Madhuri Sharma

Thriller

3  

Madhuri Sharma

Thriller

वृषहन्ता

वृषहन्ता

3 mins
207


   ऐतिहासिक काळात भारताच्या काही प्रांतांमध्ये बैलाची स्वारी करण्याचा एक खेळ फार प्रसिद्ध होता...

त्यामध्ये सहभागी स्वार बैलासोबत ठरलेल्या मैदानात उपस्थित असे आणि त्याच्या इशाऱ्यावर दार उघडले जात मग बैल स्वार त्याच्यावर तूटून पडतो. बैलसुद्धा त्या सवाऱ्याला फेकण्याचा प्रयत्न करत असे...

या खेळाला जिंकण्याची अट अशी असायची की सवाऱ्याने बैलाला हरवून त्याला मारले पाहिजे, आता मात्र सवाऱ्याने बैलाच्या पाठीवर आठ सेकंद राहणे आवश्यक आहे, आता मात्र बैलाला मारले जात नाही...


    अश्याच एका रंगतदार सामन्याची ही गोष्ट आहे.......


दरवर्षी प्रमाणे यंदाही पोंगल उत्सवाच्या निमित्ताने जलीकट्टु म्हणजेच बैलांशी लढण्याबरोबरच, बैलांच्या शर्यती ही आयोजित करण्यात आल्या होत्या...

    दरवर्षी प्रमाणे मी आणि माझे मित्र या खेळासाठी फार उत्सुक होतो, या खेळात सहभागी होण्याचं हे आमचं पहिलंच वर्ष होतं आणि या खेळात जिंकल्यावर आम्हाला चांगलेच पैसे मिळणार होते..


  आमच्या गावी हा खेळ तीन भागात विभागलेला आहे...

पहिल्या टप्प्यात खेळाडूंना दिलेल्या वेळेत आणि सीमेत बैलावर नियंत्रण करायचे आहे...

दुसऱ्या टप्प्यात बैलांच्या शिंगावर नाण्याची पिशवी बांधली जाते आणि त्याला मोकळ्या मैदानात सोडले जाते, खेळाडूंना त्या बैलांवर मात करावी लागते आणि नाण्याची पिशवी जिंकावी लागते ‌....

तिसऱ्या टप्प्यात दोरीने बांधलेल्या बैलांवर नियंत्रण करावे लागते..

ही तुलनेने सोपी वाटत असली तरी यात जोखिम असते कारण यात बैलांवर कोण किती जास्त वेळ ताबा ठेवतो तो विजयी ठरतो....

   

  आम्ही मित्र खेळाला जाण्याच्या आधी माझ्या घरी भेटलो.....


दर्शन तू आज स्पर्धेच्या कोणत्या भागात सहभागी होणार आहेस?

मी पहिल्या भागात...

अरे यार पण महेशला व्हायचं होतं पहिल्या भागात तर...

मग त्यात काय आम्ही दोघं होतं पहिल्या भागात सहभागी....

बाकी विष्णू, तू ( राम) तुम्ही तुमचं ठरवून घ्या...

मी काय म्हणतो...

आपण चार जण आहोत, खेळाचे तीन भाग आहेत तर तुम्ही तिघे ठरवून तुम्हाला आवडेल त्या भागात सहभागी व्हा, मी बाहेर राहून तुम्हाला सपोर्ट करेल....

वाह राम व्हा, हुशार कुठला...

एं विष्णू जाऊ दे ना, जर त्याची इच्छा नाहीये तर राहू दे....

आपण ठरवू की आपल्याला कोणत्या भागात सहभागी व्हायचं आहे ते....

हो तर ठरलं मग

दर्शन तू पहिल्या

विष्णू तू दुसऱ्या आणि महेश तिसऱ्या भागात सहभागी होणार....

आता चला उशीर होतोय आपल्याला...

फार उत्साहाने आम्ही खेळाच्या मैदानात गेलो....


खेळ सुरू झाला....

सर्व गावकरी उत्साहित होते आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं....

 आमच्याकडे खेळाची उत्सुकता निर्माण करण्यासाठी बैलांना हिंसक होण्यासाठी प्रवृत्त केले जायचे....

   

    आजच्या खेळात तर मला सर्व बैल फार हिंसक वाटत होते...

मला भीती, काळजी आणि उत्सुकता अश्या तिघं भावना एकदाच जाणवत होत्या...

 सामना चांगला रंगला होता...

गावकरी उत्साहित होऊन खेळाचा आनंद घेत होते काही जण घाबरलेले ही होते....


खेळाच्या पहिल्या भागात माझा मित्र दर्शन मस्त जिंकला होता...

आम्ही आनंदात होतो तोच खेळाच्या दुसऱ्या टप्प्यात बैल हिंसक झाला आणि त्याने माझ्या मित्राला विष्णु ला शिंगावर घेऊन हवेत उचलून धरले आणि फेकून दिले...

खेळाचा सर्व उत्साह कुठच्या कुठे पळून गेला....

दहा-बारा जणं पळतच आली आणि पटकन विष्णू घेऊन दवाखान्यात गेली....

मी आणि दर्शन त्यांच्या बरोबर जाणार तेवढ्यात मैदानात महेशचं नाव घेण्यात आलं...

या खेळामध्ये खेळाडू जखमी होणं गावकऱ्यांना नवीन नव्हते म्हणून खेळ सुरू होता...

दुसरी फेरी रद्द करून सरळ तिसरी फेरी सुरू झाली होती, मी दर्शन ला दवाखान्यात जायला सांगितले आणि महेश साठी मी तिथेच थांबलो कारण तो प्रचंड रागात होता...

महेश मैदानात गेला, त्याने जाताच इतका जोर लावला की बैलाला काही कळण्याच्या आतच त्याने त्याच्यावर नियंत्रण मिळविले...

खेळातील इतर खेळाडू एक एक करून बैलांना सोडून गेले..

महेश मात्र शेवटपर्यंत बैलाला धरून होता...

महेश विजेता घोषित होताच त्याने जोच बैलांवरचे नियंत्रण सैल केले, ते हिंसक बैल धावतच मैदानाच्या बाहेर जाऊ लागले...

आता महेश ला राहवले नाही

त्याने ना मागे पाहिले ना पूढे त्याने जोरात त्या बैलाच्या दिशेने धाव घेतली आणि बैलाला काही कळेल त्या आधीच त्याच्या शिंगावर इतक्या जोरात प्रहार केला तो धसक्ंन खाली पडला आणि तिथेच त्याचा जीव गेला....


सर्वं गावकरी जोरजोरात "वृषहन्ता" असे ओरडु लागले.....

पण महेशला त्या जल्लोषात काही रस नव्हताआ

आम्ही दोघे धावतच दवाखान्यात गेलो...

विष्णू जरा बरा होता 

छातीत त्याला मार लागला होता...

पण तो बोलू शकत होता...

त्याला हात आणि पायावर जख्मा झाल्या होत्या

आम्हाला त्याला असं बघवत नव्हतं...

दहाव्या दिवशी आम्ही त्याला घरी घेऊन आलो...

घरी आल्यानंतर आम्ही चार ही मित्रांनी शपथ घेतली की इथून पुढे आपल्या जीवावर बेतले असे काही करायचे नाही...

तसं च महेश आणि दर्शन ने स्पर्धेत जिंकलेले पैसे त्यांनी विष्णूंच्या घरच्यांना दिले...


त्या एका खेळाने आम्हाला जगण्याचा एक नवा दृष्टिकोन दिला....

आणि महेश ला आता आम्ही पण "वृषहन्ता" च् म्हणतो....


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller