Varsha Nerekar

Tragedy

4  

Varsha Nerekar

Tragedy

यू टर्न

यू टर्न

4 mins
276


"कालिंदी तुझे कुरिअर टेबलवर आहे बघ" सांगून प्रभाकर आत गेला. तिने कोणी पाठवले बघितले पण तिच्या लक्षात येईना. उघडताच आतमधे कस्तुरी अत्तर आणि एक जेंटस् व एक लेडीज रिस्ट वॉच होते. "अरे हे बघ काय आहे" प्रभाकरने बघितले दोघांना आश्चर्य वाटले. अगं लेटर आहे ते उघडून तो वाचू लागला. "प्रिय माई हो तू माई आईसारखी मायाळू, तुम्हा दोघांना नमस्कार. तुम्ही ओळखणार नाही आता चार वर्ष झाली, मी अनिश. कस्तुरीप्रमाणे जीवन झाले, यशस्वी आहे सध्या न्यू यॉर्क मी इथे एमएस केले आता ऑल ओके. तुम्ही वेळेवर येऊन मला " यू टर्न " घ्यायला लावले तुमचा ऋणी व वेळेचा आदर करतो, एक आठवण रिस्ट वॉच पाठवले होप आवडेल. माझ्या गाण्याचा अल्बम पाठवलाय. तुमचा पत्ता शोधून काढायला वेळ लागला. मी इथेच राहणार कायमचा ठरवले. कधी आलो तर भेटेन, तुम्ही आलात इथे तर माझ्याकडेच या थॅक्स.. खाली फोन नंबर व पत्ता" पत्र वाचून दोघे एकमेकांकडे बघत हसले विजयी, समाधानी हास्य होते ते. तिच्या लक्षात आले हा तोच अनिश तिला प्रसंग आठवला... 


कामिनी निघाली ऑफिसच्या विचारांना रजा देत तसे घरचे विचारचक्र सुरू झाले थोडे सामान घेऊन मग घरी. घर मध्यवस्तीत त्यामुळे दोन तीन रस्ते कधी एका कधी दुसऱ्या रस्त्याने जायची तेवढे वेगळेपण आणि चार दुकाने इकडची तिकडची माहिती पडायची. गर्दीतून चालताना माणसात आहोत हे बरे म्हणायची. कधी कुठे कोणी ओळखीचे भेटायचे तर सहज गरजेपोटी चौकशी करणारे अनोळखी. 


मंदिराच्या घंटेचा नाद आला आणि चला जाऊ विचार करत ती मागे वळली. पण पुलावर आली आणि हातातली बॅग खाली फेकून सर्व शक्तीनिशी क्षणात धावली, पुलापाशी एक व्यक्ति उडी मारण्याच्या बेतात. ती ओरडली असती तर त्याचा तोल गेला असता. तिच्या सारखे पदपथावर चालणाऱ्या काहींच्या लक्षात आले तेही धावले. तीने मागून त्याची कॉलर धरून खेचले. अरे काय करतोस ती ओरडली तो भानावर नव्हता एका काकांनी एक लगावली तसा खाली बसला बाजूला बॅग पडली होती. "सोडा जाऊ द्या... कोण तुम्ही... काही जगू देत नाही... आता तुम्ही मरू देत नाही...." तो खूपच उद्ध्वस्त निराश. जमलेले लोक त्याला समजावून निघून गेले, ती मात्र तिथेच बसली त्याच्याबरोबर त्याला एकटे सोडणे बरे वाटले नाही. तो निघून जाऊ लागला न जाणो हा परत काय करेल तिने त्याला हात ओढून बसवले. 


"काय नाव तुझे, काय झाले असे की जीव द्यायला निघाला. संवाद सुरू झाला शांतता संपली. घरी कोण असते, काय करतोस. तुला सांगावे वाटले तर सांग बघ बरे वाटेल." तो दडपणाखाली असावा अश्रूंना वाट मोकळी करून देत बराच वेळाने बोलू लागला "मी अनिश, मी इंजिनिअर आहे, जॉब करतो" तीने विचारले "अरे हि समस्या आहे का जीव देण्याची". " नाही, माझ्या बाबांना खूप अपेक्षा आहेत. मी सरकारी नोकरी करावी पण मला नाही जमत यूपीएससी. माझा जॉब चांगला. परदेशी जाण्याची संधी मिळते आहे. मी गाणे पण गातो, गाणे करियर होईल नाही माहिती नाही पण नोकरी करून करतो. माझ्या बाबांना आवडत नाही. "भिकेची लक्षणे फिरा गाणे म्हणत पोट का भरणार त्याने. नोकरीत प्रगती नाही स्वतःचे तरी भागेल का?..." सतत हेच बोलणे. त्यांचे आणि आईचे वाद होतात. हे अनेक वर्ष चालू आहे. बाबा सरकारी नोकरीतून रिटायर्ड, आई पार्टटाइम नोकरी करते. बाबा बाहेर गावी नोकरीमुळे मला ते हवे असायचे पण त्यांचे प्रेम न मिळता राग अनुभवला. मी आणि आई, आजोबा तिघे होतो आधी. मला लहानपणी एकटे वाटायला नको म्हणून ती वेगवेगळ्या छंद वर्गाला पाठवायची. आजोबा भजन म्हणत मला गाणे आवडायला लागले. मी बक्षिसे मिळवली. पण तरी बाबांना कौतुक नाही."


"अरे त्यांना समजावून सांगता येईल काहीतरी मार्ग नक्की मिळेल. पण असा निर्णय अविचारी. आईचा विचार केलास का?.." अनिश "मी चिठ्ठी लिहून आलो सकाळी." तिने विषय बदलला "काय सांगत होतास तुला परदेशी जाण्याची संधी मिळते. मग तिकडे जा. " "हो ती संधी मी घेणार मी सिलेक्ट झालो पण बाबांचा विरोध आहे. आजोबांनी सांगितले अरे मुलगा प्रगतीच करतोय जावू दे पण काल आईला बोलले मारले तुझ्यामुळे झाले सगळे म्हणाले...." तो बोलत राहिला बरेच काही तसा हळूहळू त्याचा ताणाव कमी होतोय कालिंदीला जाणवले. ती समुपदेशक होती तिने संवाद साधत अनुभवाने त्याला बरेच समजावून सांगितले प्रोत्साहनाने देत होती. 


तेवढ्यात एक कार तिथे आली त्याचे आई बाबा गाडीतून उतरले. त्याला काहीच कळले नाही हे इथे कसे आले. अनिश जेव्हा रडत होता तेव्हा त्याची बॅग तिथेच होती. तो ऑफिसमधून इथेच आला असावा. म्हणजे घरच्यांना कळले असेल शोधाशोध सुरू असेल. त्याच्या आयकार्डवरून ऑफीसचा नंबर घेऊन तिने तिच्या मिस्टरांना पाठवून मेसेजवर मेसेज पाठवत राहिली. तेच अनिशच्या आई बाबांना घेऊन आले होते. ते डॉक्टर असल्याने त्यांनी दोघांना समजावले असणार. 


"अनिश अरे माझा विचार करायचा, मी ऑफीसमधून आले तुझी चिठ्ठी वाचली, तुला शोधत, पोलीस ठाण्यात जावून आलो." अनिशची आई हताश होवून रडत होती. त्याचे बाबा शांत उभे होते बऱ्याच वेळाने बोलले "अरे अनिश, खूप चुकलो बेटा तुला समजून नाही घेतले. मी काही बोलणार नाही माझा त्रास होणार नाही. तू जा परदेशात.... " कालिंदीचे आभार मानून ते अनिशला नीट सांभाळतील आश्वासन देवून गेले. कालिंदी आणि प्रभाकर कीतीतरी वेळ तिथेच होते नदी तुडुंब वाहात होती, रात्र जास्तच गडद आणि गूढ भासली तिला. पण आज एक कुटुंब वाचले, एक जीव आज मृत्यूकडे जाता जाता "यू टर्न" घेऊन गेला चैतन्यमयी सर्योदयाकडे....... 


स्वलिखित कथा कथेतील पात्र नाममात्र काल्पनिक

कथा आवडली जरूर शेअर करा.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy