Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

somadatta kulkarni

Inspirational

4.0  

somadatta kulkarni

Inspirational

माझा देश

माझा देश

1 min
159

माझा देश,हा आर्यावर्त

आहे खरोखर जगी महान

ऊंच ऊंच नभी लहरे तिरंगा

वाढवू आम्ही भारताचा मान १

थोर तपस्वी ॠषीमुनींचा

इतिहास आमुचा त्यागाचा

सहिष्णुता अन् बंधुता जणू

धर्म आमुचा आहे साचा २

वसुधैव कुटुंबकम हा मंत्र

दश दिशांना घुमतो आहे

अतिथी देवो भव भावना

इथे हृदयात वसते आहे ३

परंपरा आमुची महान आहे

आदर्श आम्हां राम आहे

राम राज्य असावे नित्य

एक मनात मी स्वप्न पाहे ४

 सत्य अहिंसा आम्हां प्रिय

 मार्ग आमुचा चुकणे नाही 

धर्म रक्षण करण्यासाठी

प्राणा़ंची आम्हां पर्वा नाही ५ 

धन्य आमुची भारत माता

लेकरे तिची आम्ही छान

त्रिलोकी होईल जयजयकार

असा वाढवू मायभूमीचा मान ६

Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational