Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Anuja Dhariya-Sheth

Inspirational

3  

Anuja Dhariya-Sheth

Inspirational

मातॄत्वाची दिशाच बदलली

मातॄत्वाची दिशाच बदलली

4 mins
301


आरती, झाला की नाही डबा? किती वेळ, मला उशीर होतोय, माझे घड्याळ, रुमाल, पाकीट... कुठे आहे? आनंद मोठ्या मोठ्याने ओरडत होता...

रेखाताई डोळे काढत आपल्या मुलाकडे म्हणजेच आनंद कडे बघत होत्या... आनंद हसून म्हणाला, ए आई, कम ऑन.. आता माझ्याकडे अशी बघू नकोस हं... मी आता काही लहान आहे का? दोन मुलांचा बाप झालोय मी आता...


रेखाताई रागात म्हणाल्या, हो पण वागतोयस लहान मुलासारखाच... आनंद हसत म्हणाला, आई तू पण ना... रेखाताई रोजच हे सारं बघत होत्या... त्यांना सतत वाटत असे, आनंदला घडवताना एक आई म्हणून मी कमी पडले का? असे वाटायचं त्यांना... विचार करता करता भूतकाळात हरवल्या... घर म्हणजे पिंजरा.. घरातल्या बाईला काडीची किंमत नाही.. हे सर्व बघत आनंद मोठा झाला.. जसा जसा मोठा होत गेला तस मी त्याला किती वळण लावले, स्वत:ची कामे स्वतः करावी... अगदी एकटा राहिला कधी तर पोट भरल जाईल असे सोपे पदार्थ पण मी त्याला शिकवले... तरी हा असा का वागतो? आरतीला तर अगदी काही बाही बोलतो.. घरची लक्ष्मी आहे ती.. काय करू मी आता?


ह्याला घडवताना मातृत्वाच्या वाटेवर मी कोठें तरी कमी पडले हेच खरे....!!! अशा विचारात असताना त्यांची मैत्रीण आली... शिल्पा.. मैत्री म्हणजे एवढी जीवा-भावाची काही विचारू नका... चेहरा बघताच शिल्पाने ओळखल काहीतरी गडबड आहे.... ती लगेच म्हणाली, रेखा तू उद्यां दिवसभर माझ्याकडे यायचं आहेस हं... किती दिवसात आपले काही बोलणंच नाही झाले..


आरतीने सुद्धा दुजोरा दिला... हो मावशी न्या त्यांना जरा बाहेर.. बाबांना जाऊन ३ महिने होतील पण आई अजिबात बाहेर गेल्या नाहीत... फार फार तर घराबाहेर असलेल्या या बागेत बसतात.. आई तुम्ही खरच जा... मावशी तुम्ही थांबता का आज मस्त प्लॅन करू... शिल्पा मावशी लगेच तयार झाली...

संध्याकाळी मस्त पाव-भाजीचा बेत केला... सर्व आवरून आरती सुद्धा बाहेर सर्वांमध्ये पत्ते खेळायला बसली... शिल्पा मावशी आरतीला म्हणाल्या, आता तू सुद्धा काहीतरी सुरू कर... एवढी चांगली शिकलेस.. घरात नको बसून राहू.. घरातील कामे किती करा.. कोणाला किंमत नसते बघ... आरतीने भरून आलेले डोळे सावरत खोटे हसू आणत हो म्हणाली.. अगदी कोरडे... रेखाताईंनी शिल्पाचा मुद्दा उचलून धरला, अगदी माझ्या मनातलं बोललीस.. आरती खरच तू विचार कर...


तेवढ्यात आनंद ऑफिसवरून आला, तस आरती उठून पाने घ्यायला गेली... सर्वांना पाव गरम करून देता, देता तिला उशीर झाला.. शिल्पा मावशीने हसत हसत आनंदला सांगितलं... तिला जरा पाव गरम करून दे आता... मावशी होती म्हणून काहीच न बोलता आनंदने केले... परत गप्पांचा फड बसला.. आज बाबा गेल्यानंतर आई पहिल्यांदा एवढी हसत आहे हे बघितलं आणि आनंद खुश झाला..


शिल्पा मावशीने घाई केल्यामुळे आरती घाई-घाईत आवरून बाहेर आली... उशीर झाला होता पण आईला एवढे खुश बघून आज मी सर्वांना कॉफी करतो असे म्हणत आनंद आत गेला.. आरती बघतच बसली... आत गेल्यावर त्याने बघितल तर काय घाई घाईत आवरल्यामुळे ओट्यावर घाण तशीच राहिली होती.. तो जोरात आरतीवर ओरडला... काय ग हे? एक काम धड करत नाहीस.. घरात तर असतेस.. तरी नीट काही करत नाहीस.... नुसती वेंधळी आहेस... सगळ्यां समोर असे बोलल्यामुळे आरती रडत आत गेली..


