Priya Jawane

Abstract Romance Fantasy

3  

Priya Jawane

Abstract Romance Fantasy

तो आणि ती - "नवी पाऊलवाट...!"

तो आणि ती - "नवी पाऊलवाट...!"

5 mins
274


नीले नीले अम्बर पर, चाँद जब आये

प्यार बरसाए, हमको तरसाए

ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो

प्यास दिल की बुझा जाए


ऊँचे-ऊँचे परबत जब चूमते हैं अम्बर को

प्यासा-प्यासा अम्बर जब चूमता है सागर को

प्यार से कसने को, बाहों में बसने को

दिल मेरा ललचाये, कोई तो आ जाए

ऐसा कोई साथी हो...


ठण्डे ठण्डे झोंके, जब बालों को सहलाएं

तपती-तपती किरणें, जब गालों को छू जायें

साँसों की गर्मी को, हाथों की नरमी को

मेरा मन तरसाए, कोई तो छू जाये

ऐसा कोई साथी हो...


छम-छम करता सावन बूंदों के बान चलाये

सतरंगी बरसातों में जब तनमन भीगा जाए

प्यार में नहाने को, डूब ही जाने को

दिल मेरा तड़पाये, ख्वाब जगा जाए

ऐसा कोई साथी हो...


किचनमध्ये काहीतरी खुटपुट चालू होती. सकाळपासून पाचव्यांदा अर्जुनच्या तोंडून हे गाणं ऐकत होते. चार वर्षाची आर्या तिच्या पप्पाच्या तोंडून हे गाणं सतत ऐकुन आता वैतागली होती. करत असलेली ड्रॉइंग थ‍ांबवुन ती माझ्याकडे केविनवानं होऊन पाहत होती. मी आरवला, जो पुढच्याच महीन्यात दोन वर्षाचा होणार होता, त्याला आर्याजवळ सोडुन किचनमध्ये गेले.


अर्जुन अजुनही ते गाणं गुणगुणत होता.


'काय चाल्लय तुझं? काय हा बालिशपणा?'

मी वैतागुन त्याल‍ा विचारलं.


'लग्न झाल्यापासून आपण एकमेकांसारखे झालोत नाही?'

तो माझ्याकडे पाहत, हातान ट्रे घेत तसचं पुर्वीसारख लाघवी हसत बोलला. मी पुढे होऊन त्याच्याहातुन ट्रे घेतला.


'कधी कधी वाटत या घरात दोन नाही तीन बाळं ‍आहेत.'

मी ट्रे टिपॉयवर ठेवत म्हणाले.


'मला ही आधी असचं व‍ाटायचं!!'


अर्जुन आरवचं बेबीफुड घेऊन आला. मी आर्याला दुध दिलं. अर्जुनचा ज्युस त्याच्याजवळ पण आरवपासून दुर ठेवला, आणि सोफ्यावर पाय वर घेऊन बसले. अर्जुन ते पाहून गालातच हसला.


मागच्या चार वर्षात विशेष काही बदललं नाही, अर्जुन सोडला तर. तो पुर्वीसारखा धीरगंभीर राहत नव्हता. आनंदी असायचा, त्याला समाधानी पाहून सगळं मिळवल्याच‍ा आनंद मला होता. सुरुवातीला आर्या मग आरव, यांच बालपण जगतांना अर्जुन स्वतःत रमायचा. पण अजुनही आमच्या नात्याची नवलाई त्याने जपली होती. तो आजही माझ्यासाठी पुर्वीचाच अर्जुन होता. 


मी विचारात गुंग असतांना त्याने आरवला झोपी लावले. आर्याही झोपी गेली, माझ्या मांडीवर डोकं ठेऊन, अगदी पहिल्यांदा झोपली होती तशीच. मी तिच्या डोक्यावर हात ठेऊन कितीतरी वेळ विचारात होते. थोड्यावेळाने अर्जुनने तिला रुममध्ये नेऊन झोपवलं. आणि तो माझ्यासमोर खाली जमिनीवर बसला.


'काय आहे मनात?' 

बर्‍याच वेळानंतर त्याने विचारलं.


'स्वप्नवत आहे सगळं...!!'

मी धुंदितच उत्तर दिलं. त्याने माझे दोन्ही हात हातात घेतले.


'HAPPY ANNIVERSARY MY LOVE....!'

मी घड्याळात पाहीलं, १२ वाजले होते. 


आज च‍ार वर्ष झाले अ‍ामच्या लग्नाला. मी लाजत डोळे खाली केले. तो अजुनही स्मित करत होता. थोड्यावेळात त्याने डोकं माझ्या मांडीवर ठेवलं. जुन्या गोष्टी आठवत, बोलत, कधी हसू कधी पाणी यातच मला झोप केव्हा लागली समजल नाही. मी तशीच सोफ्यावर झोपले होते. 


सकाळी जाग आली तेव्हा माझ्या रुममध्ये होते. शेजारीच आरव आणि आर्या झोपलेले होते, अर्जुन मात्र रुममध्ये नव्हता.


मी बाहेर गेले, सोफ्यावर पिलो जवळ घेऊन अर्जुन शांत झोपलेला होता. मी बेडवर कशी गेले ते कळालं होतं आता.


(खरचं या घरात दोन नाही तीन बाळं आहेत. कधी कधी बालिशपणा करणारा अर्जुन त्याचा मुळचा समजुतदार आणि जबाबदार स्वभाव सोडणारा नव्हता. तो असा आहे म्हणूनच मी हवं तस वागायला स्वतंत्र होते. त्याला त्याची पिऊ जशी हवीये तशीच ठेवायला खरतर तोच जबाबदार होता.)


मी विचार करतच त्याच्याजवळ बसले. थोड्यावेळात उठून कामाला लागले. कपाटातून आज मुद्दामहून त्याची आवडती आकाशी रंगाची साडी नेसले होते. काल दिवसभराच ते 'नीले नीले अंबरपर' गाणं याचाच संकेत होता.


थोड्यावेळात अर्जुनही तयार झाला. आम्ही आश्रमात निघालो, काही सामान पोहचवायचं होतं. आर्या आणि आरवला अर्जुनने आश्रमातच वृंदाजवळ सोडायला सांगितलं, कुठेतरी जायचयं एवढचं काय ते उत्तर दिलं.


आरव आणि आर्याला आश्रमात आवडायचं. त्यांनाही आपल्या लोकांची, साध्या जीवणाची सवय असावी असा काहीसा अर्जुनचा आग्रह. अस असलं तरी आश्रमात त्यांचे विशेष लाड पुरवले जायचेच. प्रेमळ माणसं होती तिथे सगळी, म्हणून मी ही निश्चिंत होते.


गाडी अर्जुन चालवत होता. मला ते पुर्वीचे दिवस आठवले जेव्हा आम्ही या भागात यायचो. त्याने गाडी एका गावात घेतली, थोडं अंतर पार केल्यावर त्याने एका झाडाखाली गाडी लावली. स्वतः उतरुन माझा दरवाजा उघडला. मी खाली उतरले, उजाड माळरान होतं ते. तो माझ्यापासून दुर त्य‍ा मोकळ्या गवताळ भागात पाहत होता. खुप वेळ काहीच बोलत नव्हता. त्याचा धीरगंभीर शांत चेहरा मी पाहत होते. काहीतरी चलबिचल मनात चालु होती हे नक्की.


सोहम,


अखेर त्याने बोलायला सुरुवात केली. 


या गावात शाळा नाही. इथुन पुढे पाच किलोमिटरचे अंतर पार करावे लागते. एक छोटी दरी आणि अोसाड जंगलाचा काही भाग मागे सोडावा लागतो.


सोहम नेहमीप्रमाणे शाळेत निघाला. थोडा उशीर झाल्याने सोबतचे मित्र पुढे निघुन गेले होते. अरुंद रस्ता, निसरडी वाट यांमुळे पाय घसरुन त्या दरीत पडला. 


मदतीला कोणी नव्हतं, पाच दिवसांनी त्याला शोध घेऊन बाहेर काढण्यात आलं. पडल्यानंतर दोन दिवसांपर्यंत त्याचा आवाज इथल्या अशिक्षित लोकांनी भुतखेताचा प्रकार म्हणून घाबरुन दुर्लक्षित केला. अखेर तो शांत झाला. पोलिस, शोधपथक हे ही काम फत्ते करेपर्यंत खुपच उशीर झाला होता.


त्याने एक हताश श्वास घेतला. आणि पुढे बोलु लागला, मी सुन्न होऊन फक्त ऐकत होते.


'यासगळ्यात चुक म्हणावी अशी कोणाची नव्हती. अशिक्षितपणा ही चुक नाहीये, पण चुकीची विचारधारा, गैरसोय हे यामागचं कारण आहे, आणि याचा उगम या अशिक्षिततेमुळे होतो. म्हणून या गावात या जागी मी एक शाळा उभारतोय. त्या सगळ्यांसाठी ज्यांना शिक्षणाची गरज आहे'


तो पुन्हा शांत झाला. मी त्याच्याजवळ जाऊन त्याचा हात हातात घेतला. तो पुढे बोलू लागला, शब्द जुळवायला खुप वेळ घेत होता तो,


'त्यासाठी मला कायमच.....'


'इथे राहावं लागेल...!'

त्याचं वाक्य मी पुर्ण केलं. त्याने माझ्याकडे पाहीलं, त्याच्या डोळ्यातले भाव मला आता अोळखीचे होते.


'आपल्याला...!'

मी त्याच्या डोळ्यात पाहत आत्मविश्वासाने बोलले.


त्याच्या डोळ्यात पाणी आणि अोठांवर हसू होतं. आम्ही तसेच हातात हात घेऊन उभे होतो. समोर सुर्य मावळतीला जात होता आणि आम्ही आयुष्याच्या या च मावळतीपर्यंत सोबत राहणार होतो. आमची नवी पाऊलवाट आता ठरली होती. पण ती कशीही कितीही खडतर असली तरी तिथे आमचं प्रेम होतं, आम्ही होतो, सोबत हातात हात घेऊन.


"रान हे उठले उठले मुक्त आभाळ झाले

तिच्या नुसत्या चाहुलीन भ्रमर गुंगुनी हे गेले...


रान आकाश आकाश भव्य फुलोरा त्याचा

मन सोनुलं सोनुलं वारा विसावे हा आता

सई जाऊ त्या पल्याड पाय वाटा ओलांडून

सूर्यास्त हा गोजिरा गेली सखी मोहरून...


जाऊ चालत जाऊ निशब्द याच देखण्या वाटेवरुनी

ये मनोहर छान सुगंध वाटेवरल्या फुला फुलातुनी

जीवनातूनी येई बहर असा, जीवनातूनी अशी लहर फुले

बंध हे रेशमी ऐसे किती दिस दिसांचे

कुणी तोडता तुटेना तुझ्यानी माझ्या संगतीचे


रान हे उठले उठले मुक्त आभाळ झाले

तिच्या नुसत्या चाहुलीन भ्रमर गुंगुनी हे गेले

सई जाऊ त्या पल्याड पायवाटा ओलांडून

सूर्यास्त हा गोजिरा सखी गेली मोहरून...!"


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract