आवड
आवड
मनापासून करावी वाटते अशी गोष्ट असते आवड
रोजच्या कामातून विसावा देणारी गोष्ट असते आवड
स्वःताला ओळखण्यासाठी करावी वाटणारी गोष्ट असते आवड
आपल्याच छंदात गुंतून ठेवणारी गोष्ट असते आवड
समाधानाचे भरभरुन सुख देणारी गोष्ट असते आवड
वेगळेपणा टिकवून ती जपणारी गोष्ट असते आवड
हलकेच मनाला आनंद देणारी गोष्ट असते आवड
स्वछंदी होण्यासाठी बंधनातून मुक्त करणारी गोष्ट असते आवड