रेखाताई मात्र खूप रागावल्या... आनंद, बस झाले तुझे हुकूमशाही वागणे... हे असे शिकवलं आहे का मी तुला? काय फरक आहे तुझ्या बाबांमध्ये आणि तुझ्यामध्ये? तिला बोलताना ती जे काम करते ना... तेच काम तू रोज करून दाखव मला... त्याच उत्साहाने, तेवढेच नीट-नेटके... कंटाळा आलाय, दमलो असा शब्द काढायचा नाही... मी जे सहन केले तें माझ्या सूनेने करू नये म्हणून तुला मी शिस्त लावली, पण तू तुझ्या घराण्याचा वारसाच पुढे चालवतो आहेस.. आज मातॄत्वाच्या या प्रवासात मी कमी पडले शिल्पा, शेवटी काही गोष्टी शिकवून काही उपयोग नसतो ग... मोठ्या माणसांच्या अनुकरणातून ते शिकत जातात ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा माझा आनंद आहे बघ शिल्पा... आता ह्याचे अनुकरण ह्याची मुले करणार... हीच भीती आहे मला.. पण आता मी मातॄत्वाची वाट बदलणार आहे, माझ्या सूनेसाठी सासू रुपाने जे मातॄत्व मला मिळालं आहे ते मी जपणार आहे... आईचं हे रूप बघून आनंदला वेगळेच वाटले...


खूप् दिवसांनी मन मोकळे झाले त्यांचे.. बोलून एकदम खाली बसल्या.. शिल्पा मावशींनी सावरले त्यांना... त्यांचा हात पकडून सावरले... तसे त्या म्हणाल्या, मनावरचे दडपण गेले बघ... मोकळे वाट्त आहे मला... खुप् उशीर झालाय, झोप आई तू... आनंद म्हणाला..


रेखा ताई हसुन म्हणाल्या, खरच उशीर झालाय आता... हे सर्व मी आधीच करायला हवे होते मी... आरती, बाहेर ये, रेखाताईंचा आवाज ऐकून आरती बाहेर आली... आरती तुला लग्नानंतर नोकरी करायची होती ना... पण पुरूषप्रधान आपल्या या घरात नेहमीच स्त्रीयांना कमी लेखले गेले... हा बदल व्हावा म्हणून आनंदला घडवताना मी बरेच बदल केले.. पण मातॄत्वाच्या या प्रवासात मी कमी पडले कारण घराणेशाहीचा प्रभाव...


आता असे नाही आता आपण या मातॄत्वाची दिशाच बदलून टाकू... तू नोकरी कर, तुला पुढे P.H.D करायची होती ना.. ती पण कर मी आहे... माझा तुला पाठींबा आहे... तू घरात नसलीस की प्रत्येक जण आपली कामे आपणच करेल.. आणि ह्या सासूरूपी मातॄत्वाची वाट मी घडवणार आहे... आरतीने त्यांना नमस्कार केला... आई तुम्ही झोपा आता, उद्यां बोलू आपण.. मी तुमचे सर्व ऐकेल.. पण आता झोपा... नाहीतर तब्येत खराब होईल आई...

उद्याची सकाळ एक नवीन प्रकाश घेऊन येणार होती... या विचारात आरतीला झोप लागली... उशीर झाला उठायला.. पण बराच बदल झाला होता.. रविवार असला तरी लवकर उठून आनंदने सर्व आवरायला घेतले होते... आईला त्याने प्रॉमिस केले, तो असा परत कधीही वागणार नाही, त्याची चूक त्याने कबुल केली...


वर्षात घराचे रूप पालटून गेले... सर्वांना स्वयंशिस्त लागली होती.. आरतीने राहिलेले शिक्षण पूर्ण करून घराजवळच स्वत:चे ऑफिस काढले... प्रत्येक जण जबाबदारीने वागत होता... त्यामुळे घरातील बारीक बारीक कामाचं महत्व प्रत्येकाला समजलं होते.. आणि रेखाताईंना आपले असे हे घर बघून वेगळेच समाधान मिळाले... आणि मातॄत्वाची वाट घडवताना आपण कमी नाही पडलो याचा आनंद झाला...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational