Priya Jawane

Abstract Romance Fantasy

3  

Priya Jawane

Abstract Romance Fantasy

तो आणि ती - "भेट...!"

तो आणि ती - "भेट...!"

6 mins
284


रात्रीच त्याचा मेसेज आला होता, 'सकाळी तयार राहा, एका ठिकाणी जायचयं' मी रात्रीपासूनच तयारीत होते. त्याने दिलेली मोरपंखी रंगाची साडी, बांगड्या पुर्णतः मिसेस अर्जुन च्या लुक मध्ये तयार होण्यासाठी. सकाळी नऊ वासता आवरुन तयार होते, तो मात्र आला नाही. 


'घरी येऊ शकतेस? इथूनच जाऊ.' असा विनंतीवजा मेसेज आला फक्त. मी लगेच त्याच्या घराकडे निघाले. खरतर साडीत गाडी चालवणं मला थोड अवघड होत पण त्याची पिऊ त्याला हवी तशीच दिसायला आणि वाटायला हवी होती. म्हणून आज मुद्दामहून साडी नेसली होती. त्याच्या घराचा दरवाजा उघडाच होता. Brezza अाधीच बाहेर काढून ठेवली होती, म्हणजे स्वारी तयारीतच होती. गाडीत अनेक आैषधे, खाण्यापिण्याच्या आणि रोजच्या गरजेच्या वस्तूचे बॉक्स होते. आम्ही पुन्हा एखाद्या संस्थेत किंवा आश्रमात जाणार होतो.


माझे पैंजण वाजत होते. तरीही तो बाहेर आला नाही.घरामधून हसण्याचे बोलण्याचे आवाज येत होते. मी हळुवार आत गेले. सोफ्यावर एक वयस्कर जोडपं बसलेलं होतं. त्या काकांच्या चेहरा अत्यंत हसमुख आणि एनर्जी तरुणांना लाजवेल अशी होती. त्याच्या शेजारीच काकी होत्या मंद स्मित होतं त्यांच्या चेहर्‍यावर आणि डोळ्याला काळा चश्मा . समोरच्या टेबलवरचे खुप सारे फुलं आणि मोगरा-अबोलीचा गजरा हे सांगायला पुरेसा होता की ते जवळकर काका आणि राधा काकी होत्या. 


त्यांनी हसून माझं स्वागत केलं. मी पुढे होऊन त्यांना नमस्कार केला. त्यांनी अनेक फुलं आणि काही पैसे दिले मी नको म्हणत असतांनाही. हा मोठ्याचा आशिर्वाद असतो म्हणून काकुंनी ते पुन्हा माझ्या हातात दिले. ते मलाच भेटायला थांबले होते.मी चहाबद्दल विचारलं तर काका,


'आता नेहमीच सोबत चहा होईल' म्हणत हसत काकींचा हात पकडून निघाले. मी त्याच्या प्रेमाला मनापासून सलाम केला. अर्जुन मात्र मी आत आल्यापासून किंवा त्याआधीच डोळे मिटून शांत बसला होता. जवळकर काकांनी जातांना अर्जुनच्या खांद्यावर थोपटलं, तो हलकेच हसला. काका-काकी गेल्यावर मी पुन्हा अर्जुन समोर उभी राहीले, तो अजूनही ध्यानस्थ होता. 

(मला राग येत होता आज एवढी साडी नेसले याच्यासाठी आणि याने एक नजर पाहीलंही नाही. पण नाही, तो ऐकत होता माझ्या बांगड्यांची किनकिन, पैजनांचा आवाज.)


मी सोफ्यावर बसले. हळुवार आवाज न करता बांगड्या आणि पैंजण काढून सोफ्यावर ठेवले, हलक्या पावलाने त्याच्या मागे जाऊन उभी राहिले. आवाज बंद झाल्याने त्याने डोळे उघडले. मी मागे उभी आहे कळताच झटकन मागे वळाला, स्तब्ध. त्याच्या डोळ्यातले भाव मला उमगत नव्हते. तो एकटक पाहत होता. मी मात्र लाजून मान खाली घेतली.


"ये मौसम खुश सा मालुम होता है,

आज कुछ खास जरुर है।

अरे ये क्या,

आज तो आप आये है. . . 

हमारे ख्वाबों से निकल, 

इन निगाहों में बसने।"


काही क्षणानंतर हे बोल त्याच्या अोठी निघाले. मी हसून पुन्हा सोफ्यावर बसले.


'पैंजण का काढले? परत घालून घे.' 

त्याचा आदेशयुक्त स्वर आला.


मी पाय समोर टीपॉयवर ठेऊन साडी नीट करून इकडेतिकडे उगचच पाहू लागले. तो मान खाली घालून लाघवी हसला. त्याने पैंजण माझ्या पायात घातले. बांगड्या मात्र मी स्वतःच घालून घेतल्या. आम्ही निघनार होतो. दरवाजापर्यंत आल्यावर तो अचानक परत मागे गेला. परत आला तेव्हा त्याच्या हातात गजरा होता. मी त्याच्याकडे पाठ करून उभी राहीले.


'मला नाही येणार.' - तो


'वरती पिनमध्ये निसटणार नाही असा पॅक कर. पुढे मी काळजी घेईल.' मी हसून उत्तर दिल. त्याने हसतच व्यवस्थित गजरा लावला. कधीच निघणार नाही असा, आणि आम्ही रवाना झालो. शहरातून बाहेर पडेपर्यंत कोणीच कोणाशी बोललं नाही. गर्दी आणि ट्रॅफिकमुळे त्याच पुर्ण लक्ष ड्राइविंगवर होत. थोड्या मोकळ्या रस्त्याला लागल्यावर त्याने एकदा नजर माझ्याकडे फिरवली. 


'मग, आज नाहीत काही प्रश्न? कुठे जातोय? का जातोय?' त्याने विचारले.


'नाहीत. . .' मी दिर्घ श्वास घेत उत्तर दिलं. तो मान खाली घालत हसला.


पुढे प्रवासात फक्त शांतता होती. मी बोलत नव्हते पण कोणत्या दबावामुळे नाही तर तो क्षण मला साठवून ठेवायचा होता म्हणून. त्यालाही ते कळले होते म्हणून तो ही शांत होता, अधूनमधून माझ्याकडे अोझरती नजर टाकायचा.तासाभराने त्याने गाडीत गाणे लावले. माझ्या आवडत्या कलेक्शन मधून अलका याग्निक याचं.


तुम आये तो आया मुझे याद

गली में आज चाँद निकला

जाने कितने दिनों के बाद

गली में आज चाँद निकला

गली में आज...


ये नैना बिन काजल तरसे

बारह महीने बादल बरसे

सुनी रब ने मेरी फ़रियाद

गली में आज...


आज की रात जो मैं सो जाती

खुलती आँख सुबह हो जाती

मैं तो हो जाती बस बरबाद

गली में आज...


गाणं संपेपर्यंत आम्ही आमच्या ठिकाणापर्यंत पोहचलो होतो, साधारण दोन तासाचा प्रवास होता हा. तो एक आश्रम होता. अनेक स्त्रीया, लहान मोठे मुलं-मुली कोणत्याश्या घाईत आणि कामात होते. बाहेर तोरणं होती. दारात रांगोळी होती. आम्ही पोहचलो तसे अनेक बायका, काही आजी-आजोबा मुली पळत अर्जुन कडे गेल्या. काही जणी माझी आपुलकीने विचारपुस करत होत्या.


अर्जुन आणि मला मात्र त्या गेटच्या आत प्रवेश दिला नाही. थोड्याच वेळात एक स्त्री हातात पुजेच ताट, भाकरीचा तुकडा आणि पाण्याचा तांब्या घेऊन आली. अर्जुन त्या स्त्रीच्या पाया पडला, लगोलग मी ही. तिच्याकडे पाहूनच समजलं ती वृंदा होती. वृंदाने मला आणि अर्जुनला ओवाळलं आमची नजर काढली. मी आणि अर्जुन आत गेलो.


तो एक मोठा आश्रम होता. खूप बागा होत्या तिथे. अनेक निराधार लोक, स्त्रीया, अनाथ मुलं मुली तिथे राहत होते. मला वृंदा जवळ सोडून अर्जुन कुठेतरी निघून गेला. वृंदा ने मला पुर्ण आश्रम, तिथलं काम दाखवलं. अनेक आैषधी वनस्पतींच उत्पन्न त्या आश्रमाच्या जागेत होत होतं. कधी न ऐकलेल्या, भावस्मृतीत गेलेल्या अनेक वनस्पतींची रोप होती तिथे. सोबतच साड्यावर कलाकुसर, हस्तकला, टोपल्या, गोधड्या अनेक वस्तुंच काम चालायचं तिथे. अगदी त्या सगळ्या वस्तुंना विदेशातही मागनी होती. आणि ते सगळ काम अर्जुन पाहायचा, त्याच्या स्वतःच्या कंपनीतर्फे.


त्या आश्रमात आम्ही येनार म्हणून एवढी तयारी चालली होती. थाेड्याच वेळात एक आैपचारीक कार्यक्रम झाला. अर्जुनला ते सगळं नको होतं. पण आश्रमातल्या लोकांच्या हट्टामुळे त्याला नमतं घ्यावचं लागलं. सगळ्यांनी सोबत जेवण घेतलं. मी सगळ्यांसोबत असतांनाही अर्जुनची नजर कायम माझ्यावर असायची. मध्येच तो कोठेतरी गायब व्हायचा.


काही वेळाने तो मला एका मुलीसोबत हसत बोलतांना दिसला. तीच मनमोकळं हसू त्या सगळ्या वातावरनाच्या चैतन्याला लाजवत होतं, ती मिरा होती. आरसा जरी तिचा विद्रुप असेल पण तिच मन इंद्रधनुष्याइतकं सुंदर होतं. मला भेटल्यावर खुप मनमोकळेपणाने बोलली. तिच्याविषयी असणारा आदर आता अजुन वाढला होता.


काही वेळाने वृंदा एका खुपच लहान बाळाला घेऊन माझ्याकडे आल्या. ती एक महिन्याची चिमुरडी होती. काही दिवसांपुर्वी कोणीतरी आश्रमाच्या गेटवर सोडली होती. गोड, निरागस आर्या. . .


आर्या हे नाव अर्जुन ने तिला दिलं होतं. मी अल्लद तिला घेतलं. मी आर्याला घेतलेलं पाहून अर्जुन माझ्याजवळ आला. तो तिच्यासोबत खुपच प्रेमाने खेळत होता. वृंदा तिथून हसत निघून गेल्या. मागील काही दिवसात अर्जुनच इथे येणं का वाढलं होतं ते समजलं होतं मला, तो कार्यक्रमातूनही मध्येच कोठे गायब होत होता तेही. 


आर्यासोबत खेळतांना त्याला मी पहिल्यांदा पाहत होते. तो शांत संयमी अर्जुन नव्हता तो; प्रेमळ, ममत्वाने भरलेला मायाळू अर्जुन होता तो. आर्या माझ्या हातात होती मात्र तिच्या नाजुक मुठीत अर्जुनच बोट होतं. 


त्याच्या मनात भाव कदाचित मला समजत होते. मागील अनेक दिवसांपासून मी विचार करत होते अर्जुनला आमच्या लग्नानिमित्त काय गिप्ट देऊ, पण मला आता माझं उत्तर भेटलं होतं.


'अर्जुन. . .' मी थंड श्वास घेत त्याला आवाज दिला.


'हम्म. . . .' त्याने आर्यासोबत खेळतांनाच मला हुकांर दिला. आजुबाजुचे सगळे आवाज आमच्यासाठी बंद झाले होते. 


'लग्नानंतर आपण आर्याला दत्तक घेऊया??' 


त्याने झटकन माझ्याकडे पाहिलं. माझे डोळे शांत होते, त्याचे मात्र वाहत होते. ते पाणी आर्याच्या मुठीवर पडलं. त्याने पुन्हा त्याचे ओठ माझ्या माथ्यावर टेकले नंतर आर्याच्या डोक्यावर. आर्या आता माझ्या कुशीत शांत झोपली होती. नंतर मी तिच्या पाळण्याजवळ किती वेळ बसले होते आठवत नाही. अर्जुन खुप मुश्किलीने मला तिथून घेऊन निघाला. आता ओढ अजुनच वाढली होती. स्वप्नवत होतं सगळं. परतीच्या प्रवासात कोणीही काही बोलल नाही. पण मनातले स्पंदनं दोघांचे सारखेच होते. आज ना कोणती व्यक्ती होती ना गोष्ट, आज फक्त आम्ही होतो आणि आमचा आयुष्याचा प्रवास.


नयी सुबह साथ है और तू पास है।

इस दिल को अब क्या खौफ है।

बस चले चल इस रास्ते पे हमसफर,

तू बस आँखे मुंद, तेरी सुबह की रोशनी हम है।


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract