. नाहीतर नात्यांचे टॅग आयुष्यातल्या वाटेवर भेटनार्‍या अनेक अनोळखींना भेटतातच कि. . .

 

"ना लगा जोर उसे रुकने कि बात पर

जाने दे उस पंछीको अन्जान राह पर

दुआ कर उसकी ख्वाहीश के लिये

दोबारा मिले तो गले लगाया कर।"

 

-Written by - S.👧 & 👦K.

 

 

सिया आणि कबीर खुश होते त्याच्या कामावर. आर्टिकलचा रिस्पॉन्स छान होता. आता तर न बोलता अनेक गोष्टी समजु लागल्या होत्या एकमेकांच्या. 

 

त्या संध्याकाळी कबीरसाठी एक पार्सल आलं. सियाला न दाखवताच तो बॉसलेडीच्या केबिन कडे गेला. खुप आनंदीत होता तो. बर्‍याच वेळ आतमध्ये होता. त्याचा आनंदातला आवाज, गाणे अॉफीसमध्ये घुमत होते. सियाला काहीच समजत नव्हत पण त्याला आनंदी पाहून ती खुप खुश होती. कबीर केबिन बाहेर आला तेव्हा नाचतच सगळ्यासोबत स्टेप्स करत होता. बॉसलेडीही आनंदात बाहेर आल्या होत्या पण काय झालयं हे कोणीच सांगत नव्हतं. 

 

फायनली कबीरने रात्री पार्टी आहे तेव्हा एक सप्राईज सांगेल असं जेव्हा डिक्लेअर केलं तेव्हा कुठे सगळ्यांनी विचारणं बंद केलं. सिया तरीही कबीरकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती. तिला चेअरवर बसवुन,

 

'डार्लिंग शाम को बताऊंगा'

म्हणत कबीर ते पार्सल घेऊन निघुन गेला.

 

संध्याकाळी सगळे पार्टिला पोहचले. सिया आज कबीरला मनातलं सांगुच अशा पावित्र्यात होती. तिची ह्रदयाची गति वाढली होती.

 

'खुप दिवस हि फिलिंग लपवली, आज कबीर खुप खुश आहे. त्याला मनातलं सांगुनच टाकावं'

सिया दिर्घ श्वास घेत मनात विचार करत होती. अखेर ती त्या स्वप्नमहालात अर्थात कबीरच्या घरी पोहचली. यावेळी कबीरच्या बोलवण्यावरुन. 

 

आतमध्ये गाणे सुरु होते. कोणी सुरबेसुर गात होतं. कोणाच्या गप्पा सुरु होत्या. ती एक कॅज्युअल पार्टी होती त्यामुळे सगळे अॉफीसच्याच ड्रेसमध्ये होते. सिया आत गेल्यावर कबीर सगळ्यांना अोलांडत तिच्याजवळ आला.

 

'वेलकम सिया, thank u so much for coming.'

तो अत्यानंदाने बोलत होता. कबीर आज सियाला त्याच्या मनातले भाव सांगेल अस काहींच्या मनात होतं, अगदि सियाच्याही.

 

'कबीर मला तुला काही. . .'

सियाला शब्द जुळवता येत नव्हते. कबीर तिला ऐकण्यासाठी उत्सुक होता.

 

'अटेन्शन. . .कबीर आता त्याची न्युज आपल्यासोबत शेअर करायला तयार आहे. सियाही आलीये. कमअॉन कबीर. . .'

सिया कबीरच्या संवादात बॉसलेडीच्या या अनाऊन्समेंट ने खंड पडला.

 

सियाच बोलणं ऐकणं सोडुन कबीर सियाला ओढतच सोफ्याजवळ घेऊन आला. समोरच्या टेबल वर चढुन तो सगळे शांत होण्याची वाट पाहू लागला. सिया कावरीबावरी होऊन सगळं पाहत होती. एका क्षणाला तिला वाटल कबीर गुडघ्यावर खाली बसून तिला प्रपोज करेल, पण नाही तो तिच्या नजरेपासूनही खुप उंच तिच्यापासून दुर उभा होता.

 

"इस भिडमें एक नजर बस तुम्हे देखे जा रही हैं

माना कि तुम हर नजरमें समाये हो इस समय

एक नजर देखो तो सही

एक बार नजर मिलाओ तो सही

कुछ केहना है तुमसे इन नजरोसे, पढ़ लो तो सही

इन लोगो कि भीडमें कहीं खो ना जाये हम-तुम

बात ना हो बस इशारें समझो तो सही।"

 

सिया कबीरला काहीतरी विचारण्याचा, सांगण्याचा प्रयत्न करत होती. एकदोनदा त्यांची नजरानजर झालीही पण तिचे भाव कबीर स्वतःच्या आनंदाचेच समजुन गेला.

 

'so.....friendsss....boss &....my cutest bestie....सिया...मी माझ्या पुढच्या एज्युकेशनसाठी ज्या USA च्या युनिव्हरसिटीमध्ये apply केलं होतं....तिथे माझं सिलेक्शन झालयं..........आणि मी पुढच्या महीन्यातच माझं स्वप्न पुर्ण करायला USA ला जातोय.........!!!'

 

कबीरच्या वाक्यामुळे त्या वातावरणात एक वेगळाच जल्लोश आला. सगळेजण कबीरला अभिनंदन देत होते. सियाच्या डोळ्यात मात्र पाणी तराळलं. पण ते न दाखवता तिने कबीरला congrats करत मिठी मारली. कबीरने ते पार्सल ज्यात त्याचं सिलेक्शन लेटर होतं ते सियाला दाखवलं. 

 

मनातले भाव सियाच्या शब्दात उतरलेच नाही. कदाचित कबीरला प्रेमाची कबूली देणं म्हणजे त्याला बंधनात बांधन्यासारख होतं म्हणून ति ही कबीरच्या आनंदात शामिल झाली. अफ्टरअॉल बांधून ठेवण्यापेक्षा अनेकदा सोडून देनं योग्य असतं.

 

दुसर्‍या दिवशीची सकाळ सियासाठी काहीशी उदास होती. खुप काही बोलावसं वाटत होतं पण ती गप्प होती. कबीर आला, तसाच सगळीकडे प्रफुल्लित वातावरण बनवून. सिया विचारातच होती, त्याने तिच्या खांद्याना धरुन तिला हलवलं, तशी सिया आधी डचकून मग एक स्मित देत कबीरकडे पाहू लागली.

 

'मी जाणार म्हणून आनंद नाही झाला वाटत एका व्यक्तीला.'

कबीर तिच्यासमोर चेअरवर बसत म्हणाला.

 

'नाही असं काही नाही. . .ते मी'

सिया स्वतःची बाजु मांडायच्या प्रयत्नात होती तसा कबीर मोठ्याने हसू लागला.

 

'आता आर्टिकलमध्ये पुन्हा ते स्वप्नाळू प्रेम येईल, वास्तविकता दाखवायला मी नसेल ना'

कबीर शांततेत बोलत होता.

 

'जाणं गरजेचं. . . .'

सिया तिचं बोलणं पुर्ण करणार त्या आधीच बॉसलेडीचा हात तिच्या खांद्यावर पडला.

 

'कबीर सिया my star writers, पुढचं आर्टिकल as a partner म्हणून तुमचं शेवटचं आर्टिकल असेल. so मला यावेळी काही तरी best पेक्षा best हवयं.'

 

बॉसलेडी वेगवेगळे हातवारे करुन स्वतःच मत सांगत होती. कबीर आत्मविश्वासाने हसत पाहत होता. सिया 'शेवटचं' याच काय त्या शब्दावर अडकली होती. काहीतरी सांगुन बॉसलेडी निघुन गेली. कबीरने चुटकी वाजवुन सियाला विचारातुन बाहेर आणलं. आणि दोघं आर्टिकलच्या कामाला लागली. As a partner म्हणून शेवटच्या.

 

चर्चा करता करता मध्येच सिया उठून निघून गेली. कदाचित मनाचे भाव सांभाळनं तिला कठीण जात असावं. कबीर जाणार् या सियाकडे पाहत होता. ती का गेली हे त्याला कुठेतरी समजत होतं. तो स्वतःशीच हसला.

 

~💗अबोल ती👧अव्यक्त मी👦💗

 

आज अनेक दिवसांनी ती मनातलं बोलणार होती. थोडं छळावं तिला म्हणून मी ही मजा घेत होतो. तिने वेळ घेतला होता स्वतःला समजावायला पण मी अनेकवेळा समजुनही हा भाव टाळत गेलो होतो. असं होतं ना अनेकवेळा, कळून नकळत्या वाटेवर आपण एकटेच चालत राहतो, मग तो एकांत, नाही तो एकलकोंडे पणा त्रास देऊ लागतो. अशा वेळी गरज लागते ती आधाराची, मैत्रीची अन् तिची.

 

दुरावा हा येणारच होता पण तो फार लवकर आला. व्यक्त होण्यासाठी तितकासा वेळ ही भेटला नाही. ति ही स्वतःला सावरण्यात गुंतली. पण नाही तिला हे कळायलाच हवं.

 

पहील्या नजरेच प्रेम खरचं खुप सुंदर भावना आहे. तिला पाहीलं तेव्हा त्या नजरेत एक अजाणतेपणाचे भाव होते, ती चमक नव्हती जी पाहायची आज वर सवय होती. कारण ती वेगळी होती, इतरांपेक्षा. मी पहिल्यांदा तिच्या नजरेतल्या समुद्रात हरवलो होतो,खोलवर सामावत चाललो होतो पण मी वास्तव ना, पुन्हा त्या वास्तविक जगात यायचंच होतं. पण इथेही ती होती सतत सोबत. कधी तिच्यासाठीची भावना इतकी द्दढ झाली मलाही कळल नाही.

 

तिला योग्य वाटेल का? या माझ्या स्वप्नात मी तिचा विचारच केला नव्हता कधी, म्हणून दुर केलं तिला. पण ती वेडी तरीही स्वतःतच गुंतली. तिच्या कडे अलगद अोढल्या जातोय हे समजायला वेळ गेला. पण जेव्हा जे कोडं उलगडलं तेव्हा इशाराही दिला. 

 

ती समजली असेल का? त्या नात्याच्या अबोल्याच्या शब्दांचं कोडं?

आज खुप दुर जातोय तिच्यापासून पण तिला भाव समजायला नको?

मी प्रेम करतोय तिच्यावर तिला कळायला नको? 

ती तर कायम स्वप्नातच रमली, पण तिच माझ वास्तविक स्वप्न आहे हे तिला उमगायला नको?

मी प्रेम करतो तिच्यावर हे व्यक्त करायचयं मला. 

ती फक्त माझी मैत्रिण नाहीये हे सांगायचयं मला. 

तुझे भाव माझ्याही मनातलेच आहे, 

हो एकदा व्यक्त तु मग स्वप्न आपलेच आहे!

 

Written by - K.👦&👧S.

 

कबीर आज निघणार होता. सगळ्यांनी गिफ्टस् आणि केकने त्याला निरोप दिला. सिया वरवर आनंदी दाखवत असली तरी मनातून ती दुखी होती. कबीर दुर जाणार यापेक्षा जास्त दुःख, तिने प्रेमाची कबुली दिली नाही याचं होतं.

 

एअरपोर्टवर शांत अबोला होता फक्त. कबीरने तिला लास्ट आर्टिकलचा ड्राफ्ट तिच्याकडे दिला आणि तो आत निघुन गेला. सिया भरलेल्या डोळ्याने पाठमोर्‍या कबीरला पाहत होती. पहील्या भेटीपासून आतापर्यंतचा प्रत्येक क्षण तिच्या डोळ्यापुढे तरळला. 

 

तो नजरेआड झाल्यावर तिने ड्राफ्ट उघडला. वाचतांना तिच्या डोळ्यात अश्रु होते पण यावेळी आनंदाचे. ति व्यक्त नाही झाली पण कबीरने तिच्यापुढे प्रेमाची कबुली दिली होती. त्याच मार्गाने, ज्या आर्टिकलच्या वाटेवर ते सोबत होते. तिने नजर फिरवुन त्या काचेआत पाहीले. काचेपलिकडे उभा असणारा कबीर तिला हसत पाहत होता. तिच्या डोळ्यातला आनंद पाहून त्याने त्याची उजवी मुठ ह्रदयावर दोनदा मारली. सियाने त्याला हसत बाय केलं.

 

तो भलेही काहीकाळासाठी दुर गेला होता पण दोघांचे मन आता एक होते. आणि ते कधी दुरावणार नव्हते. वास्तवात भलेही दोघांमध्ये अंतर होतं पण त्याच्या स्वप्नाच्या दुनियेत ते क्षणक्षण सोबत होते. 

 

कबीर उजवीकडे निघाला आणि सिया डावीकडे, रस्ते वेगळे असले तरी या दोघांची आयुष्याची सोबत आता ठरली होती. 

 

 

न बोलता आजवर उमगले अनेक कोडे

वाट पाहा दुर जातिल सगळे परत येतिल थोडे

का कायम लागला तुला शब्दांचा आधार

एकदा विचारायचे दिला असता सगळा संसार

 

दुर जातोय मान्य पण परत येण्यासाठी

वाट पाहशील ना माझी काही वेळापुरती

शब्दांनी जोडले शब्दांचे हे नाते तुझ्याशी

अर्धवट राहीले खरे पण पुर्ण होईल आपल्यासाठी

 

असेल अंतर असेल दुरावा खुप

नको हरवु देऊ या विरहात तुझे रुप

दिले असतिल अनेक त्रास, आठवणी तुला

पण विचार तुझाच असायचा माझ्या मना

 

काही वेळ दुर, पण असू सोबत जेव्हा

हवी तु कायम सोबत माझ्या तेव्हा

नकोय कोणता दुरावा ना अडचण कोणती

शब्द अपुरे असतिल तर नजर ची धार सोडती.

 

वाट पाहा थोडीशी

आता वेळ येईल भेटण्याची

मी येईल लवकरच परत

तु आणि मी आपण होण्यासाठी 

Bonus Part....!!!

~👧HUM👊💓👊TUM👦~

 

वक्त तो उसके हिसाब से गुजरता है

हम तो बस उसे काटने की कोशिशमें है

कितनी दुरी बढ़ गयी है अब

लौट आआे इक दफा़ 

बस लाैट आअो अब...!

 

सिया डायरीतल्या पानांवर असचं काही खरडत होती. गेले दोन आठवडे कबीरसोबत बोलनं झालं नव्हतं. ना तो फोन घेत होता ना मेसेज चा रिप्लाय. रडायचं नाही ठरवुनही सिया याकाळात अनेकदा रडली होती. कारण तिलाच ठाऊक. कबीरवर तिचा विश्वास होता तरीही त्याचं असं इग्नोर करनं तिला त्रासदायक होतं. कामात असेल म्हणत ती मन‍ाला समजवायची पण आता हे सगळं खुपच होत होतं.

 

कबीर त्याचं एज्युकेशन पुर्ण करण्यासाठी गेला होता, पण तरीही लिखानाच वेड काही कमी झालं नव्हतं. अनेकदा त्याचे मेसेज सियाला नविन लिहीन्यासाठी खुप काही सुचवायचे. त्यात प्रेमाची जाणिव, विरहाची हुरहुर आणि भेटण्याची अोढ सगळ्यांचा सुरेख मिलाप असायचा.  

 

मागे एकदा असाच सियाच्या मेल वर एक फाईल आली. तो एक कोड होता, कबीरने पाठवलेला.

 

🕰📌💌👐

🌧💧💭👐

🌜🌠😊👐

🚶👣💃👣

 

खुप विचारांती सियाने त्याला उत्तर पाठवलं. कबीरला आवडलंही.

 

घडी की सुई प्यार का पैगाम लायी है 

बारीशकी बुंदे खयाल लायी है

चाँद कि चाँदनी मुस्कान लायी है

अब बस चलते जाना है

चलते जाना है..

 

खरतर त्या कोडमध्ये काही विशेष अर्थ नसायचाच कधी, पण तरीही सिया त्याचं प्रेमळ शब्दांत रुपांतर करायचीच. कबीर कित्येकदा फक्त काही आकृत्या पाठवायचा आणि सिया त्याला शब्दरुप द्यायची. प्रेमाने प्रेमबंध लिहीले जात होते. दोघं दुर होते पण शब्दांनी सतत सोबत असायचे.

 

मात्र अचानक कबीरचे मेल, मेसेज सगळचं बंद झालं. दोन वर्षात अस कधीच झालं नव्हतं. 

 

'तो ठिक असेल ना'

असाच काय तो विचार सियाच्या मनात असायचा.

 

एके दिवशी सियाच्या नावावर एक फुलांचा बुके आला. एखाद्या वाचकाने पाठवला असेल म्हणून सिया काहीवेळासाठी थोडी आनंदली. थोड्याच वेळात तिच्या नावावर एक पार्सल ही आलं. एका खुप मोठ्या एरीयातल्या एका पॉश कॅफेच्या उद्घाटनासाठीच आमंत्रण होत ते. अशा एवढ्या मोठ्या कॅफेत जाण्याविषयीसुध्दा सियाने कधी विचार केला नव्हता, आणि अशा एका कॅफेच आमंत्रण. अॉफीसमध्ये तिच्या सगळ्या फ्रेंडस् ने तिला तो प्रोग्राम अटेंड कर म्हणून सुचवलं. सिया मात्र कबीरच्याच विचारात होती. थोडा ब्रेक मिळेल म्हणून बॉसलेडीने तिला जाऊन ये असाच सल्ला दिला. अॉफीसमध्ये मात्र हलक्या आवाजात काहीतरी कुजबुज चालू होती.

 

संध्याकाळी सिया त्या कॅफेत पोहचली. सगळीकडे फुलांचं इंटेरियर होतं. रंगिबेरंगी लाईटस् होत्या. प्रत्येक टेबलवर एक विंडचेन लटकत होती. प्रत्येक टेबलवर फुलाची आणि अरोमा कॅन्डेलस् ची सुंदर अशी सजावट केलेली होती. सगळे रंग पॅलेटमध्ये विखरतील इतके सुंदरपणे तिथल्या भिंतीवर उमठलेले होते. खुप सारे शब्द, कोटस् तिथे छोट्या छोट्या कार्डस् वर लिहून एक भिंत डेकोरेट केली होती. कोपर्‍यातला एक टेबल जो काहीतरी खास होता, तिथे सगळ्या वस्तू गुलाबी रंगात सजवलेल्या होत्या. खुपच प्रसन्न, प्रफुल्लित वातावरण होतं तिथे. सिया ते पाहून आपोआपच आनंदली. 

 

कॅफेत गर्दि होती. सगळे टेबल भरलेले होते. गर्दीच्या मागे एक स्टेज सारखी जागा होती. सगळे तिथेच लक्ष देऊन होते. स्टेजवरची व्यक्ती मात्र सियाला दिसत नव्हती. पण त्या व्यक्तीच्या हातातली डायरी सियाच्या थोडी नजरेत पडली. ती व्यक्ती डायरीतले पानं वाचतं होती.

 

कुछ खास जरुर है उन निगाहोमें...

यु हि नहीं हम उसमें खो से गये...!

कुछ तो प्यारभरी बात थी उस दिलमें...

यु हि नहीं हम वहाँ ठेहेरसे गयें...!

 

 

आज मुलाकात का वक्त जरुर है मेरे दोस्त...!

ना लब्ज होंगे वहाँ ना कोई शिकायत होगी...!

 

 

बस बातें होगी आँखोसे,

इकरार अभी बाकी है...!

वक्त थम सा जाये,

ये साजिश अभी बाकी है...!

 

'काही सांगा तिच्याबद्दल. . .'

गर्दीतून एक आवाज आला. तो वाचनारा व्यक्ती मात्र खळखळून हसला. त्या व्यक्तीचं हसू, त्याचा आवाज कुठेतरी सियाला बोलवत होता.

 

'अजुन वाट पाहतोय तिची...'

असच काहीसं उत्तर तिच्या कानावर पडलं. 

 

सिया मात्र आता त्या व्यक्तीला पाहण्यापासून रोखू शकत नव्हती. ती गर्दि पार करुन त्याच्या पर्यंत पोहचली. पांढरा प्लेन शर्ट, जिन्स आणि बारीक काड्यांचा चश्मा, व्यवस्थित बसवलेले केस, प्रसन्न हसरा चेहरा...... कबीर..... तिच्यासमोर त्या फिरत्या चेअरवर कबीर बसला होता.

 

तिला समोर पाहून तो जागेवरुन उठला, त्याचा श्वास सगळ्यांना ऐकू जाईल इतका वाढला होता. ती येईल हे त्याला माहीत होतं पण समोर आल्यावर काय बोलाव हे मात्र त्याला समजलं नाही. सिया त्याला एकटक फक्त पाहत होती. तिला कबीरवर रागवायचं होतं पण त्याला पाहून ती सगळचं विसरली. 

 

सगळे शांत झाले होते. तिने कबीरला मिठी मारली तसे बॉसलेडी आणि बाकी अॉफीस फ्रेंडस् ने जल्लोश केला. कबीर भारतात येऊन दोन आठवडे झाले होते. तो खुप आधीपासून या कॅफेच्या तयारीत होता. सियाला सरप्राईज द्यायचं म्हणून त्याने बोलणं बंद केल होतं. त्याचा प्लॅन अॉफीसमध्ये सगळ्यांना माहीत होता.

 

थोड्यावेळात कबीरने सियाला स्टेजवर त्या नेमप्लेट जवळ नेलं. कॅफेचं नाव अजुनही सस्पेन्स होतं. सिया कबीरने त्यावरचा पडदा दुर केला.

 

~👧HUM👊💓👊TUM👦~

 

सगळ्यांनी टाळ्या आणि आवाजांनी आनंद व्यक्त केला. कबीर सियाला घेऊन त्या स्पेशल पिंक टेबल जवळ घेऊन आला. कोणाचं आता लक्ष नाहीये हे पाहून सियाने त्याला मारायला सुरुवात केली.

 

'फार उस्ताद समजतो ना स्वतःला...... मेसेजचा रिप्लाय नाही.......सगळ्यांना प्लॅन सांगितला पण मला नाही.....'

कबीरला मारत सिया असचं काही बडबडत होती. कबीर हसत तिचा मार चुकवायचा प्रयत्न करत होता. तिचं मन भरल्यावर ती थ‍ांबली.

 

 

'माझं स्वागत अस होणार माहीत असत तर आलोच नसतो परत.'

कबीर दम खात म्हणाला तशी सिया अजुन चिडली.

 

तिच्यापासून सुरक्षित अंतर ठेऊन कबीर दोन्ही हाताने तिला थांब म्हणाला. परत तिच्या जवळ येऊन हळुच कानात बोलला.

 

'तस USA मुली पण खुप सुंदर आहेत तिथेच सेटल व्हावं वाटतयं'

सियाने रागात त्याचा कान पकडला. कबीर नाटकी अोरडला. तशी सिया हसायला लागली, आणि त्याला सोडलं. दोघही हसत त्या चेअरवर बसले. पहील्यांदा आणि खुप दिवसांनी समोरासमोर.

 

'खुप मिस केलं तुला.!'

सिया मान खाली घालत म्हणाली.

 

'मी नाही केलं.....'

कबीर तिला न्याहाळत म्हणाला. तिने चमकुन वर पाहीलं.

 

'तु फक्त अंतराने दुर होती, पण शब्दांने कायम सोबत असायचीस. कधी वाटलच नाही दुर आहे म्हणून. हुरहुर होती, तुला भेटायची अोढ होती मात्र ती त्रासदायक नक्कीच नव्हती. मी खुप आनंदी आहे'

कबीर मनापासून बोलत होता. सिया खुप खुश होती आता. दोघांनी खुप गप्पा केल्या. अनेक शब्द, भाव वाटून घेतले.

 

रात्री उशिरापर्यंत गप्पा सुरु होत्या. जुने मित्र, बॉसलेडी, सिया कबीर सगळे नाचले. हळूहळू सगळेजण घरी निघाले. सिया कबीर कॅफेबाहेर सगळ्यांना बाय करत होते. आता कॅफेच्या डोअरवर सियाकबीर दोघंच राहीले होते.

 

'you know what सिया, तिकडे मला तुझ्या आर्टिकलने खुप मदत केली.!'

कबीर सियाकडे पाहत म्हणाला.

 

'कशाची मदत??'

सिया विचार करत म्हणाली.

 

'रात्री झोप नाही आली तर तुझे आर्टिकल्स वाचायचो.!!!'

कबीर स्वतःच हसू रोखत म्हणाला.

 

'अच्छा म्हनजे मी बोअर लिहीते.....'

सिया हाताची घडी घालत म्हणाली.

 

'नाही पण..... हो अॅक्चुली......'

कबीर तिला चिडवत म्हणाला.

 

'ठिक आहे लिखान बंद'

सिया तोंड फुगवत म्हणाली.

 

'अरे मी असं कुठे म्हणालो?'

कबीर अजुनही हसत होता.

 

'माग मला परत काही शब्द.......'

सिया कबीरला त्रास देत म्हणाली.

 

'ही चिटींग आहे.....'

कबीर थोडा वरमला.

 

'हा हा हा'

सिया त्याला अजुनही परेशान करत होती.

 

सिया कबीरचे वाद अजुनही सुरु होते. कॅफेतल्या, आसपासच्या लाईटस् हळूहळू बंद होऊ लागल्या. कॅफेचं नाव तेवढं प्रकाशमय होतं.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama