Madhuri Sharma

Horror

3  

Madhuri Sharma

Horror

ती रात्र

ती रात्र

3 mins
224


दिवस उजडतो तसा तो मावळतो ही आणि मग होते ती रात्र..

सामान्यतः संध्याकाळी सात नंतर मी घराबाहेर जात नसे पण त्यादिवशी काव्या माझी मैत्रीण हिने हट्टच धरला बाहेर फिरायला जायचा मी तरी तिला नाहीच म्हणाले पण ऐकेल ती काव्या कसली..

पट्कन आवरून आम्ही दोघी घराबाहेर पडलो. असचं बोलता-बोलता काव्या मला म्हणाली कामिनी तुझा भूतांप्रेतांवर विश्वास आहे का?

मग मी तिला म्हणाले नाही अगं माझं काही या गोष्टीवर विश्वास नाही पण मला हा विषय निघाला की खुपच भीती वाटते. मी सहसा भूतांचे ते हाँरर सिनेमे बघत सुध्दा नाही.

किती भित्री भागुबाई आहेस गं तू...

असू दे, कशीही असली तरी तुला काय?

अगं बाई राग आला का तुला? मी सहज तुझी चेष्टा केली गं

काव्या तुला नाही का वाटत भीती

मला,जो स्वतः भूत असेल त्याला कोणाची भीती?

म्हणजे....

तू...

गप्प गं वेडाबाई आपलं सहज म्हटलं मी...

बापरे, एका क्षणासाठी घाबरलेच होते मी काव्या...

हो ना म्हणुनच मुद्दाम बोलले मी...

हो का?

बस झालं मला नाही अजून फिरायचं चल आपण घरी जाऊया..

अगं असं काय करते इतक्या लवकर जायचं का घरी चल ना अजून थोडं पूढे पर्यंत त्या जून्या बगिच्यापर्यंत जाऊ मग घरी जाऊ...

नाही हं काव्या त्या बगिच्याकडे तर मी मूळीच जाणार नाही.

का गं कामिनी? काय झालं

काय झालं म्हणजे तु नाही ऐकलं का कधी?

काय?

अगं असं म्हणतात रात्रीचं त्या बगिच्याकडे गेलं की तो माणुस जीवंत परत येत नाही. तिथे रात्रीची एक चेटकीन असते म्हणे....

काहीहं हे आता जरा अतीच झालं...

हो का मग एक काम कर तू एकटीच जाऊन दाखव ना तिथे..

बघ हं कामिनी उगाच मला चँलेंज करु नको मी खरंच जाऊन दाखवेल तुला...

असं का त्या गेटपर्यंत फक्त जाऊन दाखव आतमध्ये नाही.

बरं तु थांब इथे मी येते जाऊन

काव्या बघं हं मला तर खुप भीती वाटतेय गं...

काही नाही होत गं थांब तू मी लगेच आली...

काव्या हळूहळू पुढे चालत गेली..

पण हे काय...

कुठे गेली ही...

माझी नजर दोन मिनटं काय दुसरीकडे झाली ही गायबच झाली...

दोन-चार मिनटं त्या बगिच्या च्या दाराकडे बघितल्यावर जेव्हा कामिनीला काव्या कुठेच दिसली नाही तर ती खुप घाबरली आणि जोरात ओरडली काव्या आणि ती तिथेच चक्कर येऊन पडली....

     कामिनी...

हं... हं...

काव्या....

काव्या अगं तु बरी आहेस ना....

बरी....

हा हा हा

जोरजोरात हासत काव्या म्हणाली...

अगं काव्या अशी काय विचित्र हासतेस बरी आहे ना ये माझ्याजवळ बस...

कामिनी मी आता ती काव्या राहीलेली नाहीए...

म्हणजे?,

मी ....

मी आता एक भूत आहे...

चल काहीहं बडबड करू नकोस मला भीती वाटते भुताची म्हणून तु असं बोलतेय ना...

कामिनी तिचा हात पकडायला गेली पण हे काय काव्या चा हाताला धरूनही तिला स्पर्श जाणवलं नाही...

कामिनीला घाम सुटायला लागला ती जोरजोरात रडायला लागली...

काय बसला ना माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास...

त्यादिवशी मी जेव्हा त्या बागेकडे गेली तेव्हा तिथे खरंच एक भयानक चेटकीन होती आणि तिने माझा जीव घेतला...

तुझ्या मुळे कामिनी माझा जीव गेला आता आता मी तुझा जीव घेणार 

हा हा हा....

काव्या प्लीज मला माफ कर मला मारू नकोस....

प्लिज....

कामिनी जोरजोरात रडायला लागली...

पण त्याचा आता काय फायदा होता...

काव्या आता तिची मैत्रीण नव्हती...

ती स्वतः आ्ता एक चेटकीन होती... 

जिला फक्त कामिनीचा जीव घ्यायचा होता...

हळूहळू काव्या कामिनीच्या जवळ येत होती तिचा जीव घेण्यासाठी.....

नाही...नाही...नाही...

कामिनीचं शरीर कोणीतरी जोरात हलवत होतं....

कामिनी....

कामिनी...

काय गं बाळा काय झालं

उठ बघ घड्याळात किती वाजले ते...

घाबरतच कामिनी जागी झाली...

झट्कन ती आईला बिलगली..

तिच्या आईला कळलंच नाही काय झालं ते..

काय बाळ बरी आहेस ना...

काय झालं?

काही नाही गं आई 

मग तुला आज उठायला एवढा उशीर कसा झाला, दुपार पासून झोपली तू आता संध्याकाळ झाली.

ती तुझी मैत्रीण काव्या कधीची वाट बघतेय बाहेर तुझी फिरायला जायचं म्हणून...

काय?

(मनातच) म्हणजे मगाशी झालं ते स्वप्न होतं तर...

आई मला नाही जायचं कुठे तू काव्याला सांगुन दे मी नाही येत आहे म्हणुन....

एका स्वप्नाने तुर्तास कामिनी फार घाबरुन गेली होती....

ती संबंध रात्र तीला झोप आली नाही आईजवळ नुसती पडून होती ती...

तिच्या मनात एकच खळबळ माजली होती ती म्हणजे हे सगळं जर खरंच घडलं असतं तर....

स्वप्नातली का होईना ती रात्र

ती मात्र ती कधीच विसरू शकणार नाही...

ती रात्र....



Rate this content
Log in

Similar marathi story from Horror