Madhuri Sharma

Drama Others

2.6  

Madhuri Sharma

Drama Others

खरी श्रीमंती

खरी श्रीमंती

2 mins
199


आई लवकर डब्बा दे शाळेला जायला उशीर होत आहे......

हो हो आले आले......

मिताली आज लवकर ये घरी....

का गं आई?

अगं, ते तुझ्या आबांना बाहेरगावी जायचं आहे ना, ते निघण्याच्या आधी तू त्यांना घरी हवी आहेस..

आई अगं, शाळेत आज कार्यक्रम आहे ना कशी लवकर येणार मी?

मग तू आज जाऊ नकोस...

तुला माहीत आहे ना आबांचा स्वभाव!

आई, मी नाही गेले तर सुत्रसंचालन कोण करणार?

आणि अशा आयत्या वेळी मी नाही गेले तर सर आणि मॅडम लय बोलतील मला..

आई अगं प्रमुख पाहुणे म्हणून मोठी माणसं येणार आहेत, मी नाही गेले तर किती नाचक्की होईल बघ ....

आज मला जाऊ दे, या पूढे मी असं कुठल्याही कार्यक्रमात, स्पर्धेत सहभागी होणार नाही...

मिते, तुझं सर्व खरं आहे पण मग हे तुच सांग आबांना..

आई अगं असं काय करतेस?

जाऊ दे नाही जात मग आज....

होऊ दे काय व्हायचे ते....

असं म्हणून मी रडतच घरी बसून गेले....

आणि ठरवले इथून पुढे कुठल्याही स्पर्धेत किंवा कार्यक्रमात सहभागी व्हायचे नाही....

मी फार हट्टी होते त्यामुळे मी जे ठरवलं ते पूर्ण केलं.....

दहावी पूर्ण होईपर्यंत शाळेतल्या कुठल्याही स्पर्धेत सहभागी झाले नाही....

शाळा संपली.....

आणि माझ्यातली मी ही त्याचबरोबर संपली.....

त्यानंतर आबांनी पूढे शिक्षण घेऊ दिलं नाही....

मी आबांना तर काही म्हणाले नाही पण आतल्या आत फार रडले......

त्यानंतर एका महिन्यात माझं लग्न करण्यात आलं...

वयाच्या पंधराव्या वर्षी माझं लग्न झालं होतं...

मन मारून जगायला मी कधीच सुरुवात केली होती.....

लग्न झालं...

सासरी जसं होतं ते सर्व मी स्विकार करत गेले .....

माझा चांगूलपणा माझ्या नवऱ्याला आवडला ...

हळूहळू आम्ही चांगले मित्र झालो..

माझी शिकण्याची आवड लक्षात घेऊन त्यांनी मला पुढं शिकवण्याचं ठरवलं ...


आणि आज माझी स्वतःची एक शाळा आहे.....

मी मुख्यध्यापिका म्हणून तिथे कार्यरत आहे....

शाळा सुरू करण्यासाठी मला माझ्या घरच्यांनी फार मदत केली....

सासरच्यांनी प्रत्येक वेळी माझी साथ दिली....

मी माझ्या शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्यांला ओळखते....

त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करते....

मला जी संधी लग्नानंतर माझ्या नवऱ्याने दिली त्यांचं मी सोनं केलं...

तिच नैतिक जबाबदारी स्वीकारून मी 

आमच्या शाळेत नवनवीन उपक्रम राबवत आहे....

आपल्या मेहनतीच्या जोरावर माझे विद्यार्थी फार यशस्वी होवो हेच प्रत्येक शिक्षकाला वाटत असते...

त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही कार्यरत आहोत....

दररोज शाळेत मी त्यांना बघून प्रेरित होते ...

किती उत्साह असतो त्यांच्यांत रोज नवीन शिकण्यासाठी...

मी अजूनही माझं शिक्षण चालू ठेवलं आहे ते त्यांच्या मुळेच....

मी, माझे विद्यार्थी आणि माझ्या शाळेतील सहकर्मी एक खुप उत्तम कामगिरी करत आहोत हीच आमची खरी श्रीमंती आहे......



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